नवी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर एनसीसी रॅलीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 28th, 04:00 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, एनसीसी, देशभरातील एनएसएस कॅडेट्स, टॅब्लॉइड कलाकार, नॅशनल स्टेडियमचे सहकारी आणि माझ्या प्रिय युवा मित्रांनो. तुमची मेहनत इथे पाहायला मिळाली. तुम्ही उत्तम समन्वयाने सादरीकरण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला केले संबोधित

January 28th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राऊंडवर आयोजित वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला संबोधित केले. एनसीसी दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, एनसीसी, एनएसएसचे छात्र, चित्ररथ कलाकार, राष्ट्रीय रंगशाळेतील सहकारी आणि देशभरातील तरुण सहभागींनी सादर केलेल्या समन्वित सादरीकरणांमध्ये त्यांचे प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत होते.

पहिल्या मतदानापासून ते स्टार्टअप इंडियापर्यंत, मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी केली भारतातील तरुणांचे कौतुक

January 25th, 11:30 am

राष्ट्रीय मतदार दिनी प्रसारित झालेल्या या वर्षीच्या पहिल्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाचे कौतुक केले. त्यांनी स्टार्टअप्स, जलसंवर्धन, गुणवत्ता, संस्कृती आणि उत्सव आणि स्वच्छता यासारख्या प्रमुख विषयांवरही प्रकाश टाकला. पुढील महिन्यात होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जगभरातील तज्ञ सहभागी होणार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधानांच्या नागरिकांना शुभेच्छा

January 25th, 10:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रोजगार मेळ्या अंतर्गत नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 24th, 11:30 am

सन 2026 ची सुरुवात तुमच्या आयुष्यात नव्या आनंदाची सुरुवात घेऊन येत आहे. वसंत पंचमी कालच साजरी झाली असून, तुमच्या आयुष्यातही नव्या वसंताची सुरुवात होत आहे. हा काळ तुम्हाला संविधानाबद्दलच्या तुमच्या जबाबदाऱ्यांशीही जोडणारा आहे. योगायोगाने, या काळात देशात प्रजासत्ताकाचा महोत्सव सुरू आहे. काल 23 जानेवारी रोजी आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली आणि उद्या 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आहे. त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. आजचा दिवस ही विशेष आहे. आजच्याच दिवशी आपल्या संविधानाने ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते. आजच्या या महत्त्वाच्या दिवशी देशातील 61 हजारांहून अधिक युवक आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. आज तुम्हा सर्वांना सरकारी सेवांसाठी नियुक्तीपत्रे मिळत आहेत. ही नियुक्तीपत्रे म्हणजे राष्ट्रनिर्माणासाठीचे आमंत्रणपत्र आहे. हे विकसित भारताच्या उभारणीला गती देणारे संकल्पपत्र आहे. तुमच्यापैकी अनेक जण देशाची सुरक्षा अधिक मजबूत करतील, आपल्या शिक्षण आणि आरोग्यसेवा व्यवस्थेला अधिक सक्षम करतील. काही युवक आर्थिक सेवा आणि ऊर्जा सुरक्षेला बळकटी देतील, तर काही युवक आपल्या सरकारी कंपन्यांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतील. मी आपणा सर्व युवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो.

अलीकडच्या काळात रोजगार मेळावा ही एक संस्था म्हणून विकसित झाली असून, या माध्यमातून लाखो तरुणांना विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्तीपत्रे मिळाली आहेत: पंतप्रधान

January 24th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 18व्या रोजगार मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, 2026 हे वर्ष नागरिकांच्या जीवनात नवे आनंद घेऊन सुरू झाले असून, त्याच वेळी नागरिकांना त्यांच्या घटनात्मक कर्तव्यांशी जोडणारेही ठरत आहे. हा काळ प्रजासत्ताकाच्या भव्य उत्सवाशी संबंधित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दिल्लीतील करिअप्पा परेड मैदानातील एनसीसी रॅलीला संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 27th, 05:00 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंहजी, संजय सेठजी, सीडीएस जनरल अनिल चौहानजी, तिन्ही सेनादलांचे प्रमुख, संरक्षण सचिव, एनसीसीचे महासंचालक, इतर अतिथीवर्ग आणि एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेतील माझ्या प्रिय मित्रांनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) वार्षिक मेळाव्याला केले संबोधित

January 27th, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील करिअप्पा परेड मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) वार्षिक मेळाव्याला संबोधित केले. सांस्कृतिक कार्यक्रमांना मोदी उपस्थित राहिले तसेच त्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कॅडेट पुरस्कार प्रदान करण्यात आले. एनसीसी दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, 18 मित्र देशांमधील सुमारे 150 छात्रसैनिक इथे असून त्यांचे मी स्वागत करतो. मेरा युवा भारत (माय भारत) पोर्टलच्या माध्यमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झालेल्या भारतातील युवकांचे त्यांनी अभिनंदन केले.

राष्ट्रीय मतदार दिन हा आपल्या चैतन्यशील लोकशाहीचा गौरव करणारा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा उत्सव आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

January 25th, 08:45 am

राष्ट्रीय मतदार दिन हा आपल्या चैतन्यशील लोकशाहीचा गौरव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा उत्सव आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले आहे.

मन की बात: 'मेरा पहला वोट - देश के लिए'... प्रथमच मतदानाचा हक्क बजावत असलेल्या मतदारांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

February 25th, 11:00 am

नमस्कार ! मन की बात च्या 110 व्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या अनेक सूचना, इनपुट्स आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे याहीवेळी, या भागात कशाकशाचा समावेश करायचा, हे एक आव्हान आहे. सकारात्मकतेने भरलेले एकापेक्षा एक उत्तमोत्तम इनपुट्स मला मिळाले आहेत. इतरांसाठी आशेचा किरण होऊन त्यांची आयुष्यं अधिक चांगली करण्यासाठी अविरत झटणाऱ्या अनेक देशबांधवांचा यांमध्ये उल्लेख आहे.

राम प्रत्येकाच्या हृदयात आहे: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

January 28th, 11:30 am

यावेळी देशातील अनेकांनी राम भजने गाउन श्री रामाच्या चरणी समर्पित केली. 22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती लावून दिवाळी साजरी केली. या काळात, देशाने सामूहिकतेमधील शक्ती पाहिली. ही सामूहिकतेची शक्ती आपल्या विकसित भारतासाठी केलेल्या संकल्पांचादेखील एक प्रमुख आधार आहे. मी देशवासियांना, मकर संक्रांती ते 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याची विनंती केली होती. हे ऐकून मला आनंद झाला की लाखो लोक ह्या अभियानात भक्तीभावाने सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या परिसरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली. अनेक लोकांनी मला यासंबंधीची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवले आहेत. ही भावना, ही इच्छा कधीच संपू नये, ही मोहीम थांबू नये. सामूहिकतेची हीच शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल.

The next 25 years are crucial to transform India into a 'Viksit Bharat': PM Modi

January 25th, 12:00 pm

PM Modi addressed the people of India at Nav Matdata Sammelan. He said, “The age between 18 to 25 shapes the life of a youth as they witness dynamic changes in their lives”. He added that along with these changes they also become a part of various responsibilities and during this Amrit Kaal, strengthening the democratic process of India is also the responsibility of India’s youth. He said, “The next 25 years are crucial for both India and its youth. It is the responsibility of the youth to transform India into a Viksit Bharat by 2047.”

PM Modi’s address at the Nav Matdata Sammelan

January 25th, 11:23 am

PM Modi addressed the people of India at Nav Matdata Sammelan. He said, “The age between 18 to 25 shapes the life of a youth as they witness dynamic changes in their lives”. He added that along with these changes they also become a part of various responsibilities and during this Amrit Kaal, strengthening the democratic process of India is also the responsibility of India’s youth. He said, “The next 25 years are crucial for both India and its youth. It is the responsibility of the youth to transform India into a Viksit Bharat by 2047.”

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

January 25th, 09:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला शुभेच्छा दिल्या

January 25th, 11:49 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय मतदार दिनी पंतप्रधानांकडून निवडणूक आयोगाची प्रशंसा

January 25th, 01:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक आयोगाची प्रशंसा केली आहे.

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

January 25th, 11:01 am

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला राष्ट्रीय मतदार दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (27 जानेवारी 2019)

January 27th, 11:30 am

डॉक्टर कलाम साहेब यांची ही कविता श्री श्री श्री शिवकुमार स्वामी जी यांचे जीवन आणि सिद्धगंगा मठाचे मिशन सुंदर प्रकारे सादर करते. पुन्हा एकदा, मी अशा महापुरुषाला माझी श्रद्धासुमने अर्पण करतो.

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पंतप्रधानांकडून नागरिकांना शुभेच्छा

January 25th, 12:49 pm

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांकडून पात्र मतदारांना नोंदणी आणि मतदान अधिकाराचा वापर करण्याचे आवाहन

January 25th, 10:56 am

पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्व पात्र मतदारांना नोंदणी करण्याचे आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.