पंतप्रधान मोदी 15 ते 19 जून दरम्यान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशियाचा दौरा करणार.
June 14th, 11:58 am
पंतप्रधान मोदी 15-16 जून रोजी सायप्रसला, 16-17 जून रोजी G-7 परिषदेसाठी कॅनडाला आणि 18 जून रोजी क्रोएशियाला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष ख्रिस्तोदुलिदीस यांच्याशी चर्चा करतील आणि लिमासोल इथे उद्योग क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांना संबोधित करतील. त्यानंतर कॅनडामध्ये, G7 परिषदेत, पंतप्रधान मोदी G-7 सदस्य देशांच्या नेत्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करतील. क्रोएशियामध्ये, पंतप्रधान मोदी पंतप्रधान प्लेनकोविच यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि क्रोएशियाचे राष्ट्रपती झोरान मिलानोविच यांची भेट घेतील.