अरुणाचल प्रदेशातील अंजॉ जिल्ह्यात 1200 मेगावॅट क्षमतेच्या कलाई-2 जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीसाठी 14105.83 कोटी रुपयांच्या खर्चाच्या गुंतवणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
April 08th, 04:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने अरुणाचल प्रदेशातील अंजॉ जिल्ह्यातील लोहित नदीवर कलाई-2 जलविद्युत प्रकल्पाच्या (एचईपी) बांधकामासाठी 14105.83 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाजित कालावधी 78 महिन्यांचा आहे.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये पश्चिम आशियातील संकटावर मात करण्यासाठी 140 कोटी भारतीयांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला.
March 29th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य केले आणि या संकटावर मात करण्यासाठी एकजूट राहण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी नागरिकांना अफवांना बळी न पडण्याचे आणि केवळ सरकारने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी ज्ञान भारतम सर्वेक्षण, खेळ आणि तंदुरुस्ती, जलसंधारण, मत्स्यपालन आणि सौर ऊर्जा अशा प्रमुख विषयांचाही उल्लेख केला.देशातील महिला विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रमुख भागीदार
November 30th, 01:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचेही उदघाटन केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथील 10,000 जनौषधी केंद्राचे लोकार्पण केले. यावेळी, मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत नेण्याच्या कार्यक्रमासही आरंभ केला.महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती. या आश्वासनांची पूर्ती या कार्यक्रमाने झाली आहे.