Uttar Pradesh has now emerged as one of the states with the highest number of international airports in India: PM Modi in Jewar
March 28th, 12:15 pm
PM Modi inaugurated Phase 1 of Noida International Airport at Jewar in Uttar Pradesh and said that the occasion marks a new chapter in the Viksit UP, Viksit Bharat Abhiyan. He noted that the government has resolved to make India self-reliant in the MRO sector. Highlighting the government’s achievements in recent weeks, even as the world grapples with the conflict in West Asia, he called for collective effort and national unity.उत्तरप्रदेशात नोएडा इथे, सुमारे 11,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विकसित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
March 28th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशात जेवर इथे, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी या प्रगतीबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त करत, हा सोहळा, विकसित उत्तरप्रदेश आणि विकसित भारताच्या गाथेत एक नवा अध्याय लिहिणारा ठरला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतातील सर्वात मोठे राज्य आता, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्यांपैकी एक ठरले आहे, असेही त्यांनी नमूद केले. आज दुहेरी आनंदाचा प्रसंग आहे. पहिले कारण म्हणजे, आपणच या विमानतळाच्या कामाची पायाभरणी केली होती, आणि आज आपल्यालाच त्याचे उद्घाटनही करण्याची संधी मिळाली आहे. तर दुसरे आनंदाचे कारण या भव्य विमानतळाच्या नावाचा उत्तरप्रदेशशी जवळचा संबंध आहे. “या प्रदेशाचा खासदार म्हणून, हे राज्य माझ्या विशेष जवळचे राज्य आहे, आणि आता या शहराची ओळखच या भव्य विमानतळाशी जोडलेली असेल.” असे सांगत, पंतप्रधानांनी या क्षेत्रातील लोकांचे अभिनंदन केले.केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील बाराबंकी ते बहराइच (101.515 किमी) या दरम्यान, 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल'वर आधारित चौपदरी नियंत्रित प्रवेश राष्ट्रीय महामार्ग-927 च्या बांधकामासाठी 6969.04 कोटी रुपयांच्या खर्चाला दिली मंजुरी
March 18th, 04:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने, उत्तर प्रदेशातील बाराबंकी ते बहराइच (101.515 किमी) या दरम्यान चौपदरी नियंत्रित प्रवेश असलेल्या राष्ट्रीय महामार्ग-927 च्या बांधकामाला 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' (एचएएम) अंतर्गत, 6969.04 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे.पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या 5 जिल्ह्यांमधील दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे 192 किमीची भर पडणार
March 10th, 04:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 4,474 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली. हे प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:'आर्थिक विकास शाश्वत आणि बळकट करताना' या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांचे संबोधन
March 03rd, 11:30 am
गेल्या आठवड्यात, अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील पहिल्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते आणि तो यशस्वी झाला असे मला कळले आहे, आणि अर्थसंकल्पामधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक खूप चांगल्या सूचना दिल्या, सर्वांच्या सक्रिय सहभागीचे मी स्वागत करतो आणि आज या मालिकेतल्या दुसऱ्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. मला सांगण्यात आले आहे की, हजारोंच्या संख्येने, अनेक विषयांवर असंख्य लोक आपल्या सूचना देणार आहेत. विषय तज्ज्ञही यामध्ये सहभाग घेणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पावर चर्चा होणे, हा नक्कीच मोठा यशस्वी प्रयोग आहे. आपण सर्वजण वेळात वेळ काढून या वेबिनरमध्ये सहभागी झाला आहात. मी आफल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपले स्वागत करतो. या वेबिनारचे विषयसूत्र देशाच्या आर्थिक विकासाला सातत्यपूर्ण बळकटी देणे असा आहे. आज, देश आपल्या बळकट अर्थव्यवस्थेमुळे साऱ्या जगाचे आशास्थान झाला आहे, आज जेव्हा जागतिक पुरवठा साखळीची पुनर्रचना होते आहे, तेव्हा अर्थव्यवस्थेची वेगाने होणारी प्रगती विकसित भारताचा मोठा आधार आहे. आमची दिशा स्पष्ट आहे, आमचा संकल्प स्पष्ट आहे, अधिक निर्मिती, अधिक उत्पादन, अधिक संपर्क आणि आता गरज आहे ती अधिक निर्यातीची आणि आज तु्म्हा सर्वांमध्ये निश्चितच विचारमंथन होणार आहे, या विचार मंथनातून येणाऱ्या सूचना यामध्ये मोठी भूमिका बजावतील.आर्थिक विकासाची शाश्वतता आणि बळकटीकरण या विषयावरील वेबीनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
March 03rd, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्थसंकल्प वेबीनार मालिकेच्या दुसऱ्या भागात संबोधित करताना “शाश्वत आणि बळकट आर्थिक विकास” या संकल्पनेवर भर दिला. मागील आठवड्यातील प्रगतीचा आढावा घेताना पहिले वेबिनार अतिशय यशस्वी ठरल्याचे आणि त्यामध्ये अर्थसंकल्पीय तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत उत्तम सूचना देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सध्याचे वेबिनार हे देशाच्या आर्थिक विकासासाठी सलग बळ देण्याशी संबंधित आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.पश्चिम बंगालमधील सिंगूर येथील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 18th, 03:30 pm
काल मी मालदामध्ये होतो आणि आज इथे हुगळीमध्ये तुमच्याशी संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले आहे. विकसित भारतासाठी पूर्व भारताचा विकास हे उद्दीष्ट ठेवून केंद्र सरकार सातत्यान काम करत आहे. कालचा आणि आजचा कार्यक्रम हाच निर्धार बळकट करणारे आहेत. या दोन दिवसांत पश्चिम बंगालमधील करोडो रुपयांच्या प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. देशातली पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे काल पश्चिम बंगालमधून सुरू झाली. बंगालमध्ये जवळपास अर्धा डझन नवीन अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या आहेत आणि आज आणखी तीन अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या. यातील एका रेल्वेमुळे काशी वाराणसी या माझ्या मतदारसंघाची पश्चिम बंगालसोबतची संपर्कव्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. शिवाय, दिल्ली आणि तमिळनाडूमध्ये जाणाऱ्या अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील रेल्वे वाहतुकीसाठी हे दोन दिवस अभूतपूर्व असेच म्हणावे लागतील. गेल्या 100 वर्षांत 24 तासांत इतके काम कदाचित कधीच झाले नसेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे ₹830 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि पहिल्या शयनयान वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ
January 18th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे ₹830 कोटींहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. याप्रसंगी जनसभेला संबोधित करताना मोदी यांनी नमूद केले की, काल ते मालदामध्ये होते आणि आज त्यांना हुगळीतील लोकांमध्ये उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. त्यांनी अधोरेखित केले की विकसित भारतासाठी पूर्व भारताचा विकास आवश्यक आहे आणि या ध्येयाने केंद्र सरकार सातत्याने काम करत आहे. काल आणि आजचे कार्यक्रम या संकल्पाला बळ देतात, असे त्यांनी सांगितले. या काळात पश्चिम बंगालच्या विकासाशी संबंधित शेकडो कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 16th, 03:00 pm
आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर, आंध्र प्रदेशचे लोकप्रिय आणि कष्टाळू मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू, चंद्रशेखर पेम्मसानी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, राज्य सरकारमधील मंत्री नारा लोकेश, इतर सर्व मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पीव्हीएन माधव, सर्व खासदार, आमदार, आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो,आंध्र प्रदेशात कुर्नुल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13,430 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी,उद्घाटन आणि लोकार्पण
October 16th, 02:30 pm
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी अहोबिलमचे भगवान नरसिंह स्वामी आणि महानंदीच्या श्री महानंदीश्वर स्वामी यांना वंदन केले. यावेळी त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी मंत्रालयम् चे गुरु श्री राघवेंद्र स्वामी यांचे आशीर्वाद देखील घेतले.भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात 894 किलोमीटर्सची भर घालणाऱ्या आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड मधील 18 जिल्ह्यांमध्ये विस्तारलेल्या चार बहुपदरीकरण प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 07th, 03:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या अंदाजे 24,634 कोटी रुपये खर्चाच्या चार प्रकल्पांना मंजुरी दिली. हे प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधील भागलपूर-दुमका -रामपूरहाट एकेरी रेलमार्गाचे (177 किमी) दुहेरीकरण करण्याच्या एकूण 3169 कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 10th, 03:05 pm
बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधील भागलपूर-दुमका -रामपुरहाट एकेरी रेलमार्गाचे (177 किमी ) दुहेरीकरण करण्याच्या एकूण 3169 कोटी रूपये (अंदाजित) खर्चाच्या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजुरी दिली आहे.पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 22nd, 05:15 pm
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी शांतनु ठाकुर जी, रवनीत सिंह जी, सुकांता मुजुमदार जी, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते शुवेंदु अधिकारी जी, संसदेतील माझे सोबती शौमिक भट्टाचार्य जी, उपस्थित अन्य लोकप्रतिनिधी गण, बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 5,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
August 22nd, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 5,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, पश्चिम बंगालच्या विकासाला गती देण्याची संधी त्यांना पुन्हा एकदा मिळाली आहे. नोआपारा ते जय हिंद विमानतळ या कोलकाता मेट्रो प्रवासाचा अनुभव सामायिक करताना मोदी म्हणाले की, या प्रवासात त्यांनी अनेक सहकाऱ्यांशी संवाद साधला आणि कोलकात्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी सहा पदरी उन्नत कोना एक्सप्रेसवेची पायाभरणी देखील केली. या हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी त्यांनी कोलकात्याच्या जनतेचे आणि पश्चिम बंगालच्या सर्व नागरिकांचे हार्दिक अभिनंदन केले.केंद्रीय मंत्रिमंडळाची 4 बहुमार्गीकरण प्रकल्पांना मंजुरी; महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा आणि झारखंड या राज्यांमधील 13 जिल्ह्यांचा समावेश; भारतीय रेल्वेचे जाळेही सुमारे 574 किमीने विस्तारणार
July 31st, 03:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या 4 प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी सुमारे 11,169 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. हे प्रकल्प खाली नमूद केले आहेत: