PM Modi and President of France jointly visit ITER facility

February 12th, 05:32 pm

PM Modi and President Emmanuel Macron visited the ITER facility in Cadarache, the first such visit by any Head of State or Government. They praised ITER’s progress in fusion energy and India’s key contributions through scientists and industries like L&T, Inox India, and TCS, highlighting India's commitment to advancing global clean energy research.

PM Modi and President of France jointly inaugurate the Consulate General of India in Marseille

February 12th, 05:29 pm

PM Modi and President Emmanuel Macron inaugurated the Consulate General of India in Marseille. The new Consulate will boost economic, cultural, and people-to-people connections across four French regions. PM Modi deeply appreciated President Macron’s special gesture, as both leaders received a warm welcome from the Indian diaspora.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मार्सिले येथील माझारग्युस युद्ध समाधी स्थळाला भेट दिली

February 12th, 04:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज सकाळी मार्सिले येथील माझारग्युस युद्ध समाधी स्थळाला भेट दिली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. दोन्ही नेत्यांनी पुष्पांजली अर्पण करून शहीद वीरांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ आदरांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा

February 12th, 03:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या विमानातून पॅरिसहून मार्सिलेला एकत्र प्रवास केला यातून दोन्ही नेत्यांमधील मित्रत्वाच्या बंधाची प्रचीती येते.त्यांनी द्विपक्षीय संबंधांतील सर्व पैलूंवर आणि प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर मार्सिले येथे आगमन झाल्यावर प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली. गेल्या 25 वर्षांत बहुआयामी संबंधात हळूहळू विकसित झालेल्या भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीबद्दल दोन्ही नेत्यांनी त्यांच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरूच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीदरम्यान जारी केलेले भारत - फ्रान्स संयुक्त निवेदन

February 12th, 03:22 pm

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10-12 फेब्रुवारी 2025 या काळात फ्रान्सला भेट दिली. भारत आणि फ्रान्स यांनी 10 आणि 11 फेब्रुवारी 2025 ला झालेल्या कृत्रिम बुद्धीमत्ता कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्ष पद भूषवले.ब्लेचली पार्क (नोव्हेंबर 2023 ) आणि सेउल (मे 2024) शिखर परिषदांदरम्यान ठरवल्मया गेलेल्या महत्वाच्या मुद्यांबाबत पुढील पाऊलांसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी देशांचे आणि प्रशासनाचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख,लघु आणि मोठे उद्योग,शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी,बिगर सरकारी संस्था,कलाकार आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. जागतिक एआय क्षेत्र सार्वजनिक हितासाठी सामाजिक,आर्थिक आणि पर्यावरणविषयक फलनिष्पत्ती प्रदान करेल याची सुनिश्चिती करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याप्रती त्यांनी आपली कटिबद्धता अधोरेखित केली. एआय कृती शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे अभिनंदन केले. पुढच्या एआय कृती शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार असल्याबद्दल फ्रान्सने भारताचे स्वागत केले.

पंतप्रधानांचा फ्रान्स दौरा: फलनिष्पत्ती सूची

February 12th, 03:20 pm

कृत्रिम बुद्धीमत्तेवरील (एआय) भारत-फ्रान्स जाहीरनामा

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत उल्लेखनीय प्रगती करत असून, सार्वजनिक हितासाठी त्याचा उपयोग करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

February 12th, 02:02 pm

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात भारत उल्लेखनीय प्रगती करत असून, सार्वजनिक हितासाठी त्याचा उपयोग करत आहे, यावर भर देत, जगाने भारतात येऊन गुंतवणूक करावी आणि आमच्या युवा शक्तीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केले आहे.

पॅरीस इथे झालेल्या भारत -फ्रान्स मुख्य कार्यकारी अधिकारी मंच येथील पंतप्रधानांचे भाषण

February 12th, 12:45 am

राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ,भारत आणि फ्रान्समधले इथं उपस्थित असलेले उद्योजक सर्वांना माझा नमस्कार, बोजों!

पंतप्रधानांनी 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला केले संबोधित

February 12th, 12:25 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज पॅरिसमध्ये 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला संयुक्तपणे संबोधित केले. संरक्षण, एरोस्पेस, महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, जीवन-विज्ञान, निरामय आरोग्य आणि जीवनशैली, तसेच अन्न आणि आदरातिथ्य यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून दोन्ही देशांमधील कंपन्यांच्या विविध गटातील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या मंचावर एकत्र आले होते. .

पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींची अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स यांच्याशी चर्चा

February 12th, 12:19 am

पंतप्रधान मोदींची पॅरिस येथे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस्टोनिया प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

February 11th, 06:19 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिसमधील एआय ॲक्शन समिटच्या पार्श्वभूमीवर एस्टोनिया प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती अलार कारिस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.

पॅरिस येथे एआय-कृती शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समारोपाचे भाषण

February 11th, 05:35 pm

आजच्या चर्चेतून एक गोष्ट समोर आली आहे - सर्व हितधारकांमध्ये दृष्टिकोन आणि उद्देशांमध्ये एकवाक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस येथे एआय-कृती शिखर परिषदेत केलेले उद्घाटनपर भाषण

February 11th, 03:15 pm

जर तुम्ही तुमचा मेडिकल रिपोर्ट एआय ऍपवर अपलोड केला तर तो तुम्हाला साध्या भाषेत कोणत्याही अडचणीविना तुमच्या आरोग्याची माहिती समजावून सांगू शकतो. पण याच ऍपला जर तुम्ही एका अशा व्यक्तीचे चित्र काढायला सांगितले जी व्यक्ती तिच्या डाव्या हाताने लिहीत आहे तर बहुधा हे ऍप उजव्या हाताने लिहीणाऱ्या माणसाचे चित्र काढेल.याचे कारण म्हणजे ते पूर्णपणे याच ट्रेनिंग डेटावर आधारित आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले पॅरिसमधील एआय-कृती शिखर परिषदेचे सह अध्यक्षपद

February 11th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ यांच्यासह पॅरिसमध्ये एआय कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवले. एक आठवडाभर चालणाऱ्या या शिखर परिषदेची 6-7 फेब्रुवारी या विज्ञान दिनी सुरुवात झाली. त्यानंतर 8-9 फेब्रुवारीला सांस्कृतिक सप्ताहांचे आयोजन झाले. जागतिक नेते, धोरणकर्ते आणि उद्योग धुरीण यांच्या उपस्थितीत एका उच्च स्तरीय कार्यक्रमात तिचा समारोप झाला.

पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये पॅरिस येथे दाखल

February 10th, 10:30 pm

काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल झाले. त्यांचे आगमन होताच त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. या भेटीत पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करतील, एआय ॲक्शन समिट आणि इतर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.

पॅरिसमधील मुख्य कार्यकारी अधिकारी गटासमोर पंतप्रधानांचे भाषण

July 15th, 07:03 am

द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी तसेच भारत व फ्रान्समधील आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी या उद्योग नेत्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. नवीकरणीय ऊर्जा, स्टार्टअप्स, फार्मा, आयटी, डिजिटल पेमेंट, सोबतच पायाभूत सुविधांमध्ये भारताची प्रगती आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर यावेळी त्यांनी प्रकाश टाकला.

India & France have long-standing people-to-people contacts: PM Modi during press meet with President Macron

July 15th, 01:47 am

Prime Minister Narendra Modi at press meet with President Macron of France.

पंतप्रधान आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

July 15th, 01:42 am

उभय नेत्यांनी संरक्षण व सुरक्षा, नागरी आण्विक, विज्ञान - तंत्रज्ञान, ऊर्जा, व्यापार व गुंतवणूक, अंतराळ, हवामान आणि लोकांचे परस्परांशी थेट संबंध यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विस्तृत क्षेत्रांवर तपशीलवार चर्चा केली.

India-France Indo-Pacific Roadmap

July 14th, 11:10 pm

India and France are strategically located resident powers and key partners with vital stakes in the Indo Pacific region. Our two countries believe in a free, open, inclusive, secure and peaceful Indo Pacific region. Our cooperation seeks to secure our own economic and security interests; ensure equal and free access to global commons; build partnerships of prosperity and sustainability in the region with respect for sovereignty and territorial integrity.

Joint Commitment to Eliminate Single Use Plastic Products Pollution

July 14th, 11:00 pm

Single-use plastic products are defined by the UN Environment Programme (UNEP) as an umbrella term for different types of products that are typically used once before being thrown away or recycled” which include food packaging, bottles, straws and among others. This presents the commitment to eliminate single use plastic products pollution, including ban on single use plastic products which have low utility and high littering potential by France and India.