राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी जवानांना दिल्या शुभेच्छा
October 16th, 09:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त एनएसजी जवानांच्या अतुलनीय शौर्य आणि समर्पणाचे कौतुक केले आहे. दहशतवादाच्या धोक्यापासून देशाचे संरक्षण करण्यात, आपल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आणि महत्वपूर्ण राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण करण्यात एनएसजीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा दल)च्या जवानांचे एनएसजी स्थापनादिनानिमित्त केले अभिवादन
October 16th, 11:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा दल)च्या जवानांच्या अढळ समर्पण, धैर्य आणि निर्धाराचे कौतुक केले. एनएसजी स्थापनादिनानिमित्त त्यांनी एनएसजीच्या सर्व जवानांचे अभिवादन केले.