आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 16th, 03:00 pm

आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर, आंध्र प्रदेशचे लोकप्रिय आणि कष्टाळू मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू, चंद्रशेखर पेम्मसानी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, राज्य सरकारमधील मंत्री नारा लोकेश, इतर सर्व मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पीव्हीएन माधव, सर्व खासदार, आमदार, आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो,

आंध्र प्रदेशात कुर्नुल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13,430 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी,उद्घाटन आणि लोकार्पण

October 16th, 02:30 pm

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी अहोबिलमचे भगवान नरसिंह स्वामी आणि महानंदीच्या श्री महानंदीश्वर स्वामी यांना वंदन केले. यावेळी त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी मंत्रालयम् चे गुरु श्री राघवेंद्र स्वामी यांचे आशीर्वाद देखील घेतले.

पंतप्रधानांनी देशवासियांना महानवमी निमित्त शुभेच्छा दिल्या

October 01st, 09:26 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महानवमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी महाअष्टमीनिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा

September 30th, 09:11 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाअष्टमीच्या पावन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले की, हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात सौख्य, समाधान आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.मोदींनी देवीच्या स्तुतीस्तोत्राचे पठण देखील केले.

BJP’s connection with Delhi goes back to the Jana Sangh days and is built on trust and commitment to the city: PM Modi

September 29th, 08:40 pm

Inaugurating the Delhi BJP’s new office, PM Modi said, “On this auspicious occasion of Navratri, Delhi BJP has received its new office today. It is a moment filled with new dreams and fresh resolutions.” He added, “For us, every BJP office is no less than a shrine, no less than a temple. A BJP office is not merely a building. It is a strong link that connects the Party with the grassroots and with people’s aspirations.”

PM Modi inaugurates Delhi BJP’s new office at Deendayal Upadhyaya Marg

September 29th, 05:00 pm

Inaugurating the Delhi BJP’s new office, PM Modi said, “On this auspicious occasion of Navratri, Delhi BJP has received its new office today. It is a moment filled with new dreams and fresh resolutions.” He added, “For us, every BJP office is no less than a shrine, no less than a temple. A BJP office is not merely a building. It is a strong link that connects the Party with the grassroots and with people’s aspirations.”

पंतप्रधानांनी सर्वांना सौख्य लाभण्यासाठी देवी मातेची प्रार्थना केली

September 29th, 09:43 am

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी मातेला मनःपूर्वक वंदन केले आहे आणि सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी तिला दैवी आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधानांनी देवी मातेची प्रार्थना केली, सर्वांसाठी शक्ती आणि कल्याणाचे वरदान मागितले

September 28th, 09:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देवी मातेच्या चरणी मनःपूर्वक नमन केले आणि देशाकरिता दैवी आशिर्वादांचे साकडे घातले. आध्यात्मिक उत्साह आणि सामूहिक सद्भावनेने भरलेल्या संदेशात, पंतप्रधानांनी सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी, धैर्यासाठी आणि आंतरिक सामर्थ्यासाठी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी नवरात्रीनिमित्त केलेल्या प्रार्थनेत, सर्वांना शक्ती आणि आत्मविश्वास मिळू दे या शब्दात मनोकामना केली व्यक्त

September 27th, 08:42 am

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी मातेला श्रध्दापूर्वक नमन करून सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरु करताना पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेले भाषण

September 26th, 11:30 am

नवरात्रीच्या या मंगलमय दिवसांमध्ये मला आज बिहारच्या स्त्रीशक्ती सोबत, त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मी येथे पडद्यावर बघत होतो, लाखो महिला-भगिनी दिसत आहेत. नवरात्रीच्या या पवित्र काळात तुम्हा सर्वांचे आशीर्वाद ही आम्हां सर्वांसाठी फार मोठी ताकद आहे. मी आज तुमचे मनापासून आभार मानतो. आणि आजपासूनच ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ सुरु होत आहे. मला सांगितल्यानुसार, आतापर्यंत या योजनेत 75 लाख भगिनी सहभागी झाल्या आहेत. आत्ताच या सर्व 75 लाख भगिनींच्या बँक खात्यांमध्ये एकाच वेळी 10-10 हजार रुपये पाठवण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा केला शुभारंभ

September 26th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणाली द्वारे बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना शुभेच्छा दिल्या. बिहारच्या महिलांच्या उत्सवात आपल्याला सहभागी होता आले, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आज मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू होत असल्याचे नमूद केले. या उपक्रमात 75 लाख महिला यापूर्वीच सहभागी झाल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी जाहीर केले की या 75 लाख महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी प्रत्येकी 10,000 रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पंतप्रधानांनी देवी स्कंदमातेची केली प्रार्थना

September 26th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची प्रार्थना केली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर एका चित्रफितीसह सामायिक केलेला संदेश:

नवरात्रीच्या चतुर्थ दिनी पंतप्रधानांनी कुष्मांडा देवीची केली आराधना.

September 25th, 08:08 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या चौथ्या दिनानिमित्त देवी कुष्मांडा यांची आराधना केली आहे.

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी चंद्रघंटा यांची केली पूजा

September 24th, 08:43 am

एक चित्रफित सामायिक करत पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटले आहे

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी केले ब्रह्मचारिणी रुपाला वंदन

September 23rd, 09:23 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रुपाला वंदन केले आहे.

त्रिपुरातील उदयपूर येथील माता त्रिपुर सुंदरी मंदिराला पंतप्रधानांनी दिली भेट

September 22nd, 09:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील उदयपूर येथील माता त्रिपुर सुंदरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. “माझ्या देशवासियांचे कल्याण व समृद्धी यासाठी देवीकडे प्रार्थना केली,” असे मोदी म्हणाले.

नवरात्रीनिमित्त पंडित जसराज जी यांचे एक भावपूर्ण भजन पंतप्रधानांनी केले सामायिक

September 22nd, 09:32 am

नवरात्रीनिमित्त पंडित जसराज जी यांचे एक भावपूर्ण भजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, नवरात्र हा विशुद्ध भक्तीचा उत्सव‌ आहे आणि अनेक लोकांनी संगीतातून या भक्तीला साकारले आहे. जर तुम्ही एखादे भजन गायले असेल किंवा तुमचे आवडते एखादे भजन असेल तर ते कृपया माझ्याकडे पाठवा. मी येत्या काही दिवसांत त्यातील काही पोस्ट करेन!, असेही मोदी पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची प्रार्थना केली

September 22nd, 09:29 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची प्रार्थना केली आहे.

नवरात्रीनिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा

September 22nd, 09:26 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावर्षीचे नवरात्रीचे हे पावन पर्व खूप खास असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.जीएसटी बचत महोत्सवात, स्वदेशीचा मंत्र या काळात एक नवीन ऊर्जा देणार आहे. विकसित आणि स्वावलंबी भारताच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आपण एकत्रित प्रयत्न करूया असे मोदी पुढे म्हणाले.

पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेले भाषण

September 21st, 06:09 pm

उद्यापासून शक्तीच्या उपासनेचा उत्सव अर्थात नवरात्र सुरू होत आहे. तुम्हा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आपला देश आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे आणि मोठे पाऊल टाकत आहे. उद्या, २२ सप्टेंबर रोजी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा सूर्य उगवताच पुढील टप्प्यातल्या जीएसटी सुधारणा लागू होतील. एका अर्थाने उद्यापासून देशात जीएसटी बचत महोत्सवाला सुरुवात होत आहे. या जीएसटी बचत महोत्सवामुळे तुमची बचत वाढेल आणि तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू अधिक सहजपणे खरेदी करू शकाल. आपल्या देशातील गरीब, मध्यमवर्गीय, नव-मध्यमवर्गीय, युवा, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी, उद्योजक या सर्वांना या बचत महोत्सवाचा मोठा फायदा होईल. याचा अर्थ असा की या उत्सवाच्या काळात प्रत्येकाला काहीतरी गोड खाण्यास मिळेल आणि देशातील प्रत्येक कुटुंबात आनंद वाढेल. पुढील टप्प्यातल्या या जीएसटी सुधारणा आणि बचत महोत्सवाबद्दल मी देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. या सुधारणांमुळे भारताच्या विकासगाथेला वेग लाभेल, , व्यवसाय सुलभ होईल, गुंतवणूक अधिक आकर्षक होईल आणि विकासाच्या शर्यतीत प्रत्येक राज्य समान भागीदार होईल.