पंतप्रधानांनी प्रधानमंत्री जनधन योजनेच्या परिवर्तनकारी 11 वर्षांचा गौरव केला
August 28th, 01:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजनेच्या (पीएमजेडीवाय) 11 व्या वर्धापन दिनानिमित्त गौरवोद्गार काढले. आर्थिक समावेशनात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमामुळे देशातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक समावेशन पोहोचले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जनधन योजनेमुळे नागरिकांच्या सन्मानात भर पडली असून, स्वतःचे भविष्य घडविण्याची क्षमता त्यांना प्राप्त झाली आहे.पंतप्रधान म्हणाले की भारत अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय झेप घेत आहे; या क्षेत्रातील सुधारणा नव्या आघाड्यांचा शोध घेण्यासंदर्भात तरुणांना आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहित करत आहेत
August 23rd, 01:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की 140 कोटी भारतीयांचे कौशल्य आणि प्रतिभेच्या जोरावर भारत अंतराळ विश्वात उल्लेखनीय झेप घेत आहे.स्वावलंबन हा 2047 पर्यंत विकसित भारताकडे नेणारा मार्ग: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 27th, 11:30 am
‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या हृदयामध्ये जणू एक आनंदाची लाट उसळली. संपूर्ण देशाला शुभांशू यांच्या कामगिरीविषयी अभिमान वाटला. अशावेळी मला एका घटनेचं स्मरण होत आहे. ज्यावेळी ऑगस्त 2023 मध्ये चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, त्यावेळीही देशामध्ये अशाच प्रकारचे अनोखे वातावरण तयार झाले होते. विज्ञानापासून ते अंतराळापर्यंतच्या विषयांमध्ये अगदी लहान-लहान मुलांमध्येही एक नवीन जिज्ञासा, उत्सुकता जागृत झाली होती. आता लहान-लहान मुलेही म्हणताहेत की, आम्हीही अंतराळामध्ये जाणार! आम्हीही चंद्रावर जाणार, अंतराळ संशोधक बनणार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात भारताच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणि आधुनिकेतला बळकटी देणाऱ्या अभूतपूर्व प्रगतीची प्रशंसा केली आहे,
June 10th, 09:47 am
भारताने गेल्या 11 वर्षात आपल्या संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती अनुभवली असून संरक्षण उत्पादनात आधुनिकता आणि आत्मनिर्भरतेवर स्पष्ट लक्ष केंद्रित केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (120 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
March 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज या अत्यंत शुभ दिवशी मला तुमच्यासोबत 'मन की बात' करण्याची संधी मिळाली आहे. आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातली प्रतिपदा तिथी आहे. आजपासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होत आहे. भारतीय नववर्ष देखील आजपासून सुरू होत आहे. यावेळी विक्रम संवत 2082 (दोन हजार ब्याऐंशी) सुरू होत आहे. सध्या तुमची अनेक पत्रं माझ्यासमोर आहेत. काही बिहारची आहेत, काही बंगालची आहेत, काही तामिळनाडूची तर काही गुजरातची आहेत. यामध्ये लोकांनी त्यांचे विचार अतिशय मनोरंजक पद्धतीनं लिहिले आहेत. अनेक पत्रांमध्ये शुभेच्छा आणि अभिनंदनाचे संदेश देखील आहेत. पण आज मला काही संदेश तुम्हाला ऐकवावेसे वाटत आहेत -आम्हाला आमच्या अन्नदात्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत: पंतप्रधान
February 24th, 10:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की सरकारला भारतातील अन्नदात्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. MyGovIndia ने X या समाजमाध्यमावर दिलेल्या थ्रेड पोस्टला उत्तर देताना ते म्हणाले:भारतीय समुदायाने वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 24th, 11:30 am
मन की बात च्या 116 व्या भागात, पंतप्रधान मोदींनी NCC छात्रांचा विकास आणि आपत्ती निवारणाच्या कार्यातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकत NCC दिनाचे महत्व विशद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण होण्याची गरज त्यांनी स्पष्ट करण्यासोबतच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मदत करणाऱ्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचे यशही त्यांनी शेअर केले.'हर घर तिरंगा अभियान' तिरंग्याचे वैभव टिकवून ठेवणारा एक अनोखा उत्सव झाला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 28th, 11:30 am
मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.#10YearsOfMyGov: सुशासनासाठी परिपक्व आणि उत्साहवर्धक मंच असल्याचे पंतप्रधानांकडून कौतुक
July 26th, 06:50 pm
MyGov हा मंच सुरू होऊन आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंचाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. सुशासनासाठी हा एक परिपक्व मंच असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे.मन की बात: 'मेरा पहला वोट - देश के लिए'... प्रथमच मतदानाचा हक्क बजावत असलेल्या मतदारांना पंतप्रधान मोदींचे आवाहन
February 25th, 11:00 am
नमस्कार ! मन की बात च्या 110 व्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या अनेक सूचना, इनपुट्स आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे याहीवेळी, या भागात कशाकशाचा समावेश करायचा, हे एक आव्हान आहे. सकारात्मकतेने भरलेले एकापेक्षा एक उत्तमोत्तम इनपुट्स मला मिळाले आहेत. इतरांसाठी आशेचा किरण होऊन त्यांची आयुष्यं अधिक चांगली करण्यासाठी अविरत झटणाऱ्या अनेक देशबांधवांचा यांमध्ये उल्लेख आहे.नवी दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदान येथे एनसीसी छात्रसैनिकांच्या रॅलीला पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
January 27th, 05:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राजनाथ सिंह जी, अजय भट्ट जी, तिन्ही दलांचे प्रमुख, सीडीएस जनरल अनिल चौहान जी, संरक्षण सचिव, एनसीसीचे महासंचालक , सर्व अतिथी आणि एनसीसीचे माझे तरुण मित्रांनो...पंतप्रधानांनी करिअप्पा परेड ग्राउंड, दिल्ली येथे एनसीसी पीएम रॅलीला केले संबोधित
January 27th, 04:30 pm
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की ते स्वत: एनसीसीचे माजी छात्रसैनिक असल्यामुळे एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित असताना त्या आठवणी जाग्या होणे स्वाभाविक आहे. “एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित राहताना एक भारत श्रेष्ठ भारत’ची प्रचिती येते”, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की देशाच्या विविध भागांतील छात्रसैनिक इथे उपस्थित असल्याचे त्यांना आढळले आहे. एनसीसीची व्याप्ती सातत्याने वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आजचा हा प्रसंग एक नवीन सुरुवात असल्याचे नमूद केले. व्हायब्रंट व्हिलेज योजनेंतर्गत सरकार विकसित करत असलेल्या सीमावर्ती भागातील गावांचे 400 हून अधिक सरपंच आणि देशभरातील बचत गटांमधील 100 हून अधिक महिला इथे उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले .वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन
December 26th, 12:03 pm
आज देश वीर साहिबजादांच्या अमर बलिदानाचे स्मरण करत आहे, त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहे.स्वातंत्र्याच्या अमृतकाळात वीर बाल दिवस रूपाने नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला आहे. गेल्या वर्षी देशाने प्रथमच 26 डिसेंबर, वीर बाल दिवस म्हणून साजरा केला तेव्हा अवघ्या देशाने भाव विभोर होऊन साहिबजादांच्या वीर गाथा ऐकल्या होत्या. वीर बाल दिवस, भारतीयत्वाच्या रक्षणासाठी, कोणतीही सीमा न ठेवता कोणतेही कृत्य करण्याच्या संकल्पाचे प्रतिक आहे. अत्युच्च शौर्य गाजवताना लहान वय आड येत नाही याचे स्मरण आपल्याला हा दिवस करून देतो. हे या महान वारश्याचे पर्व आहे, जिथे गुरू म्हणतात -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वीर बाल दिवस’ कार्यक्रमाला केले संबोधित
December 26th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘वीर बाल दिवस’ या कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी मुलांनी सादर केलेले पठण आणि मार्शल आर्टची तीन प्रदर्शने पाहिली. यावेळी पंतप्रधानांनी दिल्लीतील तरुणांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.काशी विश्वनाथ मार्गिकेची द्विवर्षपूर्ती पंतप्रधानांनी केली साजरी
December 14th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ मार्गिकेची द्विवर्षपूर्ती साजरी केली आहे.विकसित भारत 2047-युवांचा आवाज उपक्रमाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
December 11th, 10:35 am
आजचा दिवस ‘विकसित भारत’च्या संकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘विकसित भारत’शी संबंधित ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मी सर्व राज्यपालांचे विशेष अभिनंदन करतो. देशातील तरुणांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उचलणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना तुम्ही एका व्यासपीठावर आणले आहे. शैक्षणिक संस्थांच्या भूमिकेमुळे वैयक्तिक विकास होतो आणि राष्ट्राची उभारणी वैयक्तिक विकासातून होते. भारत सध्या ज्या युगात आहे, त्या काळात वैयक्तिक विकासाची मोहीम अत्यंत महत्त्वाची बनली आहे. युवांचा आवाज कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.'विकसित भारत @2047 : युवांचा आवाज' उपक्रमाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ
December 11th, 10:30 am
विकसित भारत उपक्रम पुढे नेण्यासाठी आजची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सर्व राज्यपालांचे आभार मानून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. विकसित भारत संकल्पासाठी आजचा कार्यक्रम विशेष असल्याचे ते म्हणाले. विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशातील तरुणांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असलेल्या सर्व संबंधितांना एकत्र आणण्याच्या त्यांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी व्यक्तिमत्त्व विकासात शैक्षणिक संस्थांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. लोकांचा विकास झाला तरच राष्ट्र विकसित होते, असे त्यांनी अधोरेखित केले. सध्याच्या युगात व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित करून पंतप्रधानांनी 'युवांचा आवाज' कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.140 कोटी जनता अनेक बदल घडवून आणत आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 26th, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.केवडिया येथील राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्यातील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
October 31st, 10:00 am
तुम्हा सर्व तरुणांचा, साहसी लोकांचा हा उत्साह, ही राष्ट्रीय एकता दिवसाची खूप मोठी ताकद आहे. एकप्रकारे लघु भारताचे, मिनी इंडियाचे रूप मला समोर दिसते. राज्ये वेगळी आहेत, भाषा वेगळी आहे, परंपरा वेगळ्या आहेत, पण इथे उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती एकतेच्या मजबूत धाग्याने जोडलेली आहे. मणी अनेक आहेत, पण माळ एक आहे. शरीरे अनेक आहेत, पण मन एकच आहे. ज्याप्रमाणे 15 ऑगस्ट हा आपल्या स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि 26 जानेवारी हा आपल्या प्रजासत्ताक दिनाचा जयघोष करण्याचा दिवस आहे, त्याचप्रमाणे 31 ऑक्टोबर हा दिवस देशाच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादाच्या संवादाचा उत्सव बनला आहे.गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिन समारंभात पंतप्रधान सहभागी
October 31st, 09:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय एकता दिनाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. त्यांनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे त्यांना आदरांजली वाहिली. सीमा सुरक्षा दल आणि विविध राज्य पोलिसांच्या तुकड्यांचा समावेश असलेले राष्ट्रीय एकता दिन संचलन, सीआरपीएफच्या सर्व महिला बायकर्सची थरारक प्रात्यक्षिके, सीमा सुरक्षा दलाचा महिला पाईप बँड, गुजरात महिला पोलिसांनी सादर केलेला नृत्याचा कार्यक्रम, विशेष एनसीसी शो, विविध शाळांचे बँड प्रदर्शन, भारतीय हवाई दलाचा फ्लाय पास्ट, व्हायब्रण्ट व्हिलेजच्या आर्थिक व्यवहार्यतेचे प्रदर्शन आदी कार्यक्रमांना पंतप्रधान उपस्थित होते.