पश्चिम बंगालमधील मालदा येथील विविध रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
January 17th, 02:00 pm
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस जी; केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, शांतनू ठाकूर जी, सुकांत मजुमदार जी; पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी जी; संसदेतील माझे सहकारी शामिक भट्टाचार्य जी, खगेन मुर्मू जी, कार्तिक चंद्र पॉल जी; उपस्थित सर्व मान्यवर, महिला आणि सज्जनहो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे 3,250 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली
January 17th, 01:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे 3,250 कोटी रुपयांच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. याचा उद्देश पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील प्रदेशातील संचारसंपर्क मजबूत करणे तसेच विकासाला गती देणे हा आहे. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, आज मालदा येथून पश्चिम बंगालच्या प्रगतीला गती देण्याच्या मोहिमेला आणखी वेग आला आहे. त्यांनी अधोरेखित केले की, पश्चिम बंगालच्या विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे नुकतेच उद्घाटन करून ते राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी सांगितले की, पश्चिम बंगालसाठी नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. हे प्रकल्प लोकांचा प्रवास सुलभ करतील, तसेच व्यापार आणि वाणिज्य सुलभ करतील. त्यांनी यावर जोर दिला की, येथे स्थापन करण्यात आलेल्या नवीन रेल्वे देखभाल सुविधांमुळे बंगालच्या तरुणांना नवीन संधी उपलब्ध होतील.Prime Minister Narendra Modi to visit West Bengal
January 16th, 01:55 pm
PM Modi will also visit West Bengal on 17–18 January 2026 to launch multiple development projects aimed at strengthening connectivity and accelerating development in West Bengal and the North-Eastern region. In Malda, the PM will flag off Vande Bharat Sleeper and Amrit Bharat trains and inaugurate various development projects. On 18 January, the PM will launch multiple development projects worth around ₹830 crore at Singur in Hooghly district.आसाममधील गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 20th, 03:20 pm
आपले भाषण सुरू करण्यापूर्वी, मी आपल्या सर्वाना एक विनंती करीत आहे, आजचा हा 'विजय दिन' केवळ आसामसाठीच नाही तर संपूर्ण ईशान्येसाठी विकासाचा उत्सव आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपले मोबाईल फोन काढावेत, फोनचा टॉर्च, फ्लॅश लाईट सुरू करावा आणि विकासाच्या या उत्सवात सहभागी व्हावे. प्रत्येकाने आपल्या मोबाईल फोनचा टॉर्च-फ्लॅश सुरू करावा आणि प्रचंड टाळ्यांचा गजरही करावा. संपूर्ण देशाला ऐकू आले पाहिजे आणि दिसले पाहिजे की, आसाम आता विकासाचा उत्सव साजरा करत आहे. ज्यावेळी विकासाचा प्रकाश पोहोचतो, त्यावेळी जीवनाचा प्रत्येक मार्ग नवीन उंची गाठू लागतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन
December 20th, 03:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन झाले. या उद्घाटनामुळे आसामधील दळणवळणीय जोडणी, अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि जागतिक सहभागातील परिवर्तनाच्या दिशेने एक मोठा टप्पा गाठला गेला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. आजचा दिवस आसाम आणि ईशान्य भारताच्या विकास आणि प्रगतीचा सोहळा आहे असे ते म्हणाले. जेव्हा प्रगतीची किरणे लोकांपर्यंत पोहोचतात, त्यावेळी जीवनातील प्रत्येक मार्ग नव्या उंचीला स्पर्श करू लागतो, असे त्यांनी अधोरेखित केले. आसामच्या भूमीशी आपली नाळ घट्टपणे जोडलेली असून, इथल्या लोकांचे प्रेम आणि स्नेह, तसेच विशेषतः आसाम आणि ईशान्य भारतातील माता-भगिनींमधला जिव्हाळा आपल्याला सातत्याने प्रेरणा देत आला आहे, त्यातूनच या क्षेत्राच्या विकासाचा सामूहिक संकल्पही मजबूत झाला आहे असे त्यांनी सांगितले. आज आसामच्या विकासात पुन्हा एकदा नवी अध्याय जोडला गेला आहे ही बाब त्यांनी नमूद केली. भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या गीतातील ओळींचा संदर्भही त्यांनी दिला. विशाल ब्रह्मपुत्रा नदीचा काठ उजळून निघेल, अंधाराची प्रत्येक भिंत तुटून पडेल आणि हाच राष्ट्राचा संकल्प आणि पवित्र प्रतिज्ञा आहे, त्यामुळे हे निश्चितपणे घडून येईल असाच त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्रीय मंत्रिमंडळाची 4 बहुमार्गीकरण प्रकल्पांना मंजुरी; महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा आणि झारखंड या राज्यांमधील 13 जिल्ह्यांचा समावेश; भारतीय रेल्वेचे जाळेही सुमारे 574 किमीने विस्तारणार
July 31st, 03:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या 4 प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी सुमारे 11,169 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. हे प्रकल्प खाली नमूद केले आहेत:विकसित भारत विकसित पश्चिम बंगाल' कार्यक्रमात सिलीगुडी इथे पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 09th, 04:10 pm
नैसर्गिक सौंदर्य आणि चहासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर बंगालच्या या भूमीला भेट देताना मला खूप आनंद होत आहे. आज येथे हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. विकसित बंगालच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या विकासकामांसाठी मी बंगाल आणि उत्तर बंगालमधील जनतेचे अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे ‘विकसित भारत विकसित पश्चिम बंगाल’ कार्यक्रमाला केले संबोधित
March 09th, 03:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे ‘विकसित भारत विकसित पश्चिम बंगाल’ कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये 4500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले.आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मे रोजी दाखवणार हिरवा झेंडा
May 28th, 05:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस या रेल्वेगाडीला 29 मे रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.हावडा आणि न्यू जलपायगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना आणि कोलकाता मेट्रोच्या पर्पल लाईनवरील जोका- तराताला पट्ट्याच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले भाषण
December 30th, 11:50 am
आज मला तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष भेटायचे होते, मात्र माझ्या खासगी कारणास्तव मी तुमच्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, यासाठी मी तुमची, बंगालची माफी मागतो. बंगालच्या पुण्य भूमीला, कोलकाताच्या ऐतिहासिक भूमीला वंदन करण्याची आज मला संधी आहे. बंगालच्या कणा-कणांमध्ये स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समाहित आहे. ज्या भूमीवरून वंदे मातरमचा जयघोष झाला, त्या भूमीवर आज वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आज 30 डिसेंबर तारखेलाही इतिहासात खूप महत्व आहे. 30 डिसेंबर, 1943, या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान बेटावर तिरंगा ध्वज फडकवला आणि भारताच्या स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते.PM flags off Vande Bharat Express connecting Howrah to New Jalpaiguri via video conferencing
December 30th, 11:25 am
PM Modi flagged off the Vande Bharat Express, connecting Howrah to New Jalpaiguri as well as inaugurated other metro and railway projects in West Bengal via video conferencing. The PM linked reforms and development of Indian Railways with the development of the country. He said that the central government was making record investments in the modern railway infrastructure.पंतप्रधान 30 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
December 29th, 12:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर 2022 रोजी पश्चिम बंगालला भेट देतील. सकाळी 11:15 वाजता पंतप्रधान हावडा रेल्वे स्थानकावर पोहोचतील. तिथे हावडा ते न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला ते हिरवा झेंडा दाखवतील. कोलकाता मेट्रोच्या पर्पल लाईनच्या जोका-तरताला मार्गाचे उद्घाटनही करतील आणि विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करुन ते राष्ट्राला समर्पित करतील. पंतप्रधान, दुपारी 12 वाजता, आयएनएस नेताजी सुभाष येथे पोहोचतील. तिथे ते नेताजी सुभाष यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतील नंतर डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी – राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्थेचे (डीएसपीएम – एनआयडब्लूएएस) उद्घाटन करतील. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियाना अंतर्गत ते पश्चिम बंगालमधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी करुन ते राष्ट्राला समर्पित करतील. दुपारी 12:25 च्या सुमारास पंतप्रधान राष्ट्रीय गंगा परिषदेच्या दुसऱ्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.