Harivansh Ji plays a key role in instilling confidence that the country can make a significant leap forward: PM Modi in the Rajya Sabha
April 17th, 11:10 am
Addressing the Rajya Sabha, PM Modi extended heartfelt congratulations to Shri Harivansh on his election as Dy Chairman of the House. Lauding Harivansh Ji’s remarkable contributions to journalism, the PM said that new Members of Parliament from both Houses could learn immensely from his insights. The PM also highlighted the significant work done by Harivansh Ji across various sectors.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेत भाषण
April 17th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित केले आणि राज्यसभेचे उपसभापती म्हणून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या हरिवंश यांचे हार्दिक अभिनंदन केले. हे एक ऐतिहासिक यश असल्याचे अधोरेखित करत, हरिवंश यांच्यावर आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवावर, सभागृहाने दाखवलेला दृढ विश्वास यातून प्रतिबिंबीत होतो, असे पंतप्रधान म्हणाले. “ सलग तिसऱ्यांदा उपसभापती म्हणून निवडून येणे, हे त्यांच्या अनुभवांवर, त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनावर आणि आणि त्यांच्या प्रतिष्ठित कार्यशैलीवर, सभागृहाने केलेले शिक्कामोर्तब आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल बालेंद्र शाह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन
March 27th, 01:27 pm
बालेंद्र शाह यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मोदी म्हणाले, “तुमची नियुक्ती ही नेपाळच्या जनतेने तुमच्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. भारत-नेपाळ मैत्री आणि दोन्ही कडील जनतेला परस्पर लाभदायक सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी मी तुमच्यासोबत एकत्रित काम करण्यासाठी उत्सुक आहे.”केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील बाराबंकी ते बहराइच (101.515 किमी) या दरम्यान, 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल'वर आधारित चौपदरी नियंत्रित प्रवेश राष्ट्रीय महामार्ग-927 च्या बांधकामासाठी 6969.04 कोटी रुपयांच्या खर्चाला दिली मंजुरी
March 18th, 04:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने, उत्तर प्रदेशातील बाराबंकी ते बहराइच (101.515 किमी) या दरम्यान चौपदरी नियंत्रित प्रवेश असलेल्या राष्ट्रीय महामार्ग-927 च्या बांधकामाला 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' (एचएएम) अंतर्गत, 6969.04 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे.राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने नेपाळमधील निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांचे केले अभिनंदन
March 09th, 10:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि पार्टीचे ज्येष्ठ नेते बालेंद्र शाह यांच्याशी आज दूरध्वनीवरून सोहार्दपूर्ण संवाद साधला.पंतप्रधानांनी नेपाळ सरकारचे आणि जनतेचे निवडणुकांच्या यशस्वी व शांततापूर्ण आयोजनाबद्दल अभिनंदन केले.
March 07th, 05:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळची जनता व नेपाळ सरकारचे देशातील निवडणुकांच्या यशस्वी व शांततापूर्ण आयोजनाबद्दल अभिनंदन केले आहे.भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
January 03rd, 12:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, किरण रिजिजू जी, रामदास आठवले जी, राव इंद्रजीत जी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, त्यांना निघावे लागले आणि दिल्लीचे सर्व मंत्री सहकारी, दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना जी, महामहीम, राजनैतिक समुदायाचे सर्व माननीय सदस्य, बौद्ध विद्वान, धम्माचे अनुयायी, भगिनी आणि बंधुंनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन
January 03rd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, ‘द लाईट अँड द लोटस: रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’ (प्रकाश आणि कमळ: प्रबुद्धाचे अवशेष) असे शीर्षक असणाऱ्या, भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताचा वारसा परत आला आहे, भारताचा ठेवा परत आला आहे, असे या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. आजपासून भारतातील लोकांना भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष पाहता येतील आणि त्यांचे आशीर्वाद घेता येतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी या पावन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बौद्ध परंपरेशी संबंधित भिक्खू आणि धर्माचार्य देखील यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. भिक्खू आणि धर्माचार्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला नवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीला होणारा हा मंगल सोहळा अत्यंत प्रेरणादायी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष जगासाठी शांतता, समृद्धी आणि सलोख्याचा नवा अध्याय घेऊन येवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
October 05th, 04:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या जीवितहानी आणि व्यापक नुकसानाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या कठीण काळात नेपाळची जनता आणि नेपाळ सरकारप्रती भारताच्या ठाम समर्थनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. मोदी यांनी या संकटात आवश्यक त्या सर्व मदतीसाठी भारताची बांधिलकी अधोरेखित करत, भारत संकट काळात एक मित्रवत शेजारी आणि प्रथम प्रतिसाद देणारे राष्ट्र असल्याचे स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी संवाद साधला
September 18th, 01:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.Manipur is the crown jewel adorning the crest of Mother India: PM Modi in Imphal
September 13th, 02:45 pm
At the inauguration of projects worth over ₹1,200 crore in Imphal, PM Modi said a new phase of infrastructure growth has begun in Manipur. He noted that women empowerment is a key pillar of India’s development and Atmanirbhar Bharat, a spirit visible in the state. The PM affirmed his government’s commitment to peace and stability, stressing that return to a normal life is the top priority. He urged Manipur to stay firmly on the path of peace and progress.PM Modi inaugurates multiple development projects worth over Rs 1,200 crore at Imphal, Manipur
September 13th, 02:30 pm
At the inauguration of projects worth over ₹1,200 crore in Imphal, PM Modi said a new phase of infrastructure growth has begun in Manipur. He noted that women empowerment is a key pillar of India’s development and Atmanirbhar Bharat, a spirit visible in the state. The PM affirmed his government’s commitment to peace and stability, stressing that return to a normal life is the top priority. He urged Manipur to stay firmly on the path of peace and progress.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या हंगामी सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांना दिल्या शुभेच्छा
September 13th, 08:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या हंगामी सरकारच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल सुशीला कार्की यांना शुभेच्छा दिल्या. नेपाळमधील जनतेच्या शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी भारत दृढपणे वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.नेपाळमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधांनांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा संबंधी मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली
September 09th, 10:29 pm
हिमाचल प्रदेश व पंजाबच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी सुरक्षा संबंधी मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली. अनेक युवकांचा बळी घेणाऱ्या हिंसाचाराबद्दल पंतप्रधानांनी तीव्र खेद व्यक्त केला. त्यांनी नेपाळच्या जनतेला शांतता व एकात्मतेच्या तत्वांचे पालन करण्याचे कळकळीचे आवाहन केले. ‘एक्स’ वरील आपल्या निरनिराळ्या संदेशांमध्ये त्यांनी लिहिले,पंतप्रधानांनी बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने घेतली नेपाळच्या पंतप्रधानांची भेट
April 04th, 04:17 pm
बँकॉकमधील 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेतली.पंतप्रधान 03ते 06 एप्रिल 2025 दरम्यान थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार
April 02nd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होणाऱ्या 6व्या BIMSTEC शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी (3-4 एप्रिल, 2025) थायलंडला भेट देतील. त्यानंतर, ते अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायका यांच्या निमंत्रणावरून (4-6 एप्रिल, 2025) श्रीलंकेचा अधिकृत दौरा करतील.थायलंडमध्ये संवाद कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
February 14th, 08:30 am
थायलंडमधील संवादच्या या आवृत्तीत तुम्हा सर्वांसोबत सहभागी होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. भारत, जपान आणि थायलंडमधील अनेक प्रतिष्ठित संस्था आणि मान्यवर या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो आणि सर्व सहभागींना शुभेच्छा देतो.थायलंडमधील संवाद कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
February 14th, 08:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडमध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाद्वारे भाषण केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी थायलंडमधील संवादच्या कार्यक्रमाच्या आवृत्तीत सहभागी होण्याबाबतचा सन्मान व्यक्त केला आणि हा कार्यक्रम साध्य केल्याबद्दल भारत, जपान आणि थायलंडमधील प्रतिष्ठित संस्था आणि व्यक्तींचे कौतुक केले. त्यांनी सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या.भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
January 26th, 05:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदनासाठी आभार मानले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत साधला संवाद
January 25th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (24 जानेवारी 2025) लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार असलेल्या राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत संवाद साधला. या संवादाच्या निमित्ताने पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटता आपल्याबद्दलचा आनंदही अनेकांनी व्यक्त केला. ही भारतीय लोकशाहीची ताकद दर्शवणारी बाब असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.