'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 28th, 11:30 am
2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.राष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आणि कौशल्य विकासासाठी पाच राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
May 07th, 02:07 pm
भारतातील व्यावसायिक शिक्षणात परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, राष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण (ITI) संस्थांचे अद्ययावतीकरण करण्यास तसेच पाच नव्या केंद्रशासन पुरस्कृत राष्ट्रीय उत्कृष्टता कौशल्य केंद्रांची स्थापना करण्यास मंजूरी दिली आहे.