मेक इन इंडिया उपक्रमाच्या 11 वर्षपूर्तीप्रसंगी पंतप्रधानांचे अभिवादन

September 25th, 01:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मेक इन इंडिया उपक्रमाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त, भारताच्या आर्थिक प्रवासावर आणि उद्योजकीय परिसंस्थेवर झालेल्या परिवर्तनात्मक परिणामाचा गौरव केला. पंतप्रधानांनी नमूद केले की, मेक इन इंडियाने भारतातील उद्योजकांना प्रचंड बळ दिले असून, त्यातून जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण झाला आहे.

'आयुष्मान भारत'च्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी घेतला योजनेचा मागोवा

September 23rd, 12:52 pm

आयुष्मान भारतला आज सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, या योजनेच्या परिणामांचा मागोवा घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारतने लाखो नागरिकांना परवडणारी, आर्थिक संरक्षण आणि सन्मानासह आरोग्यसेवा मिळेल हे सुनिश्चित करून दर्जेदार आरोग्यसेवेची नवी व्याख्या केली असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार

September 16th, 02:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. त्यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता धार येथे 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' आणि '8 व्या राष्ट्रीय पोषण माह' अभियानाचा प्रारंभ होईल. यावेळी ते इतर अनेक उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.

डिजिटल इंडिया उपक्रमाच्या दशकपूर्ती बद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.

July 01st, 09:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया उपक्रमाच्या 10 वर्षांच्या यशस्वी वाटचाली बद्दल कौतुक केले आहे. एका दशकानंतर, आपण अशा प्रवासाचे साक्षीदार आहोत ज्याने असंख्य लोकांच्या जीवनांना स्पर्श केला असून सक्षमीकरणाच्या एका नवीन युगाची सुरुवात केली, असे त्यांनी म्हटले आहे. भारताने डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत, आणि त्यामागे 140 कोटी भारतीयांची सामूहिक इच्छाशक्ती आहे. असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान 20 - 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार

June 19th, 05:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 - 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. 20 जून रोजी ते बिहारमधील सिवानला भेट देतील आणि दुपारी 12 च्या सुमारास विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी देशाची बांधिलकी पंतप्रधानांकडून अधोरेखित

March 03rd, 07:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त विविध वन्यजीवांच्या संरक्षणासाठी असलेली देशाची बांधिलकी अधोरेखित केली. MyGovIndia च्या एक्स वरील पोस्टला प्रतिसाद देताना ते म्हणाले:

परीक्षेचा ताण आणि भीती यावर यशस्वीपणे मात करणाऱ्या आणि या संदर्भात सर्वोत्तम तज्ज्ञ असलेल्या परीक्षार्थी योद्ध्यांचे विचार ऐकूया : पंतप्रधान

February 17th, 07:41 pm

परीक्षेचा ताण आणि भीती यावर यशस्वीपणे मात करणाऱ्या तरुण परीक्षार्थी योद्ध्यांचा समावेश असलेला,‘परीक्षा पे चर्चा 2025’ या कार्यक्रमाचा विशेष भाग 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. या विद्यार्थ्यांचे अनुभव, अभ्यासाची रणनीती आणि परीक्षेचा ताण, चिंता यांचा सामना करून दबावाखाली देखील शांत राहण्याबाबत त्यांनी व्यक्त केलेले विचार या भागात आपल्याला ऐकायला मिळतील.

परीक्षा योद्ध्यांसाठी 'सकारात्मकता' हा सर्वात मोठ्या सहयोगींपैकी एक आहे - पंतप्रधान

February 15th, 05:58 pm

परीक्षेच्या तयारीच्या काळात सकारात्मकतेचे महत्त्व अधोरेखित करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना उद्याचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा विशेष कार्यक्रम पाहण्याचे आवाहन केले.

ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहेः पंतप्रधान

January 18th, 10:54 am

ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी स्वामित्व या परिवर्तनकारी योजनेबद्दल एक माहितीपूर्ण थ्रेड सामायिक केला

January 18th, 10:07 am

MyGovIndia ने X या समाजमाध्यमावर केलेल्या एका पोस्टला प्रतिसाद देताना त्यांनी लिहिले की : स्वामित्व योजनेमुळे झालेल्या परिवर्तनाचे स्पष्टीकरण देणारा एक माहितीपूर्ण थ्रेड सामायिक करत आहे.”

