सिक्कीममधील नामची येथे बोगदा कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख

July 21st, 01:01 pm

सिक्कीममधील नामची येथे बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले आहे.त्यांनी शोकाकुल कुटुंबांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली.

पंतप्रधान 27-28 एप्रिल रोजी सिक्किम दौऱ्यावर

April 26th, 03:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27-28 एप्रिल 2026 रोजी सिक्कीमला भेट देतील. 27 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता त्यांचे गंगटोक इथं आगमन होणार आहे. 28 एप्रिल रोजी साधारण सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान गंगटोकमधील ऑर्किडेरियम येथे भेट देणार आहेत. राज्याच्या पर्यावरणीय आणि पुष्पवारसाचे दर्शन घडवण्यासाठी 'स्वर्णजयंती मैत्री मंजरी पार्क' चा अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे ऑर्किड अनुभव केंद्र म्हणून विकास करण्यात आला आहे.