Skyroot’s Infinity Campus is a reflection of India’s new vision, innovation and the power of our youth: PM Modi
November 27th, 11:01 am
PM Modi inaugurated Skyroot’s Infinity Campus in Hyderabad, extending his best wishes to the founders Pawan Kumar Chandana and Naga Bharath Daka. Lauding the Gen-Z generation, he remarked that they have taken full advantage of the space sector opened by the government. The PM highlighted that over the past decade, a new wave of startups has emerged across perse sectors and called upon everyone to make the 21st century the century of India.Prime Minister Shri Narendra Modi inaugurates Skyroot’s Infinity Campus in Hyderabad via video conferencing
November 27th, 11:00 am
PM Modi inaugurated Skyroot’s Infinity Campus in Hyderabad, extending his best wishes to the founders Pawan Kumar Chandana and Naga Bharath Daka. Lauding the Gen-Z generation, he remarked that they have taken full advantage of the space sector opened by the government. The PM highlighted that over the past decade, a new wave of startups has emerged across perse sectors and called upon everyone to make the 21st century the century of India.जोहनिबर्ग येथे जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट
November 23rd, 09:41 pm
दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथे सुरु असलेल्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडामधील भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला.हरित ऊर्जेसाठी महत्त्वाच्या असलेल्या ग्रॅफाइट, सिझियम, रुबिडियम आणि झिरकोनियम खनिजांच्या रॉयल्टी दरांचे सुसूत्रीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
November 12th, 08:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत सिझियम, ग्रॅफाइट, रुबिडियम आणि झिरकोनियमच्या रॉयल्टी दराचे खालीलप्रमाणे तर्कसंगतीकरण करण्यास मंजुरी दिली आहे:25 सप्टेंबर रोजी पंतप्रधान उत्तर प्रदेश आणि राजस्थानला भेट देणार
September 24th, 06:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि राजस्थानला भेट देतील. सकाळी 9.30 वाजता ते ग्रेटर नोएडा येथे उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025 चे उद्घाटन करतील आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील.भारत -जपान आर्थिक मंचाच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 29th, 11:20 am
मी तुमच्यापैकी अनेकांना वैयक्तिकरित्या ओळखतो. गुजरातमधील माझ्या मुख्यमंत्री काळात तसेच दिल्लीला आल्यानंतरच्या काळात भेटलो आहे. तुमच्यापैकी अनेकांशी माझे निकटचे संबंध आहेत. आज तुम्हाला सर्वांना भेटण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद झाला आहे.भारत-जपान आर्थिक मंचाच्या बैठकीत पंतप्रधान सहभागी
August 29th, 11:02 am
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या यशावर, विशेषत: गुंतवणूक, वस्तुनिर्माण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावर प्रकाश टाकला. जपानी कंपन्यांना भारतात आपला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी आमंत्रित करताना, त्यांनी नमूद केले की, भारताच्या विकासगाथेने त्यांच्यासाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्याच्या अशांत जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विश्वासू मित्रांमधील आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणे अधिक प्रासंगिक असल्याचे ते म्हणाले. राजकीय स्थैर्य, धोरणात्मक अंदाज, सुधारणांप्रति बांधिलकी आणि व्यवसाय सुलभतेच्या प्रयत्नांमुळे भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूकदारांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला असून, जागतिक संस्थांनी भारताच्या पतमानांकनात नुकत्याच केलेल्या सुधारणेत ते योग्यरित्या प्रतिबिंबित होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.गुजरातमधील अहमदाबाद येथे विविध विकास योजनांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 25th, 06:42 pm
तुम्ही सर्वांनी आज छान वातावरण निर्मिती केली आहे. अनेक वेळा माझ्या मनात विचार येतो की मी किती नशीबवान आहे, ज्यामुळे मला लाखो लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत. मी तुम्हा सर्वांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत. पहा तिकडे कोणी छोटा नरेंद्र उभा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद, गुजरात येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
August 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, संपूर्ण देश सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाने भरलेला आहे. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज गुजरातच्या प्रगतीशी जोडलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. त्यांनी सांगितले की, अनेक प्रकल्प जनतेच्या चरणी समर्पित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि या विकास उपक्रमांसाठी त्यांनी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन केले.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
August 15th, 03:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरून 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित केले. त्यांचे हे भाषण 103 मिनिटांचे असून लाल किल्ल्यावरील सर्वात जास्त काळ चाललेले आणि महत्त्वाचे भाषण ठरले. या भाषणात, त्यांनी 2025 पर्यंत विकसित भारतासाठी एक महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. आत्मनिर्भरता, नावीन्यपूर्णता, आणि नागरिकांचे सक्षमीकरण यावर पंतप्रधानांनी भर दिला. एकेकाळी दुसऱ्यांवर अवलंबून असलेला देश, आज जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने भरलेला, तंत्रज्ञानाने प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.पंतप्रधान मोदी यांचे 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे भाषण: विकसित भारत 2047 साठी एक दृष्टीकोन
August 15th, 11:58 am
79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून तब्बल 103 मिनिटांचे त्यांचे सर्वात मोठे आणि सर्वात निर्णायक भाषण दिले, ज्यामध्ये त्यांनी 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी एक धाडसी आराखडा मांडला. स्वयंपूर्णता , नवोन्मेष आणि नागरिक सक्षमीकरणावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून, पंतप्रधानांनी इतर देशांवर अवलंबून असलेला देश ते जागतिक स्तरावरचा प्रचंड आत्मविश्वास असलेला , तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या लवचिक देश हा आतापर्यंतचा भारताचा प्रवास अधोरेखित केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केलेल्या प्रमुख घोषणा
