उत्तर प्रदेशात वरुणा नदीच्या काठावर 6/4 पदरी उन्नत मार्गिका आणि त्याचे रॅम्प/ वर्तुळाकार वळण रस्त्यांच्या विकासाला, 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' (Hybrid Annuity Model) अंतर्गत आणि एकूण भांडवली खर्चासह 10,998.32 कोटी रुपये खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
July 15th, 04:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज, उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. 31 आणि वरुणा नदीच्या काठाने जाणारा वाराणसी रिंग रोड याना जोडणाऱी 43.218 किलोमीटर लांबीची मार्गिका विकसित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने 6/4 पदरी उन्नत मार्गिकांचा समावेश असून, यात, मुख्य रस्ता, उड्डाणपूल, वळण मार्ग, रॅम्प आणि सेवा रस्त्यांचा समावेश आहे. हा प्रकल्प ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’मार्फत, हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' (HAM) अंतर्गत राबवण्यात येईल. या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 10,998.32 कोटी रुपये इतका असून, यामध्ये 4,565.33 कोटी रुपयांचा स्थापत्य बांधकाम खर्च आणि 934.91 कोटी रुपयांच्या भूसंपादन खर्चाचा समावेश आहे.उत्तर प्रदेशातील NH-34 वर कानपूर ते कबरई 4/6 पदरी प्रवेश-नियंत्रित मार्गाच्या कामास मंत्रिमंडळाची मंजुरी; 7145.14 कोटी खर्चाचा हा प्रकल्प साकारणार बीओटी (टोल) तत्त्वावर
July 01st, 03:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने आज 117.7 किलोमीटर लांबीच्या कानपूर- कबरई प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्गाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. हा मार्ग चार पदरी असेल, यावरील पूल आणि इतर बांधकामे भविष्यातील सहा पदरीकरणाचा विचार करून डिझाइन केली जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग कार्यक्रमांतर्गत भोपाळ-कानपूर आर्थिक कॉरिडॉरचा हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.