भारतातल्या प्रतिभावान युवा पिढीमुळे सर्व क्षेत्रात अभूतपूर्व विकास होत आहे - पंतप्रधान

January 04th, 04:14 pm

भारताला विविध क्षेत्रात मिळत असलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशंसा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हे यश प्रामुख्याने देशातल्या युवा पिढीच्या प्रतिभेचे आणि उर्जेचे असल्याचे नमूद केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत वीर बाल दिवस कार्यक्रमात होणार सहभागी

December 25th, 01:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता वीर बाल दिवस या देशव्यापी उत्सवात सहभागी होणार आहेत. भारताचा भविष्याचा पाया असणाऱ्या लहान मुलांना सन्मानित करण्यासाठी या उत्सवाचे आयोजन केले जाते. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

आपली युवा शक्ती चमत्कार घडवू शकते - पंतप्रधान नरेंद्र मोदी

November 28th, 07:41 pm

भारताची युवा शक्ती चमत्कार घडवू शकते, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. या युवाशक्तीने चमकदार कामगिरी करावी आणि त्यांना सर्वोत्कृष्ट बनवता यावं यासाठी सर्व संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आहे.

Prime Minister hails Make In India success story for global economic boost

July 16th, 10:28 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has hailed Make In India success story for global economic boost. Shri Modi has shared a glimpse of how Make In India is propelling India's economy onto the global stage.

डिजिटल इंडिया उपक्रमाला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

July 01st, 01:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया उपक्रमाने यशस्वीरित्या 9 वर्षे पूर्ण केल्याबद्दल प्रशंसा केली आहे. जीवनमान सुलभता आणि पारदर्शकतेला चालना देणाऱ्या सक्षम भारताचे डिजिटल इंडिया हे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.

बँकिंग क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या योगदानाचे पंतप्रधानांकडून कौतुक

June 19th, 08:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी MyGovIndia द्वारे X या समाजमाध्यमावर पोस्ट करण्यात आलेली शृंखला सामायिक करत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बँकिंग क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी दिलेले योगदान अधोरेखित केले आहे.

नॅशनल क्रिएटर्स अवार्ड मध्ये सहभाग घेण्याची पंतप्रधानांचे लोकांना आवाहन

February 11th, 08:28 pm

नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डची माहिती देणाऱ्या MyGovIndia च्या X पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे:

26 डिसेंबर 2023 रोजी 'वीर बाल दिना'निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी

December 25th, 04:17 pm

नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं येत्या 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता 'वीर बाल दिना'निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते दिल्लीतल्या तरुणांच्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवतील.

सरकारी योजना दिवाळीत प्रत्येक घरात आनंद घेऊन येत आहेत : पंतप्रधान

November 10th, 03:03 pm

अनेक सरकारी योजनांमुळे, प्रत्येक घर दिवाळीत आनंदात असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मन की बात (मराठी अनुवाद) 105वा भाग

September 24th, 11:30 am

‘मन की बात’च्या आणखी एका भागात मला तुमच्यासोबत देशाचे यश, देशवासियांचे यश, त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास याबाबत बोलण्याची संधी मिळाली आहे. सध्या मला आलेली बहुतेक पत्रं आणि संदेश, मुख्यत्वेकरुन याच दोन विषयांवर आहेत. पहिला विषय म्हणजे चंद्रयान-3चे यशस्वी अवतरण आणि दुसरा विषय जी-20चे दिल्लीतील यशस्वी आयोजन. मला देशाच्या प्रत्येक भागातून, समाजातील प्रत्येक घटकाकडून, सर्व वयोगटातील लोकांकडून असंख्य पत्रे मिळाली आहेत. चंद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरत असताना कोट्यवधी लोक एकाच वेळी वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेच्या क्षणाक्षणाचे साक्षीदार होत होते. इस्रोच्या यू-ट्यूब लाईव्ह वाहिनीवर 80 लाखांहून अधिक लोकांनी ही घटना थेट पाहिली, हा एक विक्रमच आहे. यावरून हे लक्षात येते की, कोट्यवधी भारतीयांचं चंद्रयान-3 सोबत किती गहिरं नातं आहे. चांद्रयानाच्या या यशावर आधारीत, देशात सध्या एक अतिशय सुंदर अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू आहे, प्रश्नांची उत्तरे देण्याची स्पर्धा आणि तिचं नाव आहे - 'चंद्रयान-3 महाक्विझ'. MyGov पोर्टलवर होत असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे. MyGov सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नमंजुषा स्पर्धेमधला हा सर्वात मोठा सहभाग आहे. मी तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही अद्याप यात सहभागी झाला नसाल तर उशीर करू नका, अजून सहा दिवस शिल्लक आहेत. या प्रश्नमंजुषेमध्ये जरूर भाग घ्या.