पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या पुढील हप्त्याच्या वितरणप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 09th, 12:31 pm

केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मी गेले काही दिवस संवाद साधत आहे. यातून सरकारने ज्या योजना सुरु केल्या आहेत त्यांचा लाभ सामान्य लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतो आहे हे आपल्याला अधिक उत्तम पद्धतीने समजून घेता येते. जनता जनार्दनाशी थेट संपर्क ठेवण्याचा हा फायदा आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, देशभरातील अनेक राज्यांतून या कार्यक्रमात सहभागी झालेला माननीय मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री, विविध राज्य सरकारांतील मंत्री, अन्य प्रतिष्ठित व्यक्ती आणि देशभरातून या कार्यक्रमात सहभागी झालेले शेतकरी तसेच बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधानांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा नववा हप्ता जाहीर

August 09th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, या योजनेच्या पुढच्या टप्प्याचे पैसे जमा करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात, पंतप्रधानांनी लाभार्थी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. या कार्यक्रमाअंतर्गत, 9.75 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, 19,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी थेट जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हा नववा हप्ता होता.

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अल्प मुदतीच्या कर्जासाठी बँकांना व्याज अनुदान देण्यास मंत्रिमंडळाची मंजूरी

June 14th, 03:44 pm

2017 - 18 साठी अल्प मुदतीच्या कर्जावर शेतकऱ्यांना व्याजदरात सवलत देण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रणीत केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. यानुसार शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर केवळ चार टक्के व्याजदर आकारला जाईल. या योजनेसाठी सरकारने 20,339 कोटी रुपये निधीही मंजूर केला आहे.

#VikasKaBudget: Know more about Budget 2016

February 29th, 03:21 pm