माजी मेघालय राज्यपाल एम.एम. जाकोब यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना तीव्र दु:ख
July 08th, 02:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयचे माजी राज्यपाल एम.एम. जाकोब यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.” मेघालयचे माजी राज्यपाल एम.एम. जाकोब यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे . जाकोब यांनी सांसद, मंत्री आणि राज्यपाल म्हणून उल्लेखनीय योगदान दिले असून, केरळच्या विकासासाठी त्यांनी व्यापक काम केले आहे . या दुःखाच्या काळात मी भावनिकरित्या एक शुभ चिंतक म्हणून त्यांच्या कुटुंबासह आहे. ” असे पंतप्रधान म्हणाले.