महाराष्ट्रातील मुंबई येथे अनेक विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 08th, 03:44 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी रामदास आठवले जी, के.आर. नायडू जी, मुरलीधर मोहोळ जी, महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, अन्य मंत्रीगण, जपानचे भारतातील राजदूत केइची ओनो आणि इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, मुंबईतल्या विविध विकास प्रकल्पांचे देखील केले उद्घाटन आणि लोकार्पण
October 08th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले तसेच मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. सर्व मान्यवरांचे स्वागत करत, मोदी यांनी उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.अलिकडेच पार पडलेल्या विजयादशमी आणि कोजागरी पौर्णिमेच्या उत्सवाचा उल्लेख करत त्यांनी आगामी दिवाळी सणासाठी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान 8-9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
October 07th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8-9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. नवी मुंबईत पंतप्रधानांचे आगमन होईल आणि नव्याने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दुपारी 3 च्या सुमाराला ते पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 3:30 च्या सुमारास पंतप्रधान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. तसेच मुंबईतल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.