The resolution of a 'Viksit Bharat' will definitely be fulfilled: PM Modi in Mann Ki Baat
December 28th, 11:30 am
In the year’s final Mann Ki Baat episode, PM Modi said that in 2025, India made its mark in national security, sports, science laboratories and global platforms. He expressed hope that the country is ready to move forward in 2026 with fresh resolutions. The PM also highlighted youth-centric initiatives such as the Viksit Bharat Young Leaders Dialogue, Quiz competition, Smart India Hackathon 2025 and Fit India Movement.पंतप्रधानांनी बिहारच्या कोकिळा म्हणून,सुप्रसिद्ध असलेल्या गायिका शारदा सिन्हा जी यांना वाहिली आदरांजली
November 05th, 10:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या कोकिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायिका शारदा सिन्हा जी यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.लोकगीतांच्या माध्यमातून त्यांनी बिहारच्या कला आणि संस्कृतीला एक नवीन ओळख दिली, ज्यासाठी त्यांचे नेहमीच स्मरण केले जाईल. छठ या महान सणाशी संबंधित त्यांची मधुर गाणी लोकांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहेत , असे मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (127 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
October 26th, 11:30 am
अशा कठीण काळात सुमारे वीस वर्षांचा एक युवक या अन्यायाविरुद्ध उभा राहिला. आज मी या तरुणाबद्दल एका खास कारणासाठी चर्चा करत आहे. त्याचे नाव उघड करण्यापूर्वी मी तुम्हाला त्याच्या शौर्याबद्दल सांगेन. मित्रांनो, त्या काळात जेव्हा निजामाविरुद्ध एकही शब्द बोलणे गुन्हा मानले जात असे, तेव्हा या तरुणाने सिद्दीकी नावाच्या निजामाच्या अधिकाऱ्याला उघडपणे आव्हान दिले. निजामाने सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचं पीक जप्त करण्यासाठी पाठवलं होते. परंतु अत्याचाराविरुद्धच्या या संघर्षात त्या तरुणानं सिद्दीकीची हत्या केली. तो अटकेपासून स्वतः ला वाचवण्यातही यशस्वी झाला. निजामाच्या जुलमी पोलिसांपासून सुटका करून घेऊन तो तरुण शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या आसाममध्ये पोहोचला.पद्म विभूषण पंडित छन्नुलाल मिश्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख
October 02nd, 02:00 pm
पद्म विभूषण पंडित छन्नुलाल मिश्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.पंतप्रधानांकडून प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त
October 02nd, 09:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी पंडितजींना भारतीय कला आणि संस्कृतीसाठी जीवनभर समर्पित राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणून गौरविले.स्वदेशी उत्पादने, व्होकल फॉर लोकल: सणांच्या हंगामाच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे मन की बात मधून नागरिकांना आग्रहपूर्वक आवाहन
September 28th, 11:00 am
या महिन्याच्या मन की बातमधील भाषणात पंतप्रधान मोदींनी भगतसिंग आणि लता मंगेशकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. भारतीय संस्कृती, महिला सक्षमीकरण, देशभरात साजरे होणारे विविध सण, रा,स्व, संघाचा 100 वर्षांचा प्रवास, स्वच्छता आणि खादी विक्रीतील वाढ यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले. स्वदेशीचा स्वीकार हाच देशाला स्वावलंबी बनवण्याचा मार्ग आहे, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.लोकप्रिय गायक झुबिन गर्ग यांच्या आकस्मिक निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
September 19th, 06:26 pm
लोकप्रिय गायक झुबिन गर्ग यांचे आकस्मिक निधन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. संगीत क्षेत्रामधील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल ते कायम स्मरणात राहतील, असे मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतरत्न डॉ. भुपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आसामच्या गुवाहाटी येथील समारंभातील संबोधन
September 13th, 08:57 pm
मी म्हणेन भुपेन दा! आपण म्हणा अमर रहें! भुपेन दा, अमर रहे! अमर रहें! भुपेन दा, अमर रहे! भुपेन दा, अमर रहे! अमर रहे! आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य जी, लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा जी, अरुणाचल प्रदेश के युवा मुख्यमंत्री पेमा खांडू जी, केंद्रिय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्वांनंद सोनोवाल जी, व्यासपीठावर उपस्थित भूपेन हजारिका जी यांचे बंधू श्री समर हजारिका जी, भूपेन हजारिकाजींची बहिण श्रीमती कविता बरुआ जी, भूपेन दा यांचे पुत्र श्री तेज हजारिका जी, तेज, केम छो! उपस्थित इतर मान्यवर आणि आसामधील माझ्या बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गुवाहाटी इथे झालेल्या भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या 100 व्या जयंती सोहळ्याला केले संबोधित
September 13th, 05:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममधील गुवाहाटी इथे झालेल्या भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या 100 व्या जयंती सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. या आजचा दिवस अत्यंत उल्लेखनीय असून, हा क्षण खऱ्या अर्थाने अनमोल असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. आपण पाहिलेले कलाविष्काराचे सादरीकरण, अनुभवलेला उत्साह आणि त्यातल्या समन्वयाने आपण खूप भारावून गेलो असल्याची भावनाही त्यांनी उपस्थितांसोबत सामायिक केली. या संपूर्ण कार्यक्रमात भूपेन दा यांच्या संगीताचा ताल निनादत होता ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आपल्या मनात सतत भूपेन हजारिका यांच्या गाण्यातील काही शब्द रुंजी घालत असल्याचा अनुभवही त्यांनी उपस्थितांना सांगितला. भूपेन दा यांच्या संगीतलाटांचे तरंग सर्वत्र उमटत राहाव्यात अशी आपली आंतरिक इच्छाही त्यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे पंतप्रधानांनी मनःपूर्वक कौतुक केले. आसामध्ये सादर होणारा प्रत्येक कार्यक्रम एक नवा विक्रम प्रस्थापित करणारा कार्यक्रम ठरतो, अशीच इथली उर्जा आहे असे ते म्हणाले. आज झालेले कलाविष्काराचे सादरीकरण अपवादात्मक असल्याचे म्हणत, त्यांनी सर्व कलाकारांची प्रशंसा केली तसेच त्यांचे अभिनंदनही केले.PM Modi conferred with highest national award, the ‘Order of the Republic of Trinidad & Tobago
July 04th, 08:20 pm
PM Modi was conferred Trinidad & Tobago’s highest national honour — The Order of the Republic of Trinidad & Tobago — at a special ceremony in Port of Spain. He dedicated the award to the 1.4 billion Indians and the historic bonds of friendship between the two nations, rooted in shared heritage. PM Modi also reaffirmed his commitment to strengthening bilateral ties.पोर्ट ऑफ स्पेनमध्ये त्रिनिदादी गायक राणा मोहीप यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
July 04th, 09:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ पोर्ट ऑफ स्पेन येथे आयोजित केलेल्या मेजवानीच्या वेळी, त्रिनिदादी गायक राणा मोहीप यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहीप यांनी ‘ वैष्णव जन तो’ हे गीत गायले होते.पंतप्रधानांच्या घाना दौऱ्यात विविध क्षेत्रात झालेले सामंजस्य करार
July 03rd, 04:01 am
• द्विपक्षीय संबंधांचे व्यापक भागीदारीमध्ये रूपांतर करणेमुंबईतील वेव्हज परिषदमध्ये पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
May 01st, 03:35 pm
वेव्हज परिषदे मध्ये उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, एल. मुरुगन जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सृजनशील विश्वातील सर्व मान्यवर, विविध देशांतून आलेले माहिती, संवाद, कला आणि संस्कृती विभागांचे मंत्री, विविध देशांचे राजदूत, जगभरातील सृजनशील विश्वातील चेहरे, इतर मान्यवर, बंधूंनो आणि भगिनींनोपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज 2025 चे उद्घाटन
May 01st, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी आज साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिन आणि गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व आंतरराष्ट्रीय मान्यवर, राजदूत आणि सृजनशील उद्योगातील अग्रणींच्या उपस्थितीचे कौतुक करत, पंतप्रधानांनी या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित केले. 100 हून अधिक देशांचे कलाकार, नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते, प्रतिभा आणि सृजनशीलतेच्या जागतिक परिसंस्थेचा पाया रचण्यासाठी एकत्र आले आहेत यावर त्यांनी भर दिला. वेव्हज ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे तर संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीचे प्रतिनिधित्व करणारी एक लाट आहे, असे त्यांनी नमूद केले. ही शिखर परिषद चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन आणि कथाकथनाच्या विस्तृत जगाचे प्रदर्शन करते, तसेच कलाकार आणि सर्जकांचा संवाद साधून त्यांच्या सहयोगासाठी एक जागतिक मंच प्रदान करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पंतप्रधानांनी या ऐतिहासिक प्रसंगी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि देश-विदेशातील मान्यवर अतिथींचे हार्दिक स्वागत केले.चिलीच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांच्या निवेदनाचा अनुवाद
April 01st, 12:31 pm
राष्ट्राध्यक्ष बोरिक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांचा भारताप्रती असलेला दृढ मैत्रीभाव आणि दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठीची त्यांची वचनबद्धता खरोखरच अद्भुत आहे. यासाठी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचं आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं मी मनापासून स्वागत करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (120 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
March 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज या अत्यंत शुभ दिवशी मला तुमच्यासोबत 'मन की बात' करण्याची संधी मिळाली आहे. आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातली प्रतिपदा तिथी आहे. आजपासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होत आहे. भारतीय नववर्ष देखील आजपासून सुरू होत आहे. यावेळी विक्रम संवत 2082 (दोन हजार ब्याऐंशी) सुरू होत आहे. सध्या तुमची अनेक पत्रं माझ्यासमोर आहेत. काही बिहारची आहेत, काही बंगालची आहेत, काही तामिळनाडूची तर काही गुजरातची आहेत. यामध्ये लोकांनी त्यांचे विचार अतिशय मनोरंजक पद्धतीनं लिहिले आहेत. अनेक पत्रांमध्ये शुभेच्छा आणि अभिनंदनाचे संदेश देखील आहेत. पण आज मला काही संदेश तुम्हाला ऐकवावेसे वाटत आहेत -राज्यसभा खासदार सदस्य थिरू इलैयाराजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
March 18th, 04:54 pm
राज्यसभा खासदार थिरू इलैयाराजा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचा प्रचार केल्याबद्दल जर्मन गायिका कॅसमे यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
March 18th, 03:25 pm
जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचा प्रचार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन गायिका कॅसमे यांची प्रशंसा केली आहे.गरिमेल्ला बालकृष्ण प्रसाद गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
March 10th, 07:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गरिमेल्ला बालकृष्ण प्रसाद गारू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गरिमेल्ला बालकृष्ण प्रसाद गारू यांच्या अंतःकरणाच्या तारा छेडणाऱ्या गायनाने आणि संगीताने असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला, त्यांच्या गायनाने आपली समृद्ध आध्यात्मिक आणि संगीत परंपरा जतन करण्यासोबतच त्याचा सोहळाही साजरा केला आहे.दिल्लीतील ‘जहां-ए-खुसरो 2025’ कार्यक्रमातील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 28th, 07:31 pm
आज, जहां-ए-खुसरो येथे आल्यानंतर मन आनंदी होणे खूप स्वाभाविक आहे. हजरत अमीर खुसरो यांना ज्या वसंत ऋतूवर खूप प्रेम होते तो आज दिल्लीतील ऋतूमध्येच नाही तर जहां-ए-खुसरोच्या वातावरणातही आहे. हजरत खुसरो यांच्या शब्दात सांगायचे तर-