वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेतील विशेष चर्चेमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 08th, 12:30 pm
मी आपले आणि सदनातील सर्व माननीय सदस्यांचे हार्दिक आभार मानतो, आपण या महत्त्वाच्या क्षणानिमित्त एक सामूहिक चर्चेचा निर्णय घेतला. ज्या मंत्राने, ज्या जयघोषाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा दिली होती, प्रेरणा दिली होती, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला होता, त्या वंदे मातरमचे पुण्यस्मरण करणे, हे या सदनातील आपल्या सर्वांचे खूप मोठे भाग्य आहे. आणि आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की वंदे मातरमच्या 150 वर्षांनिमित्त या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार ठरत आहोत. एक असा कालखंड जो आपल्या समोर इतिहासातल्या अगणित घटना समोर घेऊन येतो. ही चर्चा सदनाची वचनबद्धता तर प्रकट करेलच त्याचसोबत आगामी पिढ्यांसाठीही, प्रत्येक पिढीसाठी शिकवण ठरू शकेल, जर आपण सर्वांनी मिळून याचा सदुपयोग केला तर.वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
December 08th, 12:00 pm
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या अत्यंत विशेष प्रसंगी, सामुहिक चर्चेचा मार्ग निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी सदनातील सर्व सन्माननीय सदस्यांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला उर्जा आणि प्रेरणा देणारा वंदे मातरम हा मंत्र आणि हे आवाहन आपण स्मरतो आहोत ही सभागृहातील सर्वांसाठी अत्यंत विशेष बाब आहे.आपल्या देशाला वंदे मातरमची ऐतिहासिक अशी 150 वी वर्षपूर्ती पाहायला मिळते आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की हा कालावधी आपल्यासमोर इतिहासातील असंख्य घटना उभ्या करतो.या चर्चेद्वारे सदनाची कटिबद्धता दर्शवण्यासोबतच जर सगळ्यांनी या चर्चेचा चांगला उपयोग करून घेतला तर ही चर्चा भविष्यातील पिढ्यांसाठी शिक्षणाचा स्त्रोत म्हणून देखील काम करू शकते यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.राज्यसभेचे सभापती थिरू सी पी राधाकृष्णन् यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी केले भाषण
December 01st, 11:15 am
हिवाळी अधिवेशनाचा आरंभ होत आहे आणि आज सभागृहातील आम्हा सर्व माननीय सदस्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. तुमचे स्वागत करणे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली सभागृहाच्या माध्यमातून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यात तुमचे अमूल्य मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी एक खूप मोठी संधी आहे. मी सभागृहाच्या वतीने आणि माझ्या वतीने, तुमचे खूप खूप अभिनंदन करतो, तुमचे स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी तुम्हाला विश्वासही देतो की या सभागृहात बसलेले सर्व माननीय सदस्य, या वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा जपतील आणि तुमच्या प्रतिष्ठेची देखील नेहमीच काळजी घेतील, मर्यादा राखतील. हे मी तुम्हाला आश्वासन देतो.राज्यसभेचे सभापती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांच्या सत्कार समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 01st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे आज प्रथमच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवत असल्याबद्दल स्वागत केले. राज्यसभेच्या सर्व माननीय सदस्यांसाठी हा क्षण अभिमानाचा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सभापतींचे मनःपूर्वक स्वागत करताना मोदी म्हणाले, सभागृहाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने, मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. मी तुम्हाला हे देखील आश्वासन देतो की या वरिष्ठ सभागृहातील सर्व माननीय सदस्य नेहमीच या प्रतिष्ठित संस्थेचे पावित्र्य जपतील आणि तुमच्या प्रतिष्ठेचा मान राखण्याची नेहमीच काळजी घेतील. हे माझे तुम्हाला ठाम आश्वासन आहे.आयसीसी महिला विश्वचषक विजेत्या संघांशी पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मजकूर
November 06th, 10:15 am
माननीय पंतप्रधान महोदय, खूप खूप धन्यवाद. आम्हाला येथे येणे हा मोठा सन्मान आणि अभिमानाचा क्षण वाटतो. फक्त या मोहिमेबद्दल एक सांगू इच्छितो, या मुलींनी कमाल केली आहे, देशाच्या मुलींनी कमाल केली आहे. दोन वर्षांपासून मेहनत करत होत्या, सर, इतकी मेहनत की काय सांगू, प्रत्येक सराव सत्रामध्ये जोमाने खेळल्या, प्रत्येक सरावात तेवढ्याच ऊर्जेने मैदानात उतरल्या. इतकी मेहनत घेतली की आज त्या मेहनतीचं फळ मिळाले आहे.पंतप्रधानांनी आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत साधला संवाद
November 06th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत 7, लोक कल्याण मार्ग येथे आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत संवाद साधला. भारतीय संघाने रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात केली होती. पंतप्रधानांनी काल देव दिवाळी आणि गुरुपूरब असल्याने हा दिवस विशेष असल्याचे सांगून सर्व उपस्थितांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.