सेवा संकल्प प्रस्ताव
February 24th, 04:53 pm
ही बैठक आणि ही इमारत नवभारताच्या नवनिर्माणाची एक प्रत्यक्ष अभिव्यक्ती आहे. या प्रारंभासह, आपण त्या भविष्याचे स्वागत करत आहोत, ज्याच्या उभारणीत अनेक शतकांचे कठोर परिश्रम आहेत. स्वातंत्र्यानंतर, पंतप्रधान कार्यालय, साउथ ब्लॉक येथे इतकी दशके सरकारांनी वारसा जपला आणि भविष्याची स्वप्ने पाहिली. आपण अशा भारताचे स्वप्न पाहिले ज्याचे विचार स्वदेशी असतील, ज्याचे स्वरूप आधुनिक असेल आणि सामर्थ्य अनंत असेल. आज हे सेवातीर्थ त्याच संकल्पनेचे मूर्तिमंत रूप आहे जे लोकशाहीची जननी म्हणून भारताचा गौरव आणखी वाढवेल.सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-१ आणि २ च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 13th, 06:55 pm
केंद्र सरकारमधील सर्व मंत्री, सर्व खासदार, सर्व सरकारी कर्मचारी, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो!नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1आणि 2च्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
February 13th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1 आणि 2 च्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आज सर्वजण एक नवीन इतिहास घडताना पाहत आहेत. त्यांनी अधोरेखित केले की विक्रम संवत 2082 रोजी, फाल्गुन कृष्ण पक्ष, विजया एकादशी, माघ 24 आणि शक संवत 1947 च्या शुभ मुहूर्तावर, आजच्या प्रचलित भाषेत 13 फेब्रुवारी 2026 हा दिवस भारताच्या विकास प्रवासात एका नवीन आरंभाचा साक्षीदार बनला आहे. शास्त्रांमध्ये विजया एकादशीला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी घेतलेला संकल्प नेहमीच विजयाकडे घेऊन जातो. मोदी म्हणाले की, आज विकसित भारताचा संकल्प घेऊन आपण सर्वजण सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनात प्रवेश करत आहेत. या ध्येयात विजयी होण्यासाठी दैवी आशीर्वाद आपल्यासोबत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. सेवा तीर्थ आणि नवीन इमारतींबद्दल त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची टीम , कॅबिनेट सचिवालय आणि विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांचे अभिनंदन केले. या इमारतींच्या बांधकामात सहभागी सर्व अभियंते आणि कामगार सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.‘नागरिक देवो भव’ या तत्त्वावर आधारित ‘सेवा तीर्था’चे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
February 13th, 05:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सेवा तीर्थाचे लोकार्पण झाले. याद्वारे भारतीयांची सेवा करण्याबाबतचा त्यांच्या अढळ निर्धाराचा पुनरुच्चार आणि नागरिक देवो भव हे मार्गदर्शक तत्त्व असल्याचे ठळकपणे दिसून आले.