पंतप्रधानांनी यूकेचे सन्माननीय राजे चार्ल्स तिसरे यांची घेतली भेट

July 24th, 11:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ब्रिटन भेटीमध्‍ये यूकेचे सन्माननीय राजे चार्ल्स तिसरे यांची, त्यांच्या उन्हाळी निवासस्थान- सँडरिंगहॅम इस्टेट इथे भेट घेतली. पंतप्रधानांनी राजांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याबद्दल आणि त्यांचे शाही कामकाज पुन्हा सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधान आणि राजांनी आरोग्य आणि शाश्वत जीवनशैलीशी संबंधित बाबींवर चर्चा केली, ज्यामध्‍ये आयुर्वेद आणि योगसाधनेचा समावेश होता, तसेच त्यांचे फायदे जगभरातील लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील, यावरही विचारमंथन झाले.

भारत आणि युकेच्या पंतप्रधानांचा भारत तसेच युकेच्या उद्योगपतींशी संवाद

July 24th, 07:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांनी आज भारत आणि युकेच्या आघाडीच्या उद्योगपतीं ची भेट घेतली. दोन्ही देशांनी ऐतिहासिक अशा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार करारावर (CETA) स्वाक्षरी केल्यानंतर ही भेट झाली. आरोग्य, औषधनिर्माण, मौल्यवान रत्ने व दागिने, वाहन, उर्जा, उत्पादन, दूरसंवाद, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टीक्स, वस्त्रोद्योग आणि वित्तीय सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील प्रमुख उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या क्षेत्रांचे दोन्ही देशामधील रोजगार निर्मिती आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासातील योगदान उल्लेखनीय आहे.

भारत – ब्रिटन व्हिजन 2035

July 24th, 07:12 pm

भारत आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांनी 24 जुलै 2025 रोजी लंडन इथे झालेल्या बैठकीदरम्यान नव्या ‘भारत-ब्रिटन व्हिजन 2035’ ला मान्यता दिली. नवी उर्जा लाभलेल्या भागीदारीच्या संपूर्ण संधी प्राप्त करण्याच्या सामायिक कटिबद्धतेची यातून पुष्टी होते. झपाट्याने बदलणाऱ्या जागतिक स्थितीच्या काळात परस्पर विकास, समृद्धी त्याचबरोबर समृद्ध, सुरक्षित आणि शाश्वत जगताला आकार देण्यासाठी एकत्र काम करण्याचा दोन्ही देशांचा निर्धार या महत्वाकांक्षी आणि भविष्यवेधी करारातून प्रतीत होतो.

युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन

July 24th, 04:20 pm

सर्वप्रथम, मी पंतप्रधान स्टार्मर यांचे त्यांच्या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल मनापासून आभार मानू इच्छितो. आजचा दिवस दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये ऐतिहासिक आहे. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आज दोन्ही देशांमध्ये व्यापक आर्थिक आणि व्यापार करार झाला आहे याचा मला आनंद आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन

July 24th, 04:00 pm

आपण मनापासून केलेल्या स्वागतासाठी आणि भव्य सत्कारासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे. आज आपण चेकर्समध्ये इतिहास घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहोत. भारत आणि ग्रेट ब्रिटन मिळून नव्या अध्यायाची सुरुवात करीत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांची घेतली भेट

July 24th, 03:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 आणि 24 जुलै 2025 या कालावधीत युनायटेड किंग्डमच्या आपल्या अधिकृत भेटीदरम्यान, आज युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची भेट घेतली. बकिंगहॅमशायरमधील चेकर्स येथील युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर पंतप्रधान स्टार्मर यांनी मोदी यांचे हार्दिक स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली तसेच शिष्टमंडळ स्तरावरील चर्चाही झाली.

PM Modi arrives in London, United Kingdom

July 24th, 12:15 pm

Prime Minister Narendra Modi arrived in United Kingdom a short while ago. In United Kingdom, PM Modi will hold discussions with UK PM Starmer on India-UK bilateral relations and will also review the progress of the Comprehensive Strategic Partnership.

युनायटेड किंगडम आणि मालदीव दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे प्रस्थान निवेदन

July 23rd, 01:05 pm

भारत आणि युके दरम्यान व्यापक धोरणात्मक भागीदारी असून, अलिकडच्या वर्षांत यामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. आमचे सहकार्य व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण, शिक्षण, संशोधन, शाश्वतता, आरोग्य आणि परस्परांच्या जनतेमधील संबंध, यासह विविध क्षेत्रांमध्ये विस्तारले आहेत. पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्या बरोबरच्या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमध्ये समृद्धी, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी परस्परांबरोबरची आर्थिक भागीदारी आणखी वाढवण्याची संधी आम्हाला मिळेल. या दौऱ्या दरम्यान, किंग चार्ल्स III (तृतीय) यांची भेट घेण्यासाठी देखील उत्सुक आहे.

ग्लासगो येथे कॉप-26 शिखर परिषदेमध्ये ‘स्वच्छ तंत्रज्ञान नवोन्मेष आणि वापराला गती’ या विषयावर आयोजित सत्रात पंतप्रधानांचे भाषण

November 02nd, 07:45 pm

आज ‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ चा प्रारंभ करताना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. ‘ वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ या माझ्या मनात अनेक वर्षांपासून असलेल्या संकल्पनेला आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि यूकेच्या ग्रीन ग्रीड उपक्रमामुळे एक ठोस रुप मिळाले आहे. महामहिम, औद्योगिक क्रांतीला जीवाश्म इंधनांमुळे उर्जा मिळाली होती. जीवाश्म इंधनांच्या वापरामुळे एकीकडे अनेक देश समृद्ध झाले खरे पण आपली पृथ्वी, आपल्या पर्यावरणाने समृद्धी गमावली आहे. जीवाश्म इंधनाच्या चढाओढीमुळे भौगोलिक- राजकीय तणाव देखील निर्माण झाले. आज तंत्रज्ञानाने आपल्याला एक चांगला पर्याय दिला आहे.

ग्लासगो येथे कॉप 26 शिखर परिषदेत ‘द्वीप राष्ट्रांसाठी प्रतिरोधक पायाभूत सुविधा’ या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

November 02nd, 02:01 pm

'द्वीप राष्ट्रांसाठी प्रतिरोधक पायाभूत सुविधा’' - आयआरआयएस चा प्रारंभ एक नवी आशा जागवत आहे, नवा आत्मविश्वास देत आहे. सर्वात असुरक्षित देशांसाठी काहीतरी केल्याचे समाधान मिळत आहे.

PM Modi launches IRIS- Infrastructure for Resilient Island States at COP26 Summit in Glasgow's

November 02nd, 02:00 pm

Prime Minister Narendra Modi launched the Infrastructure for the Resilient Island States (IRIS) initiative for developing infrastructure of small island nations. Speaking at the launch of IRIS, PM Modi said, The initiative gives new hope, new confidence and satisfaction of doing something for most vulnerable countries.

सोशल मीडिया कॉर्नर 19 एप्रिल 2018

April 19th, 07:44 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

लंडनमध्ये ‘‘भारत की बात, सबके साथ’’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसून जोशी यांच्याशी साधलेला संवाद

April 19th, 05:15 am

प्रसून जोशी – मोदीजी, आपले अनेक कार्यक्रम आहेत आणि त्यामध्ये आपण खूपच व्यस्त आहात, हे आम्हां सगळ्यांनाच माहीत आहे. आणि असे असतानाही आम्ही आपला थोडा वेळ