The future of farming lies not merely in "Produce More,” but in "Produce Better": PM Modi at FAO
May 20th, 11:00 pm
Accepting the Agricola Medal for 2026 from the FAO, PM Modi said the recognition reflected India’s commitment to human welfare, food security and sustainable development. He dedicated the honour to Indian farmers and the country’s agricultural scientific community. He also highlighted initiatives such as ‘Per Drop More Crop’, micro-irrigation and precision farming, which are guiding India’s agricultural policies.पंतप्रधानांना रोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे 'ॲग्रिकोला पदक' प्रदान
May 20th, 10:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे (एफएओ) रोम येथील मुख्यालयात 2026 साठी प्रतिष्ठेच्या 'ॲग्रिकोला’ पदकाने सन्मानित करण्यात आले. भारतात आणि जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा, शाश्वत कृषी आणि ग्रामीण विकास, यासारख्या क्षेत्रांमधील त्यांच्या असाधारण नेतृत्वाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पंतप्रधान मोदी महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी इटलीमध्ये पोहोचले
May 20th, 12:30 am
पंतप्रधान काही वेळापूर्वीच रोम, इटली येथे पोहोचले. ते इटली प्रजासत्ताकचे राष्ट्रपती महामहीम श्री. सर्जियो मात्तारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील, ज्यामध्ये 'भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडोअर' (आयएमईसी) वर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल.नॉर्वे-भारत व्यापार आणि संशोधन शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 18th, 11:49 pm
नॉर्वे आणि भारताच्या व्यावसायिक आणि संशोधन समुदायांच्या दरम्यान आज येथे उपस्थित राहता मला अतिशय आनंद होत आहे. मला काही सहभागींचे म्हणणे ऐकण्याची संधी मिळाली, आणि त्यांचे विचार ऐकून आपल्या भागीदारीचा पाया अत्यंत मजबूत असल्याचा आत्मविश्वास मला मिळाला आहे.भारत-नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान झाले सहभागी
May 18th, 08:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओस्लो येथे भारत-नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेत सहभागी झाले. या शिखर परिषदेत महामहीम युवराज हाकोन आणि नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गहर स्टोर देखील सहभागी झाले.युरोपीय उद्योगांच्या गोलमेज बैठकीत पंतप्रधानांचे संबोधन
May 18th, 05:00 am
सर्वात आधी, मला या गोलमेज बैठकीत आमंत्रित केल्याबद्दल मी पंतप्रधान क्रिस्टरसन यांचे मनापासून आभार मानतो. ही बैठक गॉथेनबर्ग मध्ये आयोजित केली जात आहे, याचा मला आनंद आहे. हे एक असे शहर आहे जे नवोन्मेषासोबतच युरोपच्या उत्पादक वृत्तीचे एक जिवंत प्रतीक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपीय उद्योगांच्या गोलमेज बैठकीला केले संबोधित
May 17th, 12:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मे 2026 रोजी गॉथेनबर्ग येथे 'युरोपियन उद्योगांच्या गोलमेज बैठकीला (ERT) संबोधित केले. व्हॉल्वो समूहाने (Volvo Group) आयोजित केलेल्या या संवाद सत्रात स्वीडनचे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा महामहीम उर्सुला वॉन डेर लेयेन, युरोपियन उद्योगांचे वरिष्ठ नेते आणि आघाडीच्या युरोपियन आणि भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.From Panchayat to Parliament, PM Modi outlines roadmap for women’s leadership at Nari Shakti Vandan Sammelan
April 13th, 11:15 am
In his address at the Nari Shakti Vandan Sammelan, PM Modi said the Nari Shakti Vandan Act must be implemented on time. Highlighting the critical role of women in the Viksit Bharat journey, the Prime Minister expressed satisfaction that his government has created schemes for every stage of women's life cycle. He also urged women to take the discussions from the programme to every village in the country.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन संमेलनाला केले संबोधित
April 13th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विज्ञान भवन येथे नारी शक्ती वंदन कार्यक्रमाला संबोधित केले. बैसाखी आणि देशातील विविध भागांमध्ये आगामी नववर्ष सोहळ्याचा उल्लेख करुन पंतप्रधानांनी जालियानवाला बाग हत्याकांडातील शहिदांना आदरांजली वाहिली. भारत एकविसाव्या शतकातील एक मोठा निर्णय घेण्यासाठी सज्ज असून हा निर्णय नारी शक्तीला समर्पित आहे, असे पंतप्रधान म्हणाले.भारत-कॅनडा नेत्यांचे संयुक्त निवेदन
March 02nd, 05:05 pm
भारताचे पंतप्रधान महामहिम नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, कॅनडाचे पंतप्रधान राईट ऑनरेबल मार्क कार्नी यांनी 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीत भारताचा अधिकृत दौरा केला. पंतप्रधान कार्नी यांचा पंतप्रधान म्हणून पदभार स्विकारल्यानंतरचा हा पहिलाच भारत दौरा होता तसेच 2018 नंतर कॅनडाच्या पंतप्रधानांची ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट आहे. पंतप्रधान कार्नी यांच्यासोबत कॅनडाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ होते, ज्यात वरिष्ठ मंत्री, प्रांतीय नेते आणि आघाडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश होता.अजमेर येथून विकासकामांचे उद्घाटन व देशव्यापी HPV लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 28th, 12:00 pm
तीर्थक्षेत्र पुष्कर आणि सावित्री मातेच्या या पवित्र भूमीवर, आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहाण्याची, आपले आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची संधी मिळाली आहे. या व्यासपीठावरून मी सुरसुराच्या तेजा धामला, पृथ्वीराजची भूमी अजमेरला नमस्कार करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अजमेर येथे राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा प्रारंभ तसेच 17,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन
February 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अजमेर येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित केले. राजस्थानच्या विकास प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधानांनी या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि शौर्यपूर्ण वारशाबद्दल गौरवोद्गार काढले, ज्यामध्ये सुरसुराचे तेजाजी धाम आणि मेजर दलपत सिंग ज्यांनी हैफा मुक्त करण्यात बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेचे अजूनही इस्रायलमध्ये आदराणे स्मरण केले जाते, त्यांच्या शौर्याचा समावेश आहे.PM Modi outlines the M.A.N.A.V. vision for AI at India AI Impact Summit 2026
February 19th, 10:00 am
PM Modi inaugurated the AI Impact Summit 2026 and remarked that the world’s largest AI Impact Summit is being held in India, a nation representing one-sixth of humanity. He highlighted that the core purpose of the summit is to deliberate on how AI can be made human-centric. He also presented India’s M.A.N.A.V. Vision for AI and extended an invitation to the world with the call: ‘Design and Develop in India. Deliver to the World. Deliver to Humanity’.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन
February 19th, 09:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. जगभरातील एक षष्ठांश मानवजातीचे प्रतिनिधित्व करत असलेल्या भारातात, जगातील ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक एआय इम्पॅक्ट समिट परिषद होत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आहे, तंत्रज्ञान विषयक कौशल्यांच्या बाबतीत सर्वात मोठे मनुष्यबळ भारतात आहे, यासोबतच भरभराटीला आलेली तंत्रज्ञानाधारीत परिसंस्थाही भारतात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारत केवळ नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करत नाही, तर अभूतपूर्व वेगाने तंत्रज्ञानाचा अवलंबही करत असल्याचे त्यांनी नमूद केले. 140 कोटी भारतीय नव्या तंत्रज्ञानांचा अंगिकार करण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. या सगळ्यांच्या वतीने त्यांनी, या परिषदेसाठी आलेल्या विविध देशांचे प्रमुख, जागतिक एआय विषयक परिसंस्थेतील आघाडीची व्यक्तिमत्वे आणि या परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांचे स्वागतही केले. या सगळ्यांनी नोंदवलेल्या सहभागाबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. या परिषदेचे यजमानपद भूषवणे ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर ग्लोबल साऊथ अंतर्गत असलेल्या प्रत्येक देशासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.“परीक्षा पे चर्चा 2026” कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद
February 06th, 10:21 am
मी सानवी आचार्य, मी तुमच्याच राज्यातून म्हणजे गुजरातमधील आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की, पालक आमची चिंता करतात आणि शिक्षक देखील आम्हाला मदत करतात. मात्र मुख्य मुद्दा तेव्हा येतो , जेव्हा शिक्षक आम्हाला अभ्यासाची एक वेगळी पद्धत सुचवतात. पालक वेगळ्या पद्धतीने सांगतात की या पॅटर्ननुसार अभ्यास करा आणि विद्यार्थ्यांमध्ये तर वेगळाच ट्रेंड सुरु असतो, त्यामुळे त्यावेळी आम्ही गोंधळून जातो की कोणती पद्धत बरोबर आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा 2026' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी साधला संवाद
February 06th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'परीक्षा पे चर्चा' (पीपीसी) च्या नवव्या भागात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी 'एक्झाम वॉरियर्स'सोबत अनौपचारिक संवाद साधला.Hosting a national volleyball competition is an important step in placing Kashi on India’s sporting map: PM Modi
January 04th, 01:00 pm
PM Modi inaugurated the 72nd National Volleyball Tournament in Varanasi via video conferencing, welcoming players from 28 states and showcasing the spirit of Ek Bharat, Shreshtha Bharat. He highlighted Varanasi’s deep-rooted sporting tradition and expressed confidence that players would feel the city’s enthusiasm, support, and renowned hospitality during the championship.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाराणसी येथे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे केले उद्घाटन
January 04th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले. या प्रसंगी मोदी यांनी वाराणसीचे खासदार म्हणून सर्व खेळाडूंचे स्वागत करताना आणि त्यांचे अभिनंदन करताना होणारा विशेष आनंद व्यक्त केला. राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा आजपासून वाराणसीमध्ये सुरू होत असल्याचे त्यांनी घोषित केले. सर्व खेळाडू प्रचंड मेहनतीनंतर या राष्ट्रीय स्पर्धेत पोहोचले आहेत आणि येत्या काही दिवसांत वाराणसीच्या मैदानावर त्यांच्या प्रयत्नांची कसोटी लागणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले . देशातील 28 राज्यांचे संघ येथे एकत्र आले असून यामधून 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चे सुंदर चित्र सादर होत आहे, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी स्पर्धेमधील सर्व सहभागींचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन: सत्र 2
November 22nd, 09:57 pm
नैसर्गिक आपत्ती या मानवतेसाठी खूप मोठे आव्हान बनल्या आहेत. या वर्षीही नैसर्गिक आपत्तींमुळे जगातील लोकसंख्येच्या एका मोठ्या भागावर परिणाम झाला आहे. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी जागतिक सहकार्य अधिक बळकट करण्याची गरज यावरून स्पष्ट होते.जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 शिखर परिषदेत पंतप्रधान झाले सहभागी
November 22nd, 09:35 pm
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. जी20 शिखर परिषदांमधील पंतप्रधानांचा हा बारावा सहभाग होता. पंतप्रधानांनी शिखर संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या दोन्ही सत्रांना संबोधित केले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांचे अतिथ्य आणि शिखर संमेलनाचे यशस्वी आयोजन, यासाठी आभार मानले.