PM Modi expresses gratitude to world leaders for birthday wishes
September 17th, 03:03 pm
The Prime Minister Shri Narendra Modi expressed his gratitude to the world leaders for greetings on his 75th birthday, today.फलनिष्पत्ती : मॉरीशसच्या पंतप्रधानांचा भारत दौरा
September 11th, 02:10 pm
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि मॉरीशस प्रजासत्ताकाचे तृतीयक शिक्षण, विज्ञान आणि संशोधन मंत्रालय यांच्यादरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारभारत - मॉरिशस संयुक्त घोषणा : विशेष आर्थिक पॅकेज
September 11th, 01:53 pm
मॉरिशस प्रजासत्ताकाचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून भारताच्या राजकीय दौऱ्यावर आले आहेत. दोन्ही पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय मुद्यांवर अतिशय फलदायी चर्चा झाली. मॉरिशस सरकारकडून आलेल्या विनंती आधारे खालील प्रकल्प भारत आणि मॉरिशस यांनी संयुक्तरीत्या राबविण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेले निवेदन
September 11th, 12:30 pm
आपली संस्कृती आणि संस्कार, अनेक शतकांपूर्वीपासून भारतातून मॉरिशसमध्ये पोहोचले आहेत आणि तिथल्या जीवनाच्या प्रवाहात स्थायिक झाले आहेत. काशीमधल्या गंगेच्या अखंड, अविरत प्रवाहाप्रमाणे, भारतीय संस्कृतीचा अखंड प्रवाह मॉरिशसला समृद्ध करत आहे. आणि आज,आपण काशीमध्ये मॉरिशसमधील मित्रांचे, स्नेहींचे स्वागत करत आहोत, ही केवळ औपचारिकता नाही; तर एक आत्मिक मिलन आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो की, भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नाहीत, तर एक कुटुंब आहे.पंतप्रधान 11 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या दौऱ्यावर
September 10th, 01:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडला भेट देणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून साधला संवाद
June 24th, 09:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध
April 24th, 03:29 pm
जम्माू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात, अनेक निरपराध लोकांचा बळी गेला त्या घटनेनंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी जागतिक नेत्यांची रीघ लागली होती. साऱ्या जगातून मिळालेल्या या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त करतानाच भारत दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या पाठीराख्यांना पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातून हुडकून काढेल असाही निर्धार व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मॉरिशसमधील अटलबिहारी वाजपेयी लोक सेवा आणि नवोन्मेश संस्थेचे केले उद्घाटन
March 12th, 03:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज मॉरिशसमधील रेडुइट येथे अटल बिहारी वाजपेयी लोक सेवा आणि नवोन्मेश संस्थेचे संयुक्तपणे उद्घाटन केले. भारत-मॉरिशस विकास भागीदारीअंतर्गत राबवण्यात आलेला हा ऐतिहासिक प्रकल्प, मॉरिशसमधील क्षमता विकासाप्रति असलेली भारताची वचनबद्धता अधोरेखित करतो.दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदींचे मॅारिशसमध्ये आगमन
March 11th, 08:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही वेळापूर्वी मॉरिशसमध्ये आगमन झाले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ते मॉरिशसच्या 57 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार असून मॉरिशसच्या नेतृत्वासह अन्य मान्यवरांची भेट घेणार आहेत.मॉरीशसच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
March 10th, 06:18 pm
माझे मित्र पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगोलम यांच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत मी मॉरीशसच्या 57व्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या मॉरीशस दौऱ्यासाठी रवाना होत आहे.पंतप्रधान मोदी 11 ते 12 मार्च 2025 दरम्यान मॉरिशसला भेट देणार
March 07th, 06:17 pm
पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 11-12 मार्च रोजी मॉरिशसला भेट देणार आहेत.ते मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या भेटीत ते प्रमुख नेत्यांची भेट घेतील, भारतीय वंशाच्या समुदायाशी संवाद साधतील तसेच विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. ही भेट सामायिक इतिहास आणि प्रगतीमध्ये यांमध्ये रुजलेल्या मजबूत भारत-मॉरिशस भागीदारीची पुष्टी करणारी आहे .