August 15th, 10:32 am
79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या 12व्या स्वातंत्र्यदिन संबोधनात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याला भारताच्या पुढील प्रगतीच्या नव्या अध्यायाचे प्रक्षेपण केंद्र बनवले. त्यांनी अनेक धाडसी घोषणा केल्या, ज्यामुळे भारत केवळ पावले टाकणार नाही, तर भविष्याकडे झेप घेण्यास सज्ज आहे, हे स्पष्ट झाले. भारताचा पहिला सेमीकंडक्टर चिप तयार करण्यापासून ते जेट इंजिन निर्मितीपर्यंत, अणुऊर्जा क्षमता दहापट वाढवण्यापासून ते ₹1 लाख कोटींच्या युवक रोजगार योजनेपर्यंत, भारत आपले भविष्य स्वतः ठरवेल, स्वतःचे नियम घालेल आणि 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करेल, असा त्यांचा संदेश स्पष्ट होता.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेलं भाषण
August 15th, 07:00 am
स्वातंत्र्याचे हे महापर्व, 140 कोटी संकल्पाचे पर्व आहे. स्वातंत्र्याचे हे पर्व सामूहिक सिद्धींचे, गौरवाचे पर्व आहे. आणि हृदय अपेक्षांनी भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्याने बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा... भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, मग तो वाळवंटी भाग असो, किंवा हिमालयाची शिखरे असोत, सागर किनारे असोत, किंवा दाट लोकसंख्येचे भाग, प्रत्येक भागातून एकच आवाज घुमत आहे, एकच जयघोष आहे, आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय मातृभूमीचे जयगान आहे …भारतात 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा
August 15th, 06:45 am
79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना घटना समिती, स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांना आदरांजली वाहिली. भारत नेहमीच आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 2047 पर्यंत विकसित भारत साध्य करण्याच्या उद्देशाने GST सुधारणा, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि सुदर्शन चक्र मिशन या प्रमुख उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. पंचायत सदस्य आणि ड्रोन दीदी सारख्या विशेष अतिथींनी लाल किल्ल्यावरील सोहळ्याला हजेरी लावली.पंतप्रधानांनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेव्हिअर मिली यांची घेतली भेट
July 06th, 01:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष महामहीम जेव्हिअर मिली यांची भेट घेतली. पंतप्रधान कासा रोझादामध्ये पोहोचले, तेव्हा राष्ट्राध्यक्ष मिली यांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. काल बुएनोस आयर्समध्ये आगमनानंतर पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. ही भेट विशेष महत्त्वाची आहे, कारण 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला झालेली भारतीय पंतप्रधानांची ही पहिली द्विपक्षीय भेट आहे. भारत-अर्जेंटिना संबंधांचे हे एक महत्त्वाचे वर्ष आहे, कारण दोन्ही देश राजनैतिक संबंध स्थापनेच्या 75 वर्षांची पूर्तता साजरी करत आहेत. पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मिली यांचे आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे त्यांनी केलेल्या आतिथ्याबद्दल आभार मानले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसच्या अध्यक्षांनी सायप्रस आणि भारतातील प्रमुख उद्योजकांशी साधला संवाद
June 16th, 02:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांनी आज लिमासोल येथे झालेल्या गोलमेज परिषदेत सायप्रस आणि भारतातील आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधला. या बैठकीला बँकिंग, वित्तीय संस्था, उत्पादक, संरक्षण, दळणवळण, नौवहन, तंत्रज्ञान, नवोन्मेष, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान सेवा, पर्यटन आणि वाहतूक अशा विभिन्न क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.सायप्रस येथे भारत-सायप्रस व्यापार गोलमेज बैठकीतील पंतप्रधानांचे भाषण
June 15th, 11:10 pm
सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानू इच्छितो कारण आज ते स्वतः विमानतळावर माझ्या स्वागतासाठी आले होते. त्यांनी व्यापार क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींसोबत इतकी भव्य गोलमेज बैठक आयोजित केली, त्याबद्दल देखील मी खूप आभारी आहे. त्यांनी माझ्याप्रती तसेच आपल्या भागीदारीप्रती जे सकारात्मक विचार व्यक्त केले त्याबद्दल देखील मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो.डॉ.एम आर श्रीनिवासन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
May 20th, 01:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे दिग्गज डॉ.एम.आर.श्रीनिवासन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.हरयाणातील यमुनानगर येथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटन/शिलान्यासप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
April 14th, 12:00 pm
हरयाणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री नायब सिंग सैनी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनोहर लाल जी, राव इंद्रजीत सिंग जी, कृष्णपाल जी, हरयाणा सरकारचे मंत्रीमंडळ, खासदार आणि आमदारगण आणि माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, हरयाणातील माझ्या भावंडांना मोदींचा राम-राम!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणात यमुना नगर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
April 14th, 11:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणात यमुनानगर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले तसेच त्यांच्या हस्ते या प्रकल्पांचा कोनशीला समारंभ झाला. हरियाणाच्या जनतेला शुभेच्छा देऊन त्यांनी हरियाणाच्या पवित्र भूमीला आदरांजली वाहिली आणि ही भूमी माता सरस्वतीचे उत्पत्तिस्थान, मंत्रादेवीचे निवासस्थान, पंचमुखी हनुमानाची आणि पवित्र कपालमोचन साहिब यांची भूमी असल्याचा आवर्जून उल्लेख केला. “हरियाणा म्हणजे संस्कृती, भक्ती आणि समर्पण यांचा संगम आहे,” ते म्हणाले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आणि प्रेरणा भारताच्या विकासात्मक वाटचालीला मार्गदर्शक ठरत आहे हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.