नायजेरियाचे माजी राष्ट्रपती मुहम्मदू बुहारी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
July 14th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे माजी राष्ट्रपती मुहम्मदू बुहारी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बुहारी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात विविध प्रसंगी झालेल्या भेटी आणि संवादांची यावेळी त्यांनी आठवण काढली. बुहारी यांचा विवेक, प्रेमळपणा आणि भारत-नायजेरिया मैत्रीप्रती त्यांची अढळ बांधिलकी सदैव स्मरणात राहील, असे मोदी म्हणाले. 140 कोटी भारतीयांच्या वतीने आपण त्यांचे कुटुंब, सरकार आणि नायजेरियाच्या जनतेप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो.