केंद्रीय मंत्रिमंडळाने 2000 कोटी रुपयांच्या "राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाला (एनसीडीसी) अनुदान सहाय्य" या केंद्रीय क्षेत्रातील योजनेला दिली मंजुरी
July 31st, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाला (एनसीडीसी) अनुदान सहाय्य या केंद्रीय क्षेत्रातील योजनेला मंजुरी देण्यात आली. 2025-26 ते 2028-29 या चार वर्षांच्या कालावधीसाठी 2000 कोटी रुपये (आर्थिक वर्ष 2025-26 पासून दरवर्षी 500 कोटी रुपये) अशी तरतूद या योजनेसाठी असेल.