राष्ट्रनिर्माणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमूल्य योगदान अधोरेखित करत, परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरणादायी भाषण पंतप्रधानांकडून सामाईक
October 02nd, 01:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रसेवेला समर्पित शंभर वर्षांच्या कार्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)कौतुक केले. परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रेरणादायी भाषणाचा संदर्भ देताना, पंतप्रधानांनी संघाची राष्ट्र उभारणीतील महत्त्वाची भूमिका आणि भारतीय संस्कृतीविषयक मूल्य वृद्धिंगत करण्याप्रति असलेली अढळ वचनबद्धता अधोरेखित केली.An RSS shakha is a ground of inspiration, where the journey from 'me' to 'we' begins: PM Modi
October 01st, 10:45 am
In his address at the centenary celebrations of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), PM Modi extended his best wishes to the countless swayamsevaks dedicated to the resolve of national service. He announced that, to commemorate the occasion, the GoI has released a special postage stamp and a coin. Highlighting the RSS’ five transformative resolutions, the PM remarked that in times of calamity, swayamsevaks are among the first responders.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित केले
October 01st, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी सर्व नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या, आणि आज महानवमी आणि देवी सिद्धिदात्रीचा दिवस असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, उद्या विजयादशमीचा भव्य उत्सव आहे. हा दिवस, अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि अधःकारावर प्रकाशाचा विजय, हे भारतीय संस्कृतीचे कालातीत सत्य अधोरेखित करतो.मोहन भागवत जी नेहमीच 'एक भारत श्रेष्ठ भारत'चे खंबीर पुरस्कर्ते राहिले आहेत: पंतप्रधान मोदी
September 11th, 08:00 am
पंतप्रधान मोदींनी रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गौरव करताना, स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण आणि 9/11चा हल्ला अशा 11 सप्टेंबर रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासात मोहन भागवत यांचा कार्यकाळ हा सर्वात परिवर्तनाचा टप्पा म्हणून स्मरणात राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 'पंच परिवर्तन' च्या व्हिजनद्वारे मोहन जी भारतीयांना एक मजबूत, समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी सतत प्रेरणा देत असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले आहे.