राष्ट्रीय क्रीडा दिनी बिहारमधील राजगीर इथे सुरू होत असलेल्या पुरुष हॉकी आशिया चषक 2025 या स्पर्धेसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
August 28th, 09:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरुष हॉकी आशिया कप 2025 मध्ये सहभागी झालेल्या आशियातील सर्व संघांना, खेळाडूंना, अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या समर्थकांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. बिहारमधील राजगीर या ऐतिहासिक शहरात उद्या 29 ऑगस्ट रोजी या स्पर्धेला सुरुवात होईल. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचेही कौतुक केले आहे. बिहार हे अलिकडच्या काळात एक बहुआयामी क्रीडा केंद्र म्हणून उदयाला आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिहारने खेलो इंडिया युथ गेम्स 2025, 20 वर्षांखालील आशिया रग्बी सेव्हन्स अजिंक्यपद स्पर्धा 2025, आंतरराष्ट्रीय सेपाकटकरॉ महासंघाची (ISTAF - International Sepaktakraw Federation) सेपाकटकरॉ विश्वचषक स्पर्धा 2024 आणि महिला आशियाई अजिंक्यपद चषक 2024 यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
August 23rd, 10:10 pm
येथे जागतिक परिस्थिती, भू-अर्थशास्त्र यावर सविस्तर चर्चा झाली आहे आणि जेव्हा आपण जागतिक संदर्भात पाहतो तेव्हा आपल्याला भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद लक्षात येते. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. आपण लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. तज्ज्ञ म्हणत आहेत की जागतिक विकासात भारताचे योगदान लवकरच सुमारे 20 टक्के असणार आहे. ही वाढ, ही लवचिकता, जी आपण भारताच्या अर्थव्यवस्थेत पाहत आहोत, ती गेल्या दशकात भारताने मिळवलेल्या स्थूल-आर्थिक स्थिरतेमुळे आहे. आज आपली राजकोषीय तूट 4.4% पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. आणि हे असे घडत आहे जेव्हा आपण कोविडच्या इतक्या मोठ्या संकटाचा सामना केला आहे. आज आपल्या कंपन्या भांडवली बाजारातून विक्रमी निधी उभारत आहेत. आज आपल्या बँका पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत. महागाई खूप कमी आहे, व्याजदर कमी आहेत. आज आपली चालू खात्यातील तूट नियंत्रणात आहे. परकीय चलन साठा देखील खूप मजबूत आहे. इतकेच नाही तर दरमहा लाखो देशांतर्गत गुंतवणूकदार एस.आय.पी. द्वारे बाजारात हजारो कोटी रुपये गुंतवत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला केले संबोधित
August 23rd, 05:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड लीडर्स फोरमसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागतही केले. हा उपक्रम अतिशय योग्य वेळी आयोजित केला असल्याचेही त्यांनी नमूद केले, आणि त्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आयोजकांची प्रशंसाही केली. मागच्या आठवड्यातच आपण लाल किल्ल्यावरून पुढच्या पिढीच्या सुधारणांबद्दल (नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स) भाषण केले होते आणि हा मंच त्याच भावनेला अधिक बळ देत आहे, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधान म्हणाले की भारत अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय झेप घेत आहे; या क्षेत्रातील सुधारणा नव्या आघाड्यांचा शोध घेण्यासंदर्भात तरुणांना आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहित करत आहेत
August 23rd, 01:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की 140 कोटी भारतीयांचे कौशल्य आणि प्रतिभेच्या जोरावर भारत अंतराळ विश्वात उल्लेखनीय झेप घेत आहे.राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
August 23rd, 11:00 am
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे साथीदार, इस्रो आणि अंतरिक्ष क्षेत्रातील सर्व शास्त्रज्ञ, अभियंते आणि माझ्या प्रिय देशवासीयांनो !राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन
August 23rd, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय अंतराळ दिन 2025 च्या निमित्ताने व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. या वर्षीची संकल्पना “आर्यभट्ट ते गगनयान” अशी असून, ती भारताचा भूतकाळातील आत्मविश्वास आणि भविष्यातील निश्चय या दोहोंचे प्रतिबिंब आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.स्वावलंबन हा 2047 पर्यंत विकसित भारताकडे नेणारा मार्ग: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 27th, 11:30 am
‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या हृदयामध्ये जणू एक आनंदाची लाट उसळली. संपूर्ण देशाला शुभांशू यांच्या कामगिरीविषयी अभिमान वाटला. अशावेळी मला एका घटनेचं स्मरण होत आहे. ज्यावेळी ऑगस्त 2023 मध्ये चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, त्यावेळीही देशामध्ये अशाच प्रकारचे अनोखे वातावरण तयार झाले होते. विज्ञानापासून ते अंतराळापर्यंतच्या विषयांमध्ये अगदी लहान-लहान मुलांमध्येही एक नवीन जिज्ञासा, उत्सुकता जागृत झाली होती. आता लहान-लहान मुलेही म्हणताहेत की, आम्हीही अंतराळामध्ये जाणार! आम्हीही चंद्रावर जाणार, अंतराळ संशोधक बनणार!अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा देशातील तरुणांना फायदा: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी
August 25th, 11:30 am
मित्रांनो, देशातील युवावर्गाला अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देखील खूप फायदा झाला आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आज 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित माझ्या काही तरुण मित्रांशी का बोलू नये! माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेस टेक स्टार्ट अप- गॅलेक्स आय चा चमू सहभागी होत आहे. हा स्टार्ट-अप- नवं उद्योग, आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. ही सर्व तरुण मंडळी- सुयश, डेनिल, रक्षित, किशन आणि प्रणित, आज दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत. चला, या तरुणांचे अनुभव जाणून घेऊया.अंतराळ जगतामध्ये भारताने केली उल्लेखनीय प्रगती : पंतप्रधान
August 23rd, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ जगतामध्ये भारताने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त देशाला दिल्या शुभेच्छा
August 23rd, 09:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त देशाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रसार माध्यम ‘एक्स’ वर सामायिक केलेल्या संदेशात पंतप्रधानांनी अंतराळ क्षेत्रातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सार्थ अभिमान व्यक्त केला.पोलंडमधील वॉर्सा इथे भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 21st, 11:45 pm
हे दृश्य खरोखरच अद्भुत आहे आणि तुमचा उत्साह देखील अद्भुत आहे . मी इथं पाय ठेवल्यापासून पाहतो आहे तुम्ही थकतच नाही आहात. तुम्ही सर्व जण पोलंडच्या वेगवेगळ्या भागातून आला आहात, सर्वांची भाषा, बोली, खाण्याच्या सवयी भिन्न आहेत. मात्र प्रत्येकजण भारतीयत्वाच्या भावनेने जोडलेला आहे. तुम्ही माझे येथे इतके छान स्वागत केले आहे, या स्वागतासाठी मी तुम्हा सर्वांचा, पोलंडच्या जनतेचा खूप आभारी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पोलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित
August 21st, 11:30 pm
त्याआधी पोलंडमधल्या भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोष आणि उत्साहात स्वागत केले. सुमारे 45 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान पोलंडच्या भेटीवर आल्याची बाब पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात नमूद केली. या भेटीत आपण पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा आणि पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट घेण्यासाठी, तसेच भारत आणि पोलंडमधली संबंध अधिक दृढ करण्यासाठी आतुर असल्याचे त्यांनी सांगितले. भारत ही लोकशाहीची जननी आहे, या नात्याने तसेच भारत आणि पोलंडमधली एकसामाईक मूल्ये दोन्ही देशांनाकेरळमध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
February 27th, 12:24 pm
केरळचे राज्यपाल श्री आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री श्री पिनाराई विजयन जी, राज्यमंत्री, माझे सहकारी श्री वी. मुरलीधरन जी, इस्रो परिवारातील सर्व सदस्य, यांना माझा नमस्कार!केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला (व्हीएसएससी) पंतप्रधानांनी दिली भेट
February 27th, 12:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळातील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला (व्हीएसएससी) ला भेट दिली. यावेळी त्यांनी सुमारे 1800 कोटी रुपयांच्या तीन महत्त्वाच्या अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील एसएलव्ही इंटिग्रेशन फॅसिलिटी (पीआयएफ); महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये नवीन ‘सेमी-क्रायोजेनिक्स इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज टेस्ट सुविधा’; आणि तिरुवनंतपुरम येथील व्हीएसएससीमध्ये ‘ट्रायसोनिक विंड टनल’ हे ते तीन प्रकल्प आहेत.जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनालेमध्ये पंतप्रधानांनी केले भाषण
September 26th, 04:12 pm
दोन आठवड्यांपूर्वी याच भारत मंडपमध्ये जोरदार घडामोडी घडत होत्या. हे भारत मंडपम एकदम ‘हॅपनिंग’ ठिकाण होते आणि मला आनंद आहे की आज माझा भावी भारत त्याच भारत मंडपमध्ये उपस्थित आहे. जी-20 च्या आयोजनाला भारताने ज्या उंचीवर नेले आहे ते पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.पण तुम्हाला माहीत आहे की , मी अजिबात थक्क नाही ,मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.कदाचित तुमच्या मनात असेल की इतके मोठे आयोजन झाले तुम्ही खुश नाही , काय कारण आहे ? माहीत आहे का ? कारण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी घेतात , तरुणाईचा यात सहभाग असेल तर तो यशस्वी होणार हे निश्चित असते. .जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनालेला पंतप्रधानांनी केले संबोधित
September 26th, 04:11 pm
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनाले कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम देशातल्या तरुणांना भारताच्या जी 20 अध्यक्षपदाबाबत माहिती देण्यासाठी आणि जी 20 च्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला. पंतप्रधानांनी या प्रसंगी 4 प्रकाशनांचे : The Grand Success of G20 Bharat Presidency: Visionary Leadership, Inclusive Approach (भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे भव्य यश: दूरदर्शी नेतृत्व, सर्वसमावेशक दृष्टिकोन;), India's G20 Presidency: Vasudhaiva Kutumbakam (भारताचे जी 20 अध्यक्षपद: वसुधैव कुटुंबकम; ) , Compendium of G20 University Connect Programme (जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट कार्यक्रमाचे संकलन); आणि Showcasing Indian Culture at G20 (जी 20 मध्ये भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन) यांचे अनावरण केले.चांद्रयान-3 मोहिमेचे ऐतिहासिक यश साजरे करण्याचा मंत्रिमंडळाचा ठराव
August 29th, 04:00 pm
चांद्रयान-3 मोहिमेचे ऐतिहासिक यश साजरे करण्यात राष्ट्रासोबत केंद्रीय मंत्रिमंडळ देखील सहभागी होत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या वैज्ञानिकांच्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा करण्यात आली. हे केवळ आपल्या अंतराळ संस्थेचे यश नाही तर जागतिक मंचावर भारताच्या प्रगतीचे आणि उन्नतीचे उज्ज्वल प्रतीक आहे. 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचे मंत्रिमंडळ स्वागत करते.India is on the moon! We have our national pride placed on the moon: PM Modi
August 26th, 08:15 am
PM Modi visited the ISRO Telemetry Tracking and Command Network (ISTRAC) in Bengaluru after his arrival from Greece and addressed Team ISRO on the success of Chandrayaan-3. PM Modi said that this is not a simple success. He said this achievement heralds India’s scientific power in infinite space. An elated PM Modi exclaimed, “India is on the Moon, We have our national pride placed on the Moon.चांद्रयान-3 च्या यशाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोच्या चमूला केले संबोधित
August 26th, 07:49 am
ग्रीसचा दौरा आटोपून मायदेशी परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरु येथे इस्रोच्या टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) ला भेट दिली आणि चांद्रयान-3 च्या यशाबद्दल इस्रोच्या चमूसमोर आपले विचार व्यक्त केले. चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या चमूमधील शास्त्रज्ञांची त्यांनी भेट घेतली ज्यावेळी त्यांना चांद्रयान-3 मोहिमेद्वारे मिळत असलेली माहिती आणि मोहिमेची प्रगती याविषयीची माहिती देण्यात आली.