पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये नागरिकांना अमलीपदार्थमुक्त भारताच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

August 30th, 11:30 am

या महिन्याच्या 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय हातमाग दिन, स्वातंत्र्यदिन आणि भारत छोडो आंदोलनासह ऑगस्ट महिन्यातील प्रमुख घटनांवर प्रकाश टाकला, तसेच जन्माष्टमी आणि विश्वकर्मा पूजा यांसारख्या आगामी सणांचा उल्लेख करत देशभक्ती आणि 'वोकल फॉर लोकल'चा संकल्प अधिक दृढ केला. त्यांनी जंगल संवर्धन, भारताचा इतिहास, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवरही भाष्य केले.

पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

August 26th, 10:22 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया संवाद'ला संबोधित करतील. भारताच्या क्रीडा प्रवासात तरुणांना सहभागी करून घेणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि समृद्ध युवा-नेतृत्वाखालील विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे योगदान मिळवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

विकसित भारताच्या पुढील झेपेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून आवाहन

August 15th, 12:51 pm

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 सालापर्यंत भारताला विकसित भारत बनविण्याच्या प्रवासाला वेग देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण आवाहने केली. देशाची कार्यसंस्कृती, विचारसरणी आणि महत्त्वाकांक्षेची व्याप्ती बदलण्याची गरज अधोरेखित करताना पंतप्रधानांनी नागरिक, सरकार, उद्योग, शेतकरी, युवक आणि समाजातील इतर घटकांना सामूहिक कृती करण्याचे आवाहन केले.

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर

August 15th, 07:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केले देशाला संबोधित

August 15th, 06:50 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.

भारताने 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.

August 15th, 06:45 am

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून 80 व्या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना, 140 कोटी भारतीयांच्या शक्ती आणि संकल्पाच्या जोरावर 2047 पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याचे स्वप्न मांडले. त्यांनी शांती कायदा, रेल्वेचे विद्युतीकरण, भारताचे व्यापार करार, नक्षलवादाचा अंत आणि इतर महत्त्वपूर्ण उपक्रमांवर भर दिला. तसेच, त्यांनी देशवासीयांना 'शक्तीची सप्तधारा' स्वीकारण्याचे आवाहन केले.

'नशा मुक्त युवा के लिए विकसित भारत संकल्प अभियाना'च्या शुभारंभाप्रसंगी पंतप्रधानांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर

August 02nd, 11:25 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प अभियाना'चा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केला. यावेळी संबोधित करताना त्यांनी, 28,000 हून अधिक ठिकाणांहून जोडल्या गेलेल्या एक कोटीहून अधिक युवा नागरिकांसह उपस्थित विविध जनसमुदायाचे औपचारिक स्वागत केले. या क्षणाचे सामूहिक गांभीर्य व महत्त्व अधोरेखित करत त्यांनी, यातून सखोल राष्ट्रीय कटिबद्धता दिसून येत असल्याचे नमूद केले. आज आपण सर्व देशवासीय एका महान आणि महत्त्वाच्या संकल्पासाठी एकत्र आलो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियाना'चा शुभारंभ

August 02nd, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प अभियाना'चा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केला. यावेळी संबोधित करताना त्यांनी, 28,000 हून अधिक ठिकाणांहून जोडल्या गेलेल्या एक कोटीहून अधिक युवा नागरिकांसह उपस्थित विविध जनसमुदायाचे औपचारिक स्वागत केले. या क्षणाचे सामूहिक गांभीर्य व महत्त्व अधोरेखित करत त्यांनी, यातून सखोल राष्ट्रीय कटिबद्धता दिसून येत असल्याचे नमूद केले. आज आपण सर्व देशवासीय एका महान आणि महत्त्वाच्या संकल्पासाठी एकत्र आलो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा -विकसित भारत संकल्प अभियानाचा करणार प्रारंभ

August 01st, 04:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे नशामुक्त युवा -विकसित भारत संकल्प अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. युवकांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करणे आणि आपल्या समाजात सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचे दूत बनण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.