शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी म्यानमारच्या राष्ट्र सुरक्षा आणि शांतता आयोगाचे अध्यक्ष सिनियर जनरल मिन ऑन्ग हलिंग यांची घेतली भेट
August 31st, 04:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या राज्य सुरक्षा आणि शांतता आयोगाचे अध्यक्ष सिनियर जनरल मिन आंग हलिंग यांची भेट घेतली. भारतासाठी 'नेबरहूड फर्स्ट', 'ॲक्ट ईस्ट' आणि 'इंडो-पॅसिफिक' धोरणांचा एक भाग म्हणून म्यानमारसोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत,असे पंतप्रधानांनी नमूद केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि विकास भागीदारी, संरक्षण आणि सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि सीमा व्यापार यासह द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक पैलूंवर आणखी प्रगती करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या संपर्कव्यवस्था प्रकल्पांमधील प्रगतीमुळे दोन्ही देशांच्या लोकांमध्ये अधिक संवाद वाढेल, तसेच भारताच्या 'ॲक्ट ईस्ट' धोरणात संकल्पना केलेल्या प्रादेशिक सहकार्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन मिळेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.पंतप्रधानांची युनायटेड किंगडम आणि मालदीव भेट (23 – 26 जुलै 2025)
July 20th, 10:49 pm
पंतप्रधान मोदी 23 - 26 जुलै दरम्यान UK ला अधिकृत भेट देणार असून मालदीवचा सरकारचे निमंत्रित अतिथी म्हणून दौरा करणार आहेत. ते पंतप्रधान स्टार्मर यांच्याशी विस्तृत चर्चा करतील तसेच CSP च्या प्रगतीचा आढावा देखील घेतील. 26 जुलै रोजी मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्य वर्धापन दिन सोहळ्याचे पंतप्रधान मोदी 'सन्माननीय अतिथी' असतील. ते मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांची भेट घेणार असून त्यांच्यात परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून साधला संवाद
June 24th, 09:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन
April 05th, 11:30 am
आज राष्ट्राध्यक्ष दिसानायक यांच्या हस्ते ‘श्रीलंका मित्र विभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझा सन्मान नाही, तर हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. हा भारत आणि श्रीलंकेतील नागरिकांमधील ऐतिहासिक संबंधांचा आणि दाट मैत्रीचा सन्मान आहे.पंतप्रधान 03ते 06 एप्रिल 2025 दरम्यान थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार
April 02nd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होणाऱ्या 6व्या BIMSTEC शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी (3-4 एप्रिल, 2025) थायलंडला भेट देतील. त्यानंतर, ते अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायका यांच्या निमंत्रणावरून (4-6 एप्रिल, 2025) श्रीलंकेचा अधिकृत दौरा करतील.मॉरीशसच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
March 10th, 06:18 pm
माझे मित्र पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगोलम यांच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत मी मॉरीशसच्या 57व्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या मॉरीशस दौऱ्यासाठी रवाना होत आहे.भारत आणि मालदीव: सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षाविषयक भागीदारीसाठी दृष्टिकोन
October 07th, 02:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्झू यांनी आज, 7 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा व्यापक आढावा घेतला.दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणात मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या या देशांतील ऐतिहासिक घनिष्ठ आणि विशेष संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीची देखील त्यांनी नोंद घेतली.