Today, India is becoming the key growth engine of the global economy: PM Modi
December 06th, 08:14 pm
In his address at the Hindustan Times Leadership Summit, PM Modi highlighted India’s Quarter-2 GDP growth of over 8%, noting that today’s India is not only transforming itself but also transforming tomorrow. Criticising the use of the term “Hindu rate of growth,” he said India is now striving to shed its colonial mindset and reclaim pride across every sector. The PM appealed to all 140 crore Indians to work together to rid the country fully of the colonial mindset.Prime Minister Shri Narendra Modi addresses the Hindustan Times Leadership Summit 2025 in New Delhi
December 06th, 08:13 pm
In his address at the Hindustan Times Leadership Summit, PM Modi highlighted India’s Quarter-2 GDP growth of over 8%, noting that today’s India is not only transforming itself but also transforming tomorrow. Criticising the use of the term “Hindu rate of growth,” he said India is now striving to shed its colonial mindset and reclaim pride across every sector. The PM appealed to all 140 crore Indians to work together to rid the country fully of the colonial mindset.हैदराबादमधील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
November 26th, 10:10 am
“भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी जी, सफ्रान समूहाशी संबंधित सर्व मान्यवर, आणि उपस्थित बंधू-भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
November 26th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन केले. आजपासून भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे, सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत जागतिक एमआरओ अर्थात देखभाल, दुरुस्ती आणि संधारण केंद्र म्हणून उदयाला येईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे देखभाल, दुरुस्ती आणि संधारण सुविधा केंद्र युवकांसाठी उच्च तंत्रज्ञानाधारित हवाई वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपण 24 नोव्हेंबर रोजी सफ्रानच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला होता आणि त्यांच्याबरोबर याआधीही झालेल्या चर्चेत भारताबद्दलचा त्यांचा विश्वास आणि आशा दिसून आली होती, असे पंतप्रधान म्हणाले. सफ्रानची भारतातील गुंतवणूक देखील त्याच गतीने कायम राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांची सफ्रानच्या टीमचे नवीन सुविधेबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्यातदारांसाठी पत हमी योजनेला दिली मंजुरी
November 12th, 08:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज निर्यातदारांसाठी पत हमी योजना लागू करायला मंजुरी दिली. याअंतर्गत राष्ट्रीय पत हमी विश्वस्त कंपनीच्या माध्यमातून सदस्य वित्तपुरवठादार संस्थांना 100% पत हमी दिली जाईल. त्यामुळे या संस्था सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह पात्र निर्यातदारांना 20,000 कोटी रुपयांपर्यंत अतिरिक्त कर्ज सुविधा देऊ शकतील.केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताची निर्यात परिसंस्था मजबूत करण्यासाठी 25,060 कोटी रुपये खर्चासह निर्यात प्रोत्साहन मोहिमेला दिली मंजुरी
November 12th, 08:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्यात प्रोत्साहन मोहिमेला (ईपीएम) मंजुरी देण्यात आली. विशेषतः एमएसएमई, प्रथम निर्यात करणारे निर्यातदार आणि कामगार-केंद्रित क्षेत्रांसाठी भारताची निर्यात स्पर्धात्मकता बळकट करण्यासाठी 2025–26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रमुख मोहिमेची घोषणा करण्यात आली होती.उत्तराखंडच्या स्थापनच्या रौप्य महोत्सवानिमित्त निमत्त डेहराडून इथल्या समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा
November 09th, 01:00 pm
9 नोव्हेंबरचा हा दिवस एका दीर्घ तपस्येचे फळ आहे. आजचा दिवस आपण सर्वांसाठी अभिमानाची अनुभूती देणारा आहे. उत्तराखंडच्या देवतुल्य जनतेने अनेक वर्षांपासून जे स्वप्न पाहिले होते, ते अटलजींच्या सरकारच्या काळात, 25 वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते, आणि आता गेल्या 25 वर्षांच्या प्रवासानंतर, आज उत्तराखंड ज्या उंचीवर पोहचले आहे, ते पाहून त्या प्रत्येक व्यक्तीला आनंद होणे स्वाभाविक आहे, ज्यांनी या सुंदर राज्याच्या निर्मितीसाठी संघर्ष केला होता. ज्यांचे पर्वतांवर प्रेम आहे, ज्यांना उत्तराखंडची संस्कृती, इथले नैसर्गिक सौंदर्य, देवभूमीच्या लोकांशी जिव्हाळा आहे, त्यांचे मन आज प्रफुल्लित आहे, ते आनंदित आहेत.डेहराडून येथे उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
November 09th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडूनमध्ये उत्तराखंडच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान , पंतप्रधानांनी 8140 कोटी रुपये मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन केले. या समारोहाला संबोधित करताना, मोदी यांनी देवभूमी उत्तराखंडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांप्रती आदर, सन्मान आणि सेवाभाव व्यक्त केला.रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या भाषणाचा मजकूर
October 24th, 11:20 am
यंदाचा प्रकाशाचा उत्सव 'दिवाळी' तुमच्या सर्वांच्या जीवनात प्रकाशाची एक नवी तिरीप घेऊन आला आहे. सणासुदीच्या काळात कायमस्वरूपी नोकरीचे नियुक्तीपत्र मिळणे, म्हणजेच, उत्सवाचा उत्साह आणि यशाचा दुहेरी आनंद! हाच आनंद आज देशातील 51 हजारहून अधिक तरुण-तरुणींना मिळाला आहे. मला जाणवतंय की, तुम्हा सर्वांचे कुटुंबिय देखील किती आनंदले असतील. मी तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन करतो. जीवनाच्या या नवीन प्रारंभासाठी मी तुम्हाला अनेक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळ्याला केले संबोधित
October 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले. यावर्षीच्या दिव्यांच्या सणाने अर्थात दिवाळीने प्रत्येकाचे आयुष्य नव्याने उजळून टाकले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सण साजरे करत असताना कायमस्वरूपी नोकरीची नियुक्ती पत्रे हातात येणे म्हणजे सणांचा उत्साह आणि रोजगार मिळाल्याचे यश असा द्विगुणित आनंद होय. हा आनंद आज देशभरातील 51,000 युवकांपर्यंत पोहोचला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे सर्वांच्या कुटुंबियांना अमाप आनंद मिळाल्याचे सांगून त्यांनी सर्व उमेदवारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. त्यांच्या आयुष्यातील नवीन आरंभाबद्दल त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.भारत-युके सीईओ फोरममध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 09th, 04:41 pm
आज भारत-युके सीईओ फोरमच्या बैठकीत सहभागी होणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. सर्वप्रथम मी पंतप्रधान स्टार्मर यांच्या मौलिक विचारांबद्दल त्यांचे आभार मानतो.मुंबईत येथे आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 09th, 02:51 pm
माननीय पंतप्रधान कीर स्टार्मर, आरबीआयचे गव्हर्नर, फिनटेक विश्वातील नवप्रवर्तक, नेतेमंडळी, उद्योग जगतातील दिग्गज आणि गुंतवणूकदार, भगिनी आणि बंधूंनो! मुंबईत आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 कार्यक्रमाला संबोधित केले
October 09th, 02:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत पंतप्रधान मोदी यांनी उर्जावान शहर, उद्योगांचे शहर आणि अमर्याद शक्यतांचे शहर अशा शब्दांत मुंबईचे वर्णन केले. त्यांनी त्यांचे मित्र पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे खास स्वागत केले आणि ग्लोबल फिनटेक महोत्सवाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी वेळ काढल्याबद्दल विशेष उल्लेख केला.दिल्लीमध्ये यशोभूमी येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 04th, 10:45 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया जी, राज्यमंत्री चंद्र शेखर पेम्मासानी जी,विविध राज्यांचे प्रतिनिधी,परदेशातून आपले अतिथी,टेलीकॉम क्षेत्रातले मान्यवर,विविध महाविद्यालयांमधून आलेले माझे युवा मित्र,महिला आणि पुरुष वर्ग,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 62,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या युवा केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ करताना, कौशल दीक्षांत समारोह कार्यक्रमाला केले संबोधित
October 04th, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे कौशल्य दीक्षांत समारोहादरम्यान 62,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी देशातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिकणारे लाखो विद्यार्थी, तसेच बिहारमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आठवण करून दिली की काही वर्षांपूर्वी सरकारने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात दीक्षांत समारंभ आयोजित करण्याची नवी परंपरा सुरू केली होती. आजचा दिवस त्या परंपरेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.उत्तर प्रदेशात ग्रेटर नॉयडा येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 25th, 10:22 am
यूपी इंटरनॅशनल ट्रेड शोमध्ये सहभागी झालेले सर्व व्यापारी, गुंतवणूकदार, उद्योजक आणि तरुण मित्रांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. येथे 2200 पेक्षा अधिक प्रदर्शक आपल्या उत्पादनांचे आणि सेवांचे प्रदर्शन करत आहेत, याचा मला आनंद वाटत आहे. यंदाच्या ट्रेड शोचा भागीदार देश रशिया आहे. म्हणजेच, या ट्रेड शोच्या माध्यमातून आपण काळाच्या कसोटीवर पारखलेली एक भागीदारी आणखी बळकट करत आहोत. मुख्यमंत्री योगीजींना, सरकारमधील इतर सर्व सहकाऱ्यांना आणि हितधारकांना या कार्यक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाला केले संबोधित
September 25th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2025 याचे आज उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व व्यापारी, गुंतवणूकदार, उद्योजक आणि तरुण प्रतिनिधींचे स्वागत केले.या कार्यक्रमात 2,200 हून अधिक प्रदर्शक त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करत आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. रशिया हा या व्यापार प्रदर्शनातील भागीदार देश आहे, जो काळाच्या कसोटीवर उतरलेल्या भागीदारीच्या सबलीकरणावर भर देतो, असे मोदींनी यावेळी अधोरेखित केले.या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शासकीय अधिकारी आणि इतर भागधारकांचे अभिनंदन केले. हा दिवस पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी आला आहे,ज्यांनी राष्ट्राला अंत्योदय - म्हणजे तळागाळातील शेवटच्या व्यक्तीचा उत्कर्ष साधण्यासाठी मार्गदर्शन केले, असे पंतप्रधानांनी नमूद केले.अंत्योदय म्हणजे विकास हा गरिबातल्या गरीबापर्यंत पोहोचणे, सर्व प्रकारच्या भेदभावाचे उच्चाटन करणे, यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि भारत आता जगाला सर्व समावेशक विकासाचे हेच प्रारुप असल्याचे दाखवून देत आहे,असे ते पुढे म्हणाले.पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेले भाषण
September 21st, 06:09 pm
उद्यापासून शक्तीच्या उपासनेचा उत्सव अर्थात नवरात्र सुरू होत आहे. तुम्हा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आपला देश आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे आणि मोठे पाऊल टाकत आहे. उद्या, २२ सप्टेंबर रोजी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा सूर्य उगवताच पुढील टप्प्यातल्या जीएसटी सुधारणा लागू होतील. एका अर्थाने उद्यापासून देशात जीएसटी बचत महोत्सवाला सुरुवात होत आहे. या जीएसटी बचत महोत्सवामुळे तुमची बचत वाढेल आणि तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू अधिक सहजपणे खरेदी करू शकाल. आपल्या देशातील गरीब, मध्यमवर्गीय, नव-मध्यमवर्गीय, युवा, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी, उद्योजक या सर्वांना या बचत महोत्सवाचा मोठा फायदा होईल. याचा अर्थ असा की या उत्सवाच्या काळात प्रत्येकाला काहीतरी गोड खाण्यास मिळेल आणि देशातील प्रत्येक कुटुंबात आनंद वाढेल. पुढील टप्प्यातल्या या जीएसटी सुधारणा आणि बचत महोत्सवाबद्दल मी देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. या सुधारणांमुळे भारताच्या विकासगाथेला वेग लाभेल, , व्यवसाय सुलभ होईल, गुंतवणूक अधिक आकर्षक होईल आणि विकासाच्या शर्यतीत प्रत्येक राज्य समान भागीदार होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केले संबोधित
September 21st, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे देशाला संबोधित केले. शक्तीच्या उपासनेचे पर्व असलेल्या नवरात्रीच्या प्रारंभानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत ते म्हणाले की, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच देश आत्मनिर्भर भारत अभियानासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. 22 सप्टेंबर रोजी सूर्योदयाबरोबरच देशात नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणांची अंमलबजावणी होईल. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की एका प्रकारे संपूर्ण भारतात जीएसटी बचत उत्सवाला सुरुवात होत आहे. या उत्सवामुळे बचत वाढेल आणि लोकांना त्यांच्या पसंतीच्या वस्तू खरेदी करणे सुलभ होईल यावर त्यांनी भर दिला. या बचत महोत्सवाचे लाभ देशातील गरीब, मध्यमवर्गीय, नवमध्यमवर्गीय, युवक , शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी आणि उद्योजकांपर्यंत पोहोचतील असे मोदी यांनी नमूद केले. या उत्सवाच्या काळात प्रत्येक घरामध्ये आनंद आणि गोडवा वाढेल असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणा आणि जीएसटी बचत महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. या सुधारणा भारताच्या विकासगाथेला गती देतील, व्यवसाय सुलभ करतील, गुंतवणूक अधिक आकर्षक बनवतील आणि विकासाच्या शर्यतीत प्रत्येक राज्याला समान भागीदार बनवेल असे त्यांनी अधोरेखित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगर येथे ‘समुद्र से समृद्धी’ कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
September 20th, 11:00 am
आपल्या भावनगरने तर अगदी ‘धमाका‘च केला आहे, हे आत्ता लक्षात आले. आज इथे मला मंडपाबाहेर जनसागर - जणू माणसांचा समुद्र दिसतोय. इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी आले आहात, त्यासाठी आपल्या सर्वांचा खूप-खूप आभारी आहे.