Yuva Shakti is driving developed India while strengthening cultural roots: PM at release of 500th Book of Shrimad Vijayaratna Sunder Surishwarji Maharaj

January 11th, 01:00 pm

Delivering his remarks during the release of Shrimad Vijayaratna Sunder Surishwarji Maharaj’s 500th book, PM Modi expressed confidence that this creation would benefit society, youth and humanity at large. He remarked that Maharaj’s 500 works are like a vast ocean containing countless gems of thought, offering simple and spiritual solutions to humanity’s problems. The PM also recalled the nine appeals and nine resolutions he had made for the welfare of the society.

PM Modi’s remarks during release of Shrimad Vijayaratna Sunder Surishwarji Maharaj’s 500th book

January 11th, 12:44 pm

Delivering his remarks during the release of Shrimad Vijayaratna Sunder Surishwarji Maharaj’s 500th book, PM Modi expressed confidence that this creation would benefit society, youth and humanity at large. He remarked that Maharaj’s 500 works are like a vast ocean containing countless gems of thought, offering simple and spiritual solutions to humanity’s problems. The PM also recalled the nine appeals and nine resolutions he had made for the welfare of the society.

आसाममधील नामरूप येथील युरिया प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

December 21st, 04:25 pm

ही वीरांची भूमी आहे. सौलुंग सुकाफा, महावीर लचित बोरफुकन, भीमबर देउरी, शहीद कुसल कुवर, मोरान राजा बोडौसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंह आणि वीरांगना सती साधनी यांसारख्या महान व्यक्तींनी ही भूमी पवित्र केली आहे. अशा या वरच्या आसामच्या मातीत मी आदराने नमन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी

December 21st, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. ही भूमी चाओलंग सुखाफा आणि महावीर लाचित बोरफुकन यांसारख्या महान वीरांची भूमी असल्याचे त्यांनी नमूद केले. भीमबर देउरी, शहीद कुशल कुंवर, मोरान राजा बौदोसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंग आणि पराक्रमी सती साधनी यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी यावेळी केला. या शौर्य आणि बलिदानाच्या महान भूमीला, उजनी आसामच्या पवित्र मातीला आपण नमन करत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या पंतप्रधानांसोबत केली द्विपक्षीय चर्चा

December 17th, 12:02 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे पंतप्रधान महामहिम डॉ. अबी अहमद यांची आज आदिस अबाबा येथील नॅशनल पॅलेसमध्ये भेट घेतली. पॅलेसमध्ये आगमनावेळी पंतप्रधान मोदी यांचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद यांनी मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांचा औपचारिक सन्मान करण्यात आला.

मन की बात’ हे देशातील लोकांच्या सामुहिक प्रयत्नांना सामान्य जनतेसमोर आणणारं एक उत्तम व्यासपीठ : पंतप्रधान मोदी

November 30th, 11:30 am

या महिन्याच्या मन की बातमध्ये, पंतप्रधान मोदींनी संविधान दिन सोहळा, वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन, अयोध्येत धर्मध्वजारोहण, आयएनएस 'माहे'चा नौदलात समावेश आणि कुरुक्षेत्र येथे झालेला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव यासह नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांवर प्रकाश टाकला. देशात यंदा झालेले अन्नधान्याचे आणि मधाचे विक्रमी उत्पादन, भारताचे क्रीडा क्षेत्रातील यश, संग्रहालये आणि नैसर्गिक शेती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला. पंतप्रधानांनी सर्वांना काशी-तमिळ संगमचा भाग होण्याचेही आवाहन केले.

गोव्यामधील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 28th, 03:35 pm

आज या पवित्र प्रसंगी मनामध्ये खोलवर शांतता भरली आहे. साधू-संतांच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर आपोआपच आध्यात्मिक अनुभव येत असतो. इथे विशाल संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांमुळे लक्षात येते की, या मठाची शतकांपासूनच प्राचीन जीवंत शक्ती आजही वृद्धिंगत होत आहे. आज या समारंभाला मला उपस्थित राहता आले, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. इथे येण्यापूर्वी मला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. त्या शांत वातावरणाने या कार्यक्रमाच्या आध्यात्मिकतेला आणखी सखोलता प्राप्त झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधित

November 28th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी आपले मन गहन शांतीने भरले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. संतांच्या उपस्थितीत, त्यांच्या सोबत बसणे हा स्वतःच एक आध्यात्मिक अनुभव आहे, यावर त्यांनी भर दिला. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांमुळे या मठाची शतकानुशतके जुनी जिवंत शक्ती आणखी वाढली आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, आज या समारंभात लोकांमध्ये उपस्थित राहणे हे आपले भाग्य आहे. येथे येण्यापूर्वी आपल्याला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराला भेट देण्याचा सौभाग्य लाभले, असे त्यांनी सांगितले. तेथील शांतता आणि तिथल्या वातावरणामुळे या समारंभाची आध्यात्मिकता अधिक सखोल झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

