पंतप्रधान मोदींच्या नागरकोइल रोडशोमधील अलोट गर्दी; तामिळनाडूमध्ये भाजप-एनडीएला वाढत्या समर्थनाचे संकेत
April 15th, 05:32 pm
तामिळनाडूच्या नागरकोइल येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोडशोमध्ये समाजातील विविध घटकांचा उत्साहपूर्ण सहभाग पाहायला मिळाला. हा उत्स्फूर्त प्रतिसाद भाजप-एनडीएच्या सर्वसमावेशक प्रशासनाला मिळणारी वाढती पसंती दर्शवतो आणि राज्यातील बदलत्या राजकीय वातावरणाकडे अंगुलीनिर्देश करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी रोजी केरळ दौ-यावर
January 22nd, 02:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी 2026 रोजी केरळला भेट देणार आहेत. तिरुवअनंतपुरममध्ये सकाळी 10:45 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि आरंभ करण्यात येईल. या कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधितही करतील.