दहशतवाद भारतीयत्वाची भावना भंग करू शकणार नाही: पंतप्रधान मोदी
April 24th, 03:36 pm
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात निरपराध लोकांचा बळी गेल्याबद्दल भारतभर शोक व्यक्त होत आहे. बिहारमधील मधुबनी येथे आयोजित राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशवसीयांच्या वतीने या हल्ल्याबद्दल तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केला. संपूर्ण देशाच्या वतीने पीडित कुटुंबांबद्दल सहानुभूती म्हणून दोन मिनिटे मौन पाळून हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.बिहारमध्ये मधुबनी इथे राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 24th, 12:00 pm
माझे भाषण सुरू करण्यापूर्वी, मी तुम्हा सर्वांना एक विनंती करू इच्छितो, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे, आपल्या जागेवर बसल्या बसल्याच, उभे राहण्याची आवश्यकता नाही, बसल्या बसल्याच 22 तारखेला ज्या कुटुंबातल्या सदस्यांना आपण गमावले आहे, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काही क्षण आपल्या जागेवर बसल्या बसल्याच, मौन बाळगत, आपल्या आराध्य देवतांचे स्मरण करत, त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करू , त्यानंतर मी आज माझे भाषण सुरू करेन.राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये मधुबनी येथे 13,480 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विकासकामांचा शुभारंभ
April 24th, 11:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आज बिहारमध्ये मधुबनी येथे 13,480 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्यात जीव गमावलेल्या लोकांसाठी मौन पाळून श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की पंचायती राज दिनानिमित्त संपूर्ण देश मिथिला आणि बिहारशी जोडला गेला आहे. बिहारच्या विकासाचे उद्दिष्ट असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी झाली आहे असे सांगून पंतप्रधानांनी वीजनिर्मिती, रेल्वे तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रांतील या उपक्रमांमुळे बिहारमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील हे आवर्जून नमूद केले. महान कवी आणि राष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या रामधारी सिंह दिनकर जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.पंतप्रधान 24 एप्रिल रोजी बिहारला भेट देणार
April 23rd, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिल रोजी बिहारला भेट देतील. ते मधुबनीला जाऊन सकाळी 11:45 वाजता राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. ते 13,480 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील आणि यावेळी उपस्थितांना संबोधित करतील.पंतप्रधान 24 आणि 25 एप्रिलला मध्य प्रदेश, केरळ, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीवला देणार भेट
April 21st, 03:02 pm
पंतप्रधान 24 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजता मध्य प्रदेशातील रीवा येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रिवा येथे त्यांच्या हस्ते सुमारे 17,000 कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होईल.पंचायत राज दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या ग्राम सभांशी साधला संवाद
April 24th, 11:31 am
जम्मू-काश्मीर चे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीराज सिंह जी, याच भूमीचे सुपुत्र माझे सहकारी डॉक्टर जितेंद्र सिंह, श्री कपिल मोरेश्वर पाटील जी, संसदेतले माझे सहकारी जुगल किशोर जी, जम्मू काश्मीर सह संपूर्ण देशातून या कार्यक्रमात सहभागी झालेले लोकप्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-कश्मीर इथे राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी
April 24th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर असून ते राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच सांबा जिल्ह्यातील पल्ली ग्रामपंचायतीतून त्यांनी देशभरातील ग्रामसभांना संबोधित केले. यावेळी, पंतप्रधानांच्या हस्ते 20,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कार्यक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. तसेच, ‘अमृत सरोवर’ उपक्रमाचाही त्यांनी शुभारंभ केला. जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, डॉ जितेंद्र सिंह आणि कपिल पाटील यावेळी उपस्थित होते.राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा
April 24th, 09:51 am
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंचायत संस्था या भारतीय लोकशाहीच्या आधारस्तंभ आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे.PM to launch physical distribution of Property Cards under the SVAMITVA Scheme on 11th October
October 09th, 01:31 pm
In a historic move set to transform rural India and empower millions of Indians, PM Narendra Modi will launch the physical distribution of Property Cards under the SVAMITVA Scheme on 11th October. The launch will enable around one lakh property holders to download their Property Cards through the SMS link delivered on their mobile phones.