PM Modi’s high-energy speech electrifies the Siliguri crowd
April 12th, 01:00 pm
Ahead of the West Bengal Assembly elections, Prime Minister Narendra Modi today turbocharged the BJP’s campaign with a high-energy address in Siliguri, drawing massive public support. Addressing a packed rally in North Bengal, the PM launched a scathing attack on the ruling All India Trinamool Congress (TMC), accusing it of corruption, neglect and fostering a climate of fear.Samrat Samprati Museum is the heritage of millions of people in India, heritage of India's glorious past: PM Modi in Gandhinagar, Gujarat
March 31st, 10:25 am
PM Modi inaugurated the Samrat Samprati Sangrahalay, Jain Heritage Museum at Koba Tirth in Gandhinagar, Gujarat, on the auspicious occasion of Bhagwan Mahavir Janma Kalyanak. Speaking on the occasion, the PM said the Sangrahalay belongs to the crores of people of India and stands as a testament to our glorious past. Lauding the ahimsa philosophy of Samrat Samprati, he called on people to rise above personal aspirations and work for the nation.महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथील सम्राट सम्प्रती संग्रहालयाचे उद्घाटन
March 31st, 10:15 am
भगवान महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथील सम्राट सम्प्रती संग्रहालय या जैन वारसा संग्रहालयाचे उद्घाटन झाले. “कोबा तीर्थ आध्यात्मिक शांततेने भरुन गेले आहे, याठिकाणी अनेक जैन मुनींची आणि संतांची तपस्या फळाला आली आणि इथे सर्जनशीलता व सेवाभाव नैसर्गिकरित्या फुलला,” असे मोदी म्हणाले.दिल्लीमध्ये विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 08th, 03:54 pm
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता जी, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी मनोहर लाल जी, हर्ष मल्होत्रा जी, तोखन साहू जी, दिल्लीचे सर्व मंत्री, माननीय सर्व खासदार, माननीय आमदार आणि दिल्लीच्या माझ्या प्रिय बंधू - भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत 33,500 कोटी रुपयांच्या विविध विकासप्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
March 08th, 10:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत सुमारे 33,500 कोटी रुपये किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, आज आपण सर्वजण दिल्लीच्या विकासाला एक नवीन गती देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत.सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-१ आणि २ च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 13th, 06:55 pm
केंद्र सरकारमधील सर्व मंत्री, सर्व खासदार, सर्व सरकारी कर्मचारी, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो!नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1आणि 2च्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
February 13th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1 आणि 2 च्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आज सर्वजण एक नवीन इतिहास घडताना पाहत आहेत. त्यांनी अधोरेखित केले की विक्रम संवत 2082 रोजी, फाल्गुन कृष्ण पक्ष, विजया एकादशी, माघ 24 आणि शक संवत 1947 च्या शुभ मुहूर्तावर, आजच्या प्रचलित भाषेत 13 फेब्रुवारी 2026 हा दिवस भारताच्या विकास प्रवासात एका नवीन आरंभाचा साक्षीदार बनला आहे. शास्त्रांमध्ये विजया एकादशीला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी घेतलेला संकल्प नेहमीच विजयाकडे घेऊन जातो. मोदी म्हणाले की, आज विकसित भारताचा संकल्प घेऊन आपण सर्वजण सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनात प्रवेश करत आहेत. या ध्येयात विजयी होण्यासाठी दैवी आशीर्वाद आपल्यासोबत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. सेवा तीर्थ आणि नवीन इमारतींबद्दल त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची टीम , कॅबिनेट सचिवालय आणि विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांचे अभिनंदन केले. या इमारतींच्या बांधकामात सहभागी सर्व अभियंते आणि कामगार सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
January 03rd, 12:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, किरण रिजिजू जी, रामदास आठवले जी, राव इंद्रजीत जी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, त्यांना निघावे लागले आणि दिल्लीचे सर्व मंत्री सहकारी, दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना जी, महामहीम, राजनैतिक समुदायाचे सर्व माननीय सदस्य, बौद्ध विद्वान, धम्माचे अनुयायी, भगिनी आणि बंधुंनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन
January 03rd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, ‘द लाईट अँड द लोटस: रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’ (प्रकाश आणि कमळ: प्रबुद्धाचे अवशेष) असे शीर्षक असणाऱ्या, भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताचा वारसा परत आला आहे, भारताचा ठेवा परत आला आहे, असे या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. आजपासून भारतातील लोकांना भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष पाहता येतील आणि त्यांचे आशीर्वाद घेता येतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी या पावन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बौद्ध परंपरेशी संबंधित भिक्खू आणि धर्माचार्य देखील यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. भिक्खू आणि धर्माचार्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला नवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीला होणारा हा मंगल सोहळा अत्यंत प्रेरणादायी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष जगासाठी शांतता, समृद्धी आणि सलोख्याचा नवा अध्याय घेऊन येवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 28th, 11:30 am
2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.लखनौ इथे राष्ट्र प्रेरणा स्थळ उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
December 25th, 06:16 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहयोगी आणि लखनौचे खासदार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्रीमान पंकज चौधरी जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक जी, उपस्थित अन्य मंत्रीगण, लोकप्रतिनिधी,महिला आणि पुरुषहो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन
December 25th, 05:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन आणि आदर्शांचा गौरव करण्यासाठी याची उभारणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला संबोधितही केले.आज लखनौ ची ही भूमी एका नव्या प्रेरणेची साक्षीदार बनली आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशासह जागतिक समुदायाला नाताळच्या शुभेच्छा दिल्या. भारतातही लाखो ख्रिश्चन कुटुंबे आज हा सण साजरा करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नाताळचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.गोव्यामधील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 03:35 pm
आज या पवित्र प्रसंगी मनामध्ये खोलवर शांतता भरली आहे. साधू-संतांच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर आपोआपच आध्यात्मिक अनुभव येत असतो. इथे विशाल संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांमुळे लक्षात येते की, या मठाची शतकांपासूनच प्राचीन जीवंत शक्ती आजही वृद्धिंगत होत आहे. आज या समारंभाला मला उपस्थित राहता आले, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. इथे येण्यापूर्वी मला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. त्या शांत वातावरणाने या कार्यक्रमाच्या आध्यात्मिकतेला आणखी सखोलता प्राप्त झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधित
November 28th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी आपले मन गहन शांतीने भरले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. संतांच्या उपस्थितीत, त्यांच्या सोबत बसणे हा स्वतःच एक आध्यात्मिक अनुभव आहे, यावर त्यांनी भर दिला. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांमुळे या मठाची शतकानुशतके जुनी जिवंत शक्ती आणखी वाढली आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, आज या समारंभात लोकांमध्ये उपस्थित राहणे हे आपले भाग्य आहे. येथे येण्यापूर्वी आपल्याला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराला भेट देण्याचा सौभाग्य लाभले, असे त्यांनी सांगितले. तेथील शांतता आणि तिथल्या वातावरणामुळे या समारंभाची आध्यात्मिकता अधिक सखोल झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोथल येथील राष्ट्रीय समुद्री वारसा संकुलाच्या प्रगतीचा आढावा घेतला
September 20th, 09:52 pm
एकदा पूर्ण झाल्यावर, हे जगातील सर्वात मोठे समुद्री संग्रहालय असेल. यात भारताच्या प्राचीन समुद्री परंपरांचे प्रदर्शन होईल, तसेच हे पर्यटन, संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी केंद्र म्हणून काम करेल, असे मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल) सोसायटीची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
June 23rd, 09:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीमध्ये तीन मूर्ती भवन येथे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल) सोसायटीची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast
March 16th, 11:47 pm
PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद
March 16th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम, गुवाहाटी मध्ये झुमोईर बिनंदिनी कार्यक्रमात केलेले भाषण
February 24th, 06:40 pm
आसामचे राज्यपाल श्री लक्ष्मण प्रसाद आचार्यजी ऊर्जावान मुख्यमंत्री हेमंत बिस्वा जी, केंद्र सरकारातील माझे साथीदार डॉ. एस जयशंकर, सर्बानंद सोनोवाल, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, इतर मंत्री, खासदार, आमदार, सर्व कलाकार साथी आणि आसामच्या माझ्या बंधु भगिनींनो ..पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये गुवाहाटीत झुमर बिनंदिनी कार्यक्रमात झाले सहभागी
February 24th, 06:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामध्ये गुवाहाटी येथे झुमर बिनंदिनी 2025 या भव्य झुमर कार्यक्रमात सहभागी झाले. या समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की या ठिकाणी सर्वत्र ऊर्जा, उत्साह आणि रोमांचाने भरून गेलेले नादमाधुर्याचे वातावरण आहे. झुमरमधील सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम तयारी केली आहे ज्यामधून चहाच्या मळ्यांचा सुगंध आणि सौंदर्य प्रतिबिंबित होत आहे,असे त्यांनी नमूद केले. झुमर आणि चहाच्या मळ्यांची संस्कृती यांच्याशी ज्या प्रकारे येथील लोकांचे विशेष नाते आहे, तशाच प्रकारचे आपलेही नाते आहे, असे त्यांनी सांगितले. इतक्या मोठ्या संख्येने आज झुमर नृत्यात सहभागी झालेले कलाकार एक विक्रम प्रस्थापित करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली 2023 मध्ये आपण आसामला दिलेल्या भेटीच्या वेळी बिहू नृत्यात 11,000 कलाकार सहभागी झाले होते याची आठवण करून देत पंतप्रधानांनी सांगितले की कधीही विसरता येणार नाहीत अशा त्या आठवणी होत्या आणि यावेळी देखील तशाच प्रकारचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण असेल, अशी आपल्याला अपेक्षा आहे. अतिशय मनोहारी सांस्कृतिक सादरीकरणाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आसाम सरकार आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. या आनंदोत्सवात चहाच्या मळ्यातील कामगार समुदाय आणि आदिवासी जनता सहभागी होत असल्याने आजचा दिवस आसामसाठी अतिशय अभिमानाचा दिवस असेल असे त्यांनी नमूद केले. या विशेष दिनाच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.