पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
April 25th, 02:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक वाटचालीतील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत अत्यंत परिश्रमपूर्वक काम केले, भारताच्या अवकाश कार्यक्रमाला नव्या उंचीवर नेले असे पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करताना आणि भारतातील शिक्षण अधिक समग्र तसेच भविष्याला अनुसरून असावे याची सुनिश्चिती करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांकरता भारत नेहमीच डॉ. कस्तुरीरंगन यांचा ऋणी राहील. ते अनेक तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शक देखील होते, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधानांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांसोबतचा संवाद
September 06th, 04:15 pm
महोदय, एक संस्कृत शिक्षक असल्याने, माझे असे स्वप्न होते की मी मुलांना भारताच्या संस्कृतीची जाणीव करून द्यावी, ज्यामुळे त्यांना आपल्या सर्व मूल्यांची जाणीव होते, ज्याद्वारे आपण आपली मूल्ये आणि जीवनाचे आदर्श ठरवतो. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मी मुलांमध्ये संस्कृत भाषेची आवड निर्माण करून त्याला नैतिक शिक्षणाचा आधार बनवून विविध श्लोकांच्या माध्यमातून मुलांना जीवनमूल्ये शिकवण्याचा प्रयत्न केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी साधला संवाद
September 06th, 04:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7, लोककल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधला.