पंतप्रधानांचे एनएक्सटी शिखर परिषदेतील भाषण

March 12th, 10:47 pm

आजचा हा 12 मार्चचा दिवस ऐतिहासिक आहे. 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी साबरमती इथून दांडी यात्रा सुरू केली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला हा एक निर्णायक टप्पा होता. या यात्रेमुळे देशभरातील लोक एका ध्येयाने एकत्र आले, भारताला स्वतंत्र करण्याचे ध्येय! आज या ऐतिहासिक यात्रेला जवळपास 100 वर्ष होत आली असताना आपण पुन्हा एक नवी यात्रा सुरू केली आहे; ती म्हणजे विकसित भारत यात्रा! विकसित भारत हे आपल्या सर्वांचेच ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यामध्ये अशा परिषदांमधून झालेल्या विचारमंथनातील निष्कर्ष खूप उपयोगी ठरतात. मला एनएक्सटी शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. इथे देशभरातले तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले बरेच मित्र उपस्थित आहेत. त्यातल्या काही जणांशी माझी जुनी ओळख आहे. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन एक्स‌ टी शिखर परिषदेला केले संबोधित

March 12th, 08:30 pm

पंतप्रधानांनी आज आयटीव्ही नेटवर्कच्या एनएक्सटी शिखर परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी दांडी यात्रेच्या ऐतिहासिक वर्धापनदिनाचे स्मरण केले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना आजच्या विकसित भारत घडवण्याच्या प्रयत्नांशी केली. 1930 च्या दांडी यात्रेने देशाला स्वातंत्र्याकडे एकजूट केले त्याचप्रमाणे सध्याचे विकसित भारत अभियान हे 140 कोटी भारतीयांचा सामूहिक संकल्प आहे, यावर मोदी यांनी भर दिला. आज, त्या ऐतिहासिक यात्रेनंतर जवळजवळ 100 वर्षांनी आपण भारतीय पुन्हा एकदा 'विकसित भारत' साठी एका नवीन प्रवासाला निघालो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये मान्यवरांना भेटून त्यांच्याशी साधला संवाद

March 01st, 04:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये विविध मान्यवरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. मान्यवरांमध्ये कार्लोस मोंटेस, प्रो. जोनाथन फ्लेमिंग, डॉ. अँन लिबर्ट, प्रा . वेसेलिन पोपोव्स्की, डॉ. ब्रायन ग्रीन, अलेक रॉस, ओलेग आर्टेमिव्ह आणि माइक मॅसिमिनो यांचा समावेश होता.

श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

March 01st, 02:35 pm

श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी आज आज नवी दिल्लीत एनएक्सटी कॉन्क्लेव्ह येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट आणि पंतप्रधान मोदी यांची भेट

March 01st, 02:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांची भेट घेतली.

NXT कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 01st, 11:00 am

NewsX World याची शुभ सुरुवात आणि यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो. तुमच्या नेटवर्कमधील हिंदी आणि इंग्रजीसहित सर्व प्रादेशिक वाहिन्या आज तुम्ही ग्लोबल होत आहात आणि आज अनेक fellowships आणि scholarship ची देखील सुरुवात झाली आहे. मी या कार्यक्रमांसाठी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.

NXT Conclave या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग

March 01st, 10:34 am

नवी दिल्ली मधील भारत मंडपम इथे आजपासून NXT Conclave या परिषदेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या परिषदेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. यावेळी त्यांनी NewsX World या माध्यम समुहाच्या शुभारंभाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदनही केले. या माध्यम समुहात हिंदी, इंग्रजी आणि विविध प्रादेशिक भाषांमधील वाहिन्यांचा समावेश असून, या समूहाने आज जागतिक समूह होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या समुहाने अनेक पाठ्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला असल्याचे सांगून या कार्यक्रमांसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.