उडुपी येथील श्रीकृष्ण मठातील लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 28th, 11:45 am

मी माझे भाषण सुरु करण्यापूर्वी — इथे काही मुलं चित्र काढून घेऊन आली आहेत. SPG चे लोक आणि स्थानिक पोलिस थोडी मदत करतील का, ती चित्रं गोळा करण्यासाठी? जर तुम्ही त्याच्या मागे तुमचा पत्ता लिहिला असेल, तर मी नक्कीच तुम्हाला आभारपत्र पाठवेन. ज्यांनी जे काही आणले असेल, ते देऊन टाका, ते गोळा करतील आणि मग तुम्ही निवांत बसू शकता. ही मुले इतकी मेहनत करतात, आणि कधी कधी, मीच त्यांच्या बाबतीत अन्याय करतो असं वाटतं, तेव्हा मला खूप वाईट वाटतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला केले संबोधित

November 28th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला संबोधित केले. भगवान श्रीकृष्णाचे दिव्य दर्शनाचे समाधान, श्रीमद् भगवद्गीतेच्या मंत्रांचा आध्यात्मिक अनुभव आणि इतक्या पूज्य संत आणि गुरूंची उपस्थिती, हे आपल्यासाठी एक परम भाग्य आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे असंख्य आशीर्वादांची प्राप्ती करण्यासारखे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे निवेदन

November 23rd, 12:45 pm

जोहानस-बर्ग” सारख्या जिवंत आणि सुंदर शहरात आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत सहभागी होणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या बैठकीसाठी मी आयबीएसए चे अध्यक्ष राष्ट्रपति लुला यांचे मनापासून आभार मानतो. आणि राष्ट्रपति रामाफोसा यांना आदरातिथ्याबद्दल धन्यवाद देतो.

जोहान्सबर्ग येथे आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग

November 23rd, 12:30 pm

ही बैठक अत्यंत योग्य वेळी होत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की ही बैठक आफ्रिकेच्या भूमीवर झालेल्या पहिल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने झाली असून ग्लोबल साउथ देशांच्या सलग चार जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा समारोप करते. या चारपैकी शेवटची तीन अध्यक्षपदे भारत - ब्राझील - दक्षिण आफ्रिका संवाद मंच (आयबीएसए) सदस्य राष्ट्रांकडे होती. या दरम्यान मानव-केंद्रित विकास, बहुपक्षीय सुधारणा आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती परिषद 2025 मध्ये पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद

November 20th, 12:30 pm

ही सगळी उत्पादनं वाया जाणाऱ्या गोष्टींपासून बनवली आहेत साहेब. केळ्यांच्या शेतीमधील टाकाऊ गोष्टींपासून तयार केलेली ही उत्पादनं केळीच्या पिकाचं मूल्यवर्धन करणारी आहेत साहेब

तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

November 20th, 12:16 pm

तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शेतकऱ्यांशी संवाद साधला. नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना अभिवादन करुन पंतप्रधान मोदी यांनी केळी उत्पादनाचे निरीक्षण केले तसेच केळ्यांच्या वाया अवशेषांच्या वापराबद्दल चौकशी केली. शेतकऱ्याने सांगितले की तेथे मांडण्यात आलेल्या सर्व वस्तू म्हणजे केळी पिकाच्या वाया अवशेषांचे मूल्यवर्धन केलेली उत्पादने आहेत. ही उत्पादने भारतभरात ऑनलाईन पद्धतीने विकली जातात का असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारल्यानंतर शेतकऱ्याने होकार दिला. तो शेतकरी पुढे म्हणाला की, तो आणि त्याच्यासोबतचे शेतकरी एफपीओज म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यामातून तसेच व्यक्तिगत योगदानकर्ते म्हणून संपूर्ण तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करत आहेत. या शेतकऱ्यांची उत्पादने ऑनलाईन विकली जातात, निर्यात करण्यात येतात तसेच ही उत्पादने स्थानिक बाजारांमध्ये आणि देशभरातील सुपरमार्केट्समध्ये देखील उपलब्ध आहेत असे त्याने सांगितले. प्रत्येक एफपीओमध्ये किती लोक एकत्र काम करतात या पंतप्रधानांच्या प्रश्नावर, शेतकऱ्याने उत्तर दिले की साधारणतः एक हजार जण यात सहभागी असतात. त्याच्या उत्तराची नोंद घेत पंतप्रधानांनी विचारले की जमिनीच्या एका भागावर केवळ केळीची लागवड केली जाते की त्यामध्ये मिश्र पिके देखील घेतात. वेगवेगळी विशिष्ट उत्पादने हे वेगवेगळ्या भागांचे वैशिष्ट्य असून त्यांच्याकडे जीआय टॅग प्राप्त उत्पादने देखील आहेत.

पंतप्रधानांचे तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मधील भाषण

November 19th, 07:01 pm

व्यासपीठावर उपस्थित तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एल मुरुगन जी, तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर के. रामासामी जी, निरनिराळ्या कृषी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आलेले सर्व मान्यवर आणि इतर सर्व लोकप्रतिनिधीवर्ग, माझे प्रिय शेतकरी बांधव आणि भगिनी तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्यासोबत सहभागी झालेले देशभरातील लाखो शेतकरी, त्यांनाही मी येथून वणक्कम म्हणतो, नमस्कार करतो आणि सगळ्यात आधी मी तुम्हा सर्वांची आणि देशभरातून जमलेल्या माझ्या शेतकरी बंधू-भगिनींची क्षमा मागतो. मला इथे येण्यासाठी जवळ जवळ एक तास उशीर झाला आहे, कारण मी आज पुट्टपर्थी इथे सत्य साई बाबांच्या कार्यक्रमात होतो, तिथला कार्यक्रम जरा जास्त वेळ लांबला, त्यामुळे मला यायला उशीर झाला, तुम्हा सर्वांची जी गैरसोय झाली, मला दिसते आहे की देशभरातील अनेक लोक इथे थांबून आहेत, याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 ला केले संबोधित

November 19th, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी कोईम्बतूरच्या पवित्र भूमीवरील दैवत मरुदमलाईच्या भगवान मुरुगन यांना वंदनही केले.कोईम्बतूरचे ही संस्कृती, करुणाभाव आणि सर्जनशीलता यांची भूमी आहे असे त्यांनी सांगितले. हे शहर दक्षिण भारताच्या उद्योजकीय शक्तीचे एक ऊर्जा केंद्र असल्याचा दखलपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. इथले वस्त्रोद्योग क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. कोईम्बतूरचे माजी खासदार सी.पी. राधाकृष्णन हे आता उपराष्ट्रपती म्हणून देशाला मार्गदर्शन करत आहेत, यामुळे आता या शहराला आणखी महत्त्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले

October 31st, 06:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मध्ये रोहिणी येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, आत्ताच ऐकलेल्या मंत्रांची ऊर्जा आपल्या सर्वांना अजूनही जाणवत आहे. आपण जेव्हा अशा संमेलनात येतो तेव्हा आपल्याला दैवी आणि विलक्षण अनुभव येतो, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी या भावनेचे श्रेय स्वामी दयानंद यांच्या आशीर्वादाला दिले. पंतप्रधानांनी स्वामी दयानंद यांच्या आदर्शांबद्दल आदर व्यक्त केला. उपस्थित सर्व विचारवंतांबरोबरच्या अनेक दशकांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे आपल्याला वारंवार त्यांच्यामध्ये येण्याची संधी मिळत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की जेव्हा ते त्यांना भेटतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा आणि एक अनोखी प्रेरणा निर्माण होते.

Talking to you felt like talking to a family member, not the Prime Minister: Farmers say to PM Modi

October 12th, 06:45 pm

During the interaction with farmers at a Krishi programme in New Delhi, PM Modi enquired about their farming practices. Several farmer welfare initiatives like Government e-Marketplace (GeM) portal, PM-Kisan Samman Nidhi, Pradhan Mantri Matsya Sampada Yojana, and PM Dhan Dhaanya Krishi Yojana were discussed. Farmers thanked the Prime Minister for these initiatives and expressed their happiness.

35,440 कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या कृषी योजनांच्या शुभारंभाच्या प्रसंगी कृषी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

October 12th, 06:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कृषी कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम शेतकऱ्यांचे कल्याण, कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा बळकट करण्याबाबत पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला अधोरेखित करतो. पंतप्रधान मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील दोन महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ केला, ज्यासाठी एकूण 35,440 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी पी एम धन धान्य कृषी योजना 24,000 कोटींच्या तरतुदीसह सुरू करण्यात आली, तर डाळींच्या आत्मनिर्भरतेसाठी मोहीम सुरु करण्यात अली असून, त्यासाठी 11,440 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली.

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेच्या प्रारंभ प्रसंगी तसेच नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत विविध योजनांच्या उद्घाटन आणि पायाभरणीप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

October 11th, 12:30 pm

व्यासपीठावर विराजमान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले राजीव रंजन सिंह जी, श्रीमान भागीरथ चौधरी जी, विभिन्न राज्यांचे मुख्यमंत्री, संसद सदस्य, आमदार, इतर महानुभाव आणि देशभरातून या कार्यक्रमात जोडले गेलेल्या माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो!!