नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाच्या अध्यक्षांनी घेतली पंतप्रधानांची भेट
June 03rd, 03:03 pm
नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष राबी लामिछाने यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यु मीन आँग हलॅँग यांच्याशी केली चर्चा
June 01st, 08:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यु मीन आँग हलॅँग यांच्यात आज फलदायी चर्चा झाली.म्यानमारच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत आणि म्यानमारचे संयुक्त निवेदन
June 01st, 07:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आँग ह्लाइंग 30 मे ते 3 जून, 2026 या कालावधी साठी भारताच्या आपल्या पहिल्या अधिकृत दौ-यावर आले आहेत.श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
March 24th, 09:11 pm
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला.इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॉरिशसच्या पंतप्रधानांशी भेट
February 20th, 10:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या निमित्ताने मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या राज्य भेटीनंतर, पंतप्रधान रामगुलाम यांचा त्यांच्या चालू कार्यकाळातील हा दुसरा भारत दौरा आहे. अलिकडेच 9 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या झालेल्या नेत्यांच्या दूरध्वनी संभाषणानंतर ही भेट झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेले निवेदन
September 11th, 12:30 pm
आपली संस्कृती आणि संस्कार, अनेक शतकांपूर्वीपासून भारतातून मॉरिशसमध्ये पोहोचले आहेत आणि तिथल्या जीवनाच्या प्रवाहात स्थायिक झाले आहेत. काशीमधल्या गंगेच्या अखंड, अविरत प्रवाहाप्रमाणे, भारतीय संस्कृतीचा अखंड प्रवाह मॉरिशसला समृद्ध करत आहे. आणि आज,आपण काशीमध्ये मॉरिशसमधील मित्रांचे, स्नेहींचे स्वागत करत आहोत, ही केवळ औपचारिकता नाही; तर एक आत्मिक मिलन आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो की, भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नाहीत, तर एक कुटुंब आहे.पंतप्रधान 11 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या दौऱ्यावर
September 10th, 01:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडला भेट देणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
July 25th, 08:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माले येथील राष्ट्राध्यक्ष कार्यालयात मालदीव प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली. या बैठकीपूर्वी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले आणि रिपब्लिक स्क्वेअर येथे त्यांचे औपचारिक स्वागत केले. ही भेट स्नेहमय होती, आणि दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेल्या मैत्रीचा दाखला देणारी होती.युनायटेड किंगडम आणि मालदीव दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे प्रस्थान निवेदन
July 23rd, 01:05 pm
भारत आणि युके दरम्यान व्यापक धोरणात्मक भागीदारी असून, अलिकडच्या वर्षांत यामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. आमचे सहकार्य व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण, शिक्षण, संशोधन, शाश्वतता, आरोग्य आणि परस्परांच्या जनतेमधील संबंध, यासह विविध क्षेत्रांमध्ये विस्तारले आहेत. पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्या बरोबरच्या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमध्ये समृद्धी, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी परस्परांबरोबरची आर्थिक भागीदारी आणखी वाढवण्याची संधी आम्हाला मिळेल. या दौऱ्या दरम्यान, किंग चार्ल्स III (तृतीय) यांची भेट घेण्यासाठी देखील उत्सुक आहे.