राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम – पर्वतमाला प्रकल्पांतर्गत उत्तराखंड मधील गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी (12.4 किमी) दरम्यान रोपवे प्रकल्प विकसित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
March 05th, 03:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी दरम्यान 12.4 किमी लांबीचा रोपवे प्रकल्प विकसित करायला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर (डीबीएफओटी), अर्थात बांधा-वापर-हस्तांतरित करा, या तत्वावर विकसित केला जाणार असून, त्यासाठी एकूण 2,730.13 कोटी रुपये भांडवली खर्च होईल.राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम - पर्वतमाला परियोजनेअंतर्गत उत्तराखंड राज्यातील सोनप्रयाग ते केदारनाथ (12.9 किमी) पर्यंतच्या रोपवे प्रकल्पाच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
March 05th, 03:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) सोनप्रयाग ते केदारनाथ (12.9 किमी) पर्यंत 12.9 किमी रोपवे प्रकल्पाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (डीबीएफओटी) अर्थात संरचना, बांधकाम, वित्तपुरवठा, कार्यान्वयन आणि हस्तांतरण पद्धतीने विकसित केला जाईल आणि यासाठी एकूण 4,081.28 कोटी रुपये भांडवली खर्च येईल.