सायप्रस आणि भारत यांच्यातील सर्वसमावेशक भागीदारीच्या अंमलबजावणीसंबंधी संयुक्त निवेदन
June 16th, 03:20 pm
सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी 15 ते 16 जून 2025 दरम्यान सायप्रसच्या अधिकृत दौ-यावर आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक स्वागत केले. गेल्या दोन दशकांहून अधिक काळानंतर पहिल्यांदा भारतीय पंतप्रधानांचा सायप्रसला दौरा होत आहे, आणि पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे. हा एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे उभय राष्ट्रांमधील सखोल,दृढ आणि कायमस्वरूपी मैत्रीला पुन्हा एकदा पुष्टी मिळते. ही भेट केवळ ऐतिहासिक मानली जाते असे नाही, तर संयुक्त धोरणात्मक दृष्टिकोन आणि परस्पर विश्वास आणि आदर यांच्यावर आधारित भविष्यकालीन भागीदारीचे पर्व साजरे करते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची भेट घेतली
June 16th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्याशी चर्चा केली. अध्यक्षांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर, सायप्रसचे अध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस यांनी पंतप्रधानांचे समारंभपूर्वक औपचारिक स्वागत केले. काल सायप्रस इथे दाखल झाल्यानंतर क्रिस्टोडौलिडेस यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे स्नेहपूर्ण स्वागत केले यातून दोन्ही राष्ट्रांमधील परस्पर विश्वास आणि चिरस्थायी मैत्री दिसून येते.सायप्रसच्या अध्यक्षांसमवेतच्या संयुक्त पत्रकार परिषदेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य
June 16th, 01:45 pm
सर्वप्रथम स्नेहपूर्ण स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी आदरणीय राष्ट्राध्यक्षांचे मनःपूर्वक आभार मानतो.सायप्रसच्या भूमीवर काल पाऊल ठेवल्यापासून, राष्ट्राध्यक्ष आणि या देशाच्या जनतेचा स्नेह आणि आपुलकी याने मी भारावून गेलो आहे.सायप्रसचा सर्वोच्च सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III' स्वीकारताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 16th, 01:35 pm
द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III पुरस्कार देऊन मला गौरवल्याबद्दल मी तुमचे, सायप्रस सरकारचे आणि येथील जनतेचे आभार मानतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मॅकॅरिओस III हा सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
June 16th, 01:33 pm
सायप्रसचे अध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार -ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III देऊन गौरवण्यात आले.पंतप्रधान मोदी सायप्रसमध्ये पोहोचले
June 15th, 06:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी सायप्रसमध्ये पोहोचले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदुलिदीस यांनी विमानतळावर त्यांचे उत्साहात स्वागत केले.पंतप्रधानांचे सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौर्यापूर्वीचे निवेदन
June 15th, 07:00 am
15-16 जून दरम्यान, मी सायप्रस प्रजासत्ताकाचा दौरा करणार आहे. हा दौरा राष्ट्राध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांच्या निमंत्रणावरून होत आहे. सायप्रस हा भूमध्य सागरी क्षेत्रातील आणि युरोपियन युनियनमधील भारताचा निकटचा मित्र व महत्त्वाचा भागीदार आहे. या भेटीत ऐतिहासिक संबंध दृढ करण्याची आणि व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, तंत्रज्ञान तसेच जनतेतील परस्पर संबंध वाढवण्याची संधी मिळणार आहे.पंतप्रधान मोदी 15 ते 19 जून दरम्यान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशियाचा दौरा करणार.
June 14th, 11:58 am
पंतप्रधान मोदी 15-16 जून रोजी सायप्रसला, 16-17 जून रोजी G-7 परिषदेसाठी कॅनडाला आणि 18 जून रोजी क्रोएशियाला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष ख्रिस्तोदुलिदीस यांच्याशी चर्चा करतील आणि लिमासोल इथे उद्योग क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांना संबोधित करतील. त्यानंतर कॅनडामध्ये, G7 परिषदेत, पंतप्रधान मोदी G-7 सदस्य देशांच्या नेत्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करतील. क्रोएशियामध्ये, पंतप्रधान मोदी पंतप्रधान प्लेनकोविच यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि क्रोएशियाचे राष्ट्रपती झोरान मिलानोविच यांची भेट घेतील.