स्वामी विवेकानंद यांच्या निर्वाणदिनी पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
July 04th, 01:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या निर्वाणदिनी त्यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान म्हणतात- भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आध्यात्मिक परंपरा, आणि राष्ट्रचेतना जगासमोर आणण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी दिलेले योगदान अतुलनीय असून, येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळणार आहे. त्यांची प्रगाढ बुद्धिमत्ता आणि त्यांनी निर्माण केलेले कालातीत आदर्श- हे देशातील कोट्यवधी तरुणांना दिशा देणारे बळ आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी देशाच्या सामूहिक निर्धाराला स्फूर्ती आणि ऊर्जा देण्याचे कार्य त्यांचा आध्यात्मिक संदेश सातत्याने करत राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.