Odisha is emerging as a gateway to growth and prosperity in eastern India: PM Modi in Pahadpur
June 20th, 01:10 pm
The President, Smt. Droupadi Murmu and the Prime Minister, Shri Narendra Modi visited Pahadpur village in Mayurbhanj district today. The President and the Prime Minister offered prayers at the sacred groves Santhali Jahera and Ho Jahera, Skill Centre and Pahadpur School. The President and Prime Minister participated in a programme at Rairangpur in Mayurbhanj district, marking the completion of two years of the Government of Odisha. The theme of the programme is “Vikas ra Dhara, Odisha Sara”. Shri Modi inaugurated and laid the foundation stone of various development projects worth over ₹47,600 crore.ओदिशा राज्य सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
June 20th, 01:00 pm
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या पवित्र उपवनांत, तसेच हो जाहेरा कौशल्य केंद्रात आणि पहाडपूर शाळेत जाऊन प्रार्थना केली. यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे आयोजित एका कार्यक्रमात भाग घेतला. ओदिशा राज्य सरकारचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विकास रा धारा, ओदिशा सारा अशी या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
May 25th, 06:02 pm
ओदिशाचे मुख्यमंत्री, मोहन चरण माझी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.गुजरातमध्ये देडियापाडा येथे जनजातीय गौरव दिन कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
November 15th, 03:15 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगदीश विश्वकर्मा जी, गुजरात सरकारमधले मंत्री नरेश भाई पटेल, जयराम भाई गामीत जी, संसदेतले माझे जुने मित्र मनसुख भाई वसावा जी, भगवान बिरसा मुंडा यांचा परिवारातले व्यासपीठावर उपस्थित सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे आदिवासी बंधुभगिनी, अन्य सर्व आदरणीय व्यक्ती आणि आत्ता देशात सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांमधून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याशी जोडले गेलेले अनेक लोक, राज्याराज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री अशा सर्वांना जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला केले संबोधित
November 15th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. माँ नर्मदेची पवित्र भूमी आज आणखी एका ऐतिहासिक प्रसंगाची साक्षीदार होत आहे असे सांगून, मोदी यांनी भारताची एकता आणि विविधता साजरी करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची 150 वी जयंती याच ठिकाणी साजरी करण्यात आली होती, भारत पर्वाची सुरुवात झाली होती याची आठवण करून दिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या भव्य सोहळ्यासह भारत पर्वचा समारोप होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले .या शुभ प्रसंगी त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि संपूर्ण आदिवासी पट्ट्यात स्वातंत्र्याची भावना जागृत करणाऱ्या गोविंद गुरुंचे आशीर्वाद देखील या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. व्यासपीठावरून त्यांनी गोविंद गुरुंना आदरांजली वाहिली. थोड्या वेळापूर्वी देवमोगरा मातेच्या मंदिराला भेट देण्याचा आणि पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचे सौभाग्य लाभले असे ते म्हणाले.ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
July 12th, 02:31 pm
ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.ओदिशाच्या राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
June 20th, 04:16 pm
ओदिशाचे राज्यपाल हरी बाबूजी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन चरण माझीजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जुएल ओरांवजी, धर्मेंद्र प्रधानजी, अश्विनी वैष्णवजी, ओदिशाचे उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंह देवजी, प्रवाती परिदाजी, राज्य सरकारचे इतर मंत्रीगण, खासदार आणि आमदारगण, आणि ओडिशातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो!ओडिशा सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
June 20th, 04:15 pm
ओडिशा सरकारच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त आज भुवनेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले. ओडिशाच्या सर्वांगीण विकासाच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधानांनी पिण्याचे पाणी, सिंचन, कृषी पायाभूत सुविधा, आरोग्य पायाभूत सुविधा, ग्रामीण रस्ते आणि पूल, राष्ट्रीय महामार्गांचे काही भाग आणि नवीन रेल्वे मार्ग यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या 18,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
May 24th, 08:45 pm
ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.ओडिशा मधील भुवनेश्वर येथे आयोजित 18 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
January 09th, 10:15 am
ओडिशाचे राज्यपाल डॉक्टर हरिबाबू जी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन चरण माँझी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एस. जयशंकरजी, ज्युएल ओरांवजी, धर्मेंद्र प्रधानजी, अश्विनी वैष्णवजी, शोभा करंदलाजेजी, कीर्ति वर्धन सिंहजी, पबित्रा मार्गेरिटाजी, ओडिशाचे उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंहदेव, प्रवती परिदाजी तसंच अन्य मंत्रीगण, खासदार, आमदार, जगभरातून इथे उपस्थित भारतमातेचे सर्व सुपुत्र !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ओदिशामध्ये आयोजित 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन
January 09th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशातील भुवनेश्वर इथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनासाठी आलेल्या प्रतिनिधींचे तसेच जगभरात विविध देशांमध्ये वसलेल्या भारतीय समुदायाच्या (Indian diaspora) नागरिकांचे स्वागत केले. या अधिवेशनाचे उद्घाटन गीत या पुढे, विविध वसेलेल्या भारतीय समुदायाच्या, जगभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्येही वाजवले जाईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. ग्रॅमी पुरस्कार विजेते कलाकार रिकी केज आणि त्यांच्या पथकाने या गाण्याच्या माध्यमातून जगभरात वसलेलेल्या भारतीय समुदाच्या संवेदना आणि भावना संयतरित्या टिपत त्याचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल अभिनंदनही केले.ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
December 23rd, 05:50 pm
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवीन ओदिशा सरकारचा शपथविधी संपन्न
June 12th, 09:46 pm
ओदिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहन चरण माझी यांचे अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांनी कनक वर्धन सिंह देव आणि प्रवती परिदा यांनाही शुभेच्छा दिल्या.भाजपा: बलशाली, स्थिर, सर्वसमावेशक आणि समृद्ध भारतासाठी
May 14th, 04:30 pm
भाजपा: बलशाली, स्थिर, सर्वसमावेशक आणि समृद्ध भारतासाठी