इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी
January 07th, 03:03 pm
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृढनिश्चय आणि इच्छाशक्तीचे माहात्म्य सांगणारे सुभाषित सामायिक केले.
January 02nd, 09:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या असून येणाऱ्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपल्या कार्यात यश मिळो अशी मनोकामना व्यक्त केली आहे.जीवनाचे ध्येय सद्गुणांनी युक्त असावे, हे अधोरेखित करणारे सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
January 01st, 11:24 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नववर्ष 2026 च्या आगमनानिमित्त देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 या नववर्षासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत
January 01st, 11:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 या नववर्षासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधानांनी आयएनएसव्ही कौंडिण्यच्या पथकाला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या
December 31st, 11:30 pm
खोल समुद्रात सध्या प्रवास करत असलेल्या आयएनएसव्ही कौंडिण्यच्या पथकाकडून प्राप्त झालेल्या छायाचित्राबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. देश 2026 या नववर्षाचे स्वागत करण्यास सज्ज होत असताना पंतप्रधानांनी पथकाच्या उत्साहाची प्रशंसा करत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 28th, 11:30 am
2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.पंतप्रधानांनी नवरोजच्या सर्वांना दिल्या शुभेच्छा
August 16th, 01:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारशी नववर्ष,नवरोज यानिमित्ताने आज सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोयला बैशाखच्या निमित्ताने दिल्या शुभेच्छा.
April 15th, 08:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोयला बैशाखच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (120 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
March 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज या अत्यंत शुभ दिवशी मला तुमच्यासोबत 'मन की बात' करण्याची संधी मिळाली आहे. आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातली प्रतिपदा तिथी आहे. आजपासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होत आहे. भारतीय नववर्ष देखील आजपासून सुरू होत आहे. यावेळी विक्रम संवत 2082 (दोन हजार ब्याऐंशी) सुरू होत आहे. सध्या तुमची अनेक पत्रं माझ्यासमोर आहेत. काही बिहारची आहेत, काही बंगालची आहेत, काही तामिळनाडूची तर काही गुजरातची आहेत. यामध्ये लोकांनी त्यांचे विचार अतिशय मनोरंजक पद्धतीनं लिहिले आहेत. अनेक पत्रांमध्ये शुभेच्छा आणि अभिनंदनाचे संदेश देखील आहेत. पण आज मला काही संदेश तुम्हाला ऐकवावेसे वाटत आहेत -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना नववर्ष 2025 निमित्त दिल्या शुभेच्छा
January 01st, 10:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व देशवासीयांना नववर्ष 2025 निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरोझ सणाच्या देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
August 15th, 04:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पारशी नववर्षाच्या नवरोझ निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी उज्ज्वल वर्ष 2024 साठी सर्वांना दिल्या शुभेच्छा
January 01st, 08:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना वर्ष 2024 उज्ज्वल जावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.काल संध्याकाळच्या तामिळ नववर्ष साजरी करतानाच्या संस्मरणीय कार्यक्रमाची क्षणचित्र पंतप्रधानांनी केली सामायिक
April 14th, 09:32 am
केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी काल संध्याकाळी संस्मरणीय अशा तमिळ नववर्ष साजरा करण्याच्या कार्यक्रमाची क्षणचित्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहेत.पंतप्रधानांनी दिल्या नव संवत्सरच्या शुभेच्छा
March 22nd, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवसंवत्सर निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन
January 25th, 05:22 pm
सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष सिसी आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे भारतामध्ये हार्दिक स्वागत करू इच्छितो. राष्ट्राध्यक्ष सिसी उद्या आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होत आहेत. संपूर्ण भारतासाठी ही सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे. मला आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की, इजिप्तच्या सैन्याची एक तुकडीसुद्धा आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन पथसंचलनाची शोभा वृद्धिंगत करत आहे.पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा
January 01st, 10:56 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.PM Modi's remarks at joint press meet with Nepal PM Deuba
April 02nd, 01:39 pm
Prime Minister Narendra Modi's remarks at joint press meet with Nepal Prime Minister Sher Bahadur Deubaपंतप्रधानांनी देशवासियांना नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा
January 01st, 12:47 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.राजकोट, गुजरात येथे एम्सच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण
December 31st, 11:34 am
केम छै, गुजरात में ठण्डी वण्डी छै के नहीं, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, मुख्यमंत्री विजय रुपाणीजी, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनजी, उपमुख्यमंत्री भाई नितीन पटेलजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी चौबे, मनसुख भाई मंडावीयाजी, पुरुषोत्तम रुपालाजी, भूपेंद्रसिंग विटासामाजी, किशोर कानानीजी, इतर सर्व मंत्री, खासदार, इतर सर्व मान्यवर.पंतप्रधानांकडून राजकोट एम्सचे भूमीपूजन
December 31st, 11:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राजकोट एम्सचे भूमीपूजन केले. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.