पंतप्रधान 28 मार्च रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर

March 26th, 09:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मार्च 2026 रोजी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ते गौतम बुद्ध नगर, जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल इमारतीला भेट देतील. त्यानंतर, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार असून यानिमित्त होणाऱ्या जाहीर सभेलाही ते संबोधित करतील.