
भारताचा मुष्टीयोद्धा मोहम्मद हुसेमुद्दिन याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 07th, 08:28 am
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत 57 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय मुष्टियोद्धा मोहम्मद हुसेमुद्दिनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.