श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘सिव्हिल एन्क्लेव्ह’ च्या मोठ्या विस्ताराला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
February 24th, 04:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांविषयक मंत्रिमंडळ समितीने आज श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘सिव्हिल एन्क्लेव्ह’ च्या विस्तार - विकासाला मान्यता दिली. या कार्यासाठी सुमारे खर्च 1,677 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. काश्मीर खोऱ्यात हवाई वाहतुकीची पायाभूत सुविधा आणि संपर्क यंत्रणा मजबूत करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. या प्रकल्पात सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी बॅरेक्स बांधण्याचाही समावेश आहे. भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) बडगाम हवाई तळाअंतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे या विमानतळाचे कार्यान्वयन केले जाते. वर्ष 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून सुविधा उपलब्ध करून दिलेले हे विमानतळ, श्रीनगर शहरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे.पंतप्रधान 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीला भेट देणार
October 19th, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला ते आर जे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन करतील. हे रुग्णालय विविध नेत्र विकारांसाठी सर्वसमावेशक वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध करून देईल. रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर दुपारी 4.15 च्या सुमाराला ते वाराणसीमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.बिहारमधील बिहटा येथे 1413 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चासह नवीन सिव्हिल एन्क्लेव्ह विकसित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
August 16th, 09:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने बिहारच्या पटणामधील बिहटा येथे 1413 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चासह नवीन सिव्हिल एन्क्लेव्ह विकसित करण्याच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.पश्चिम बंगालच्या बागडोगरा विमानतळावर 1549 कोटी रुपये खर्चून नवीन सिव्हिल एन्क्लेव्ह विकसित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
August 16th, 09:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील बागडोगरा विमानतळावर नवीन सिव्हिल एन्क्लेव्ह विकसित करण्याच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यासाठी 1549 कोटी रुपये खर्च येणार आहे.