तामिळनाडूमध्ये 1853 कोटी रुपये खर्चासह 4-पदरी परमकुडी–रामनाथपुरम् (एनएच-87) खंडाच्या बांधकामास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

July 01st, 03:13 pm

केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूमध्ये 4 -पदरी परमकुडी ते रामनाथपुरम् (एनएच-87) खंडाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. सुमारे 46.7 किलोमीटर लांबीचा हा मार्ग हायब्रिड अ‍ॅन्युइटी मोड वर विकसित केला जाणार असून त्यासाठी एकूण 1,853 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.