एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.
December 26th, 10:16 am
मल्याळम चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक, एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एम. टी. वासुदेवन नायर यांच्या कार्याने मानवी भावनांचा सखोल शोध घेऊन अनेक पिढ्यांना आकार दिला आहे आणि त्यांचे कार्य यापुढेही अनेकांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.