Prime Minister condoles the passing of His Majesty King Harald V of Norway
August 28th, 04:33 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi condoled the passing of His Majesty King Harald V of the Kingdom of Norway. Recalling his meeting with His Majesty during his visit to Norway earlier this year, Shri Modi remembered his warmth and profound sense of service to the people and nation of Norway.प्रज्ञानंदच्या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन
June 06th, 02:16 pm
प्रज्ञानंदच्या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. ही खरोखरच एक मोठी कामगिरी असून ती त्याच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचे दर्शन घडवते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तसेच, भविष्यातील त्याच्या वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.Rozgar Mela reflects our Government’s commitment to empowering the Yuva Shakti with new opportunities: PM Modi
May 23rd, 11:15 am
At the 19th Rozgar Mela, PM Modi distributed over 51,000 appointment letters and said India’s growing investments, global partnerships and expanding sectors are creating new opportunities for the youth. He highlighted rising opportunities across technology, manufacturing, startups, defence, infrastructure and public service as India moves towards the vision of Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात 51,000 हून अधिक तरुणांना शासकीय नियुक्ती पत्रांचे वाटप
May 23rd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे 19 व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हा दिवस देशभरातील हजारो तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सरकारी सेवेत नव्याने रुजू झालेल्या सर्व तरुणांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी रेल्वे, बँकिंग, संरक्षण, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांतील भारताच्या विकासात हे तरुण लवकरच महत्त्वपूर्ण योगदान देतील, यावर त्यांनी भर दिला. येत्या काळात तुम्ही सर्वजण विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहात, असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिनलंडच्या पंतप्रधानांसोबत बैठक
May 19th, 06:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि. 19 मे 2026 रोजी ओस्लो इथे आयोजित तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर फिनलंडचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.नॉर्वे-भारत व्यापार आणि संशोधन शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 18th, 11:49 pm
नॉर्वे आणि भारताच्या व्यावसायिक आणि संशोधन समुदायांच्या दरम्यान आज येथे उपस्थित राहता मला अतिशय आनंद होत आहे. मला काही सहभागींचे म्हणणे ऐकण्याची संधी मिळाली, आणि त्यांचे विचार ऐकून आपल्या भागीदारीचा पाया अत्यंत मजबूत असल्याचा आत्मविश्वास मला मिळाला आहे.भारत-नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान झाले सहभागी
May 18th, 08:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओस्लो येथे भारत-नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेत सहभागी झाले. या शिखर परिषदेत महामहीम युवराज हाकोन आणि नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गहर स्टोर देखील सहभागी झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबत केली द्विपक्षीय चर्चा
May 18th, 08:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गहर स्टोर यांच्यासोबत ओस्लो इथे द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि नॉर्वे यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतीक म्हणून, पंतप्रधान स्टोर यांनी आज सकाळी पंतप्रधान मोदी यांचे ओस्लो विमानतळावर आगमन झाल्यावर अत्यंत उत्साहाने स्वागत केले.पंतप्रधानांची नॉर्वेचे राजे महामहीम किंग हॅराल्ड पाचवे यांच्याशी भेट
May 18th, 07:36 pm
पंतप्रधान मोदींनी ओस्लो येथील रॉयल पॅलेसमध्ये नॉर्वेचे राजे महामहीम किंग हॅराल्ड पाचवे यांची भेट घेतली, जिथे दोन्ही नेत्यांनी वाढत्या भारत-नॉर्वे भागीदारी आणि विविध क्षेत्रांमधील, विशेषतः नवीन तंत्रज्ञानातील प्रगतीवर चर्चा केली. या भेटीनंतर पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ दुपारच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट ग्रँड क्रॉस प्रदान
May 18th, 07:35 pm
ओस्लो येथे आयोजित एका विशेष समारंभात, नॉर्वेचे महामहीम राजे हेराल्ड पंचम यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट' हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा नॉर्वेचा परदेशी राष्ट्रप्रमुखांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान असून, नॉर्वेच्या हितासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेच्या सन्मानार्थ तो दिला जातो.नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 18th, 04:44 pm
मी गेल्या वर्षीच नॉर्वेच्या दौऱ्यावर येणार होतो, मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे तो दौरा मला स्थगित करावा लागला. त्या कठीण कालखंडात नॉर्वेने दहशतवादाविरोधात भारतासोबत खंबीरपणे उभे राहून खऱ्या मैत्रीची प्रचिती दिली. आज नॉर्वेमध्ये आलेलो असताना, त्या वेळी दाखवलेल्या एकजुटीबाबत मी मनापासून आभार व्यक्त करतो.पंतप्रधान मोदींचे नॉर्वेमध्ये आगमन
May 18th, 01:00 pm
पंतप्रधान मोदींचे ओस्लो, नॉर्वे येथे आगमन झाले, जी गेल्या चार दशकांहून अधिक काळातील भारताकडून नॉर्वेला झालेली पहिलीच पंतप्रधाकीय भेट ठरली. त्यांच्या आगमनावर पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांनी त्यांचे उत्साही स्वागत केले.लोक काँग्रेस आणि बीआरएसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले आहेत: पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये
May 15th, 07:56 am
पंतप्रधान मोदी 15-20 मे 2026 दरम्यान युएई (UAE), नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध राष्ट्रप्रमुखांची भेट घेतील आणि प्रमुख क्षेत्रांमधील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा करतील. या दौऱ्याच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये स्वीडनमधील 'युरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री' आणि ओस्लो येथील '3 री भारत-नॉर्डिक शिखर परिषद' यांमधील त्यांच्या सहभागाचा समावेश आहे.पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा ( 15 मे - 20 मे, 2026)
May 11th, 09:00 pm
पंतप्रधान मोदी 15 मे ते 20 मे 2026 या कालावधीत युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतील आणि विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करतील. नेदरलँड्समध्ये पंतप्रधान राजा विलेम-अलेक्झांडर यांची भेट घेतील आणि पंतप्रधान रॉब जेटन यांच्याशी चर्चा करतील. स्वीडनमध्ये ते पंतप्रधान क्रिस्टरसन यांच्याशी संवाद साधतील. नॉर्वेमध्ये ते राजा हॅराल्ड 5 वे यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर, ते इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करण्यासाठी इटलीला भेट देतील.पंतप्रधानांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांचे पुन्हा निवडून आल्याबद्दल केले अभिनंदन
September 10th, 06:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांचे त्यांच्या पुनर्निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी नॉर्वेसोबत विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
April 15th, 06:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसेच जागतिक घडामोडींवर चर्चा केली.पंतप्रधानांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 19th, 05:44 am
जी-20 शिखरपरिषदेनिमित्त रिओ दि जानेरो येथे दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेथे नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोर यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यात झाले दूरध्वनी संभाषण
September 09th, 07:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेचे पंतप्रधान, जोनास गहर स्टोर यांच्याशी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.दुसरी भारत-नॉर्डिक शिखर परिषद
May 04th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन, आईसलँडच्या पंतप्रधान कतरिन जोकोब्सदोतीर, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गेर स्टोर, स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालिना अँडरसन आणि फिनलँडच्या पंतप्रधान सॅना मरीन यांच्यासह दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले.पंतप्रधानांची नॉर्वेच्या पंतप्रधानांशी चर्चा
May 04th, 02:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गेर स्टोर यांची कोपनहेगन येथे दुसऱ्या भारत- नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली. स्टोर यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये नॉर्वेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दोन्ही पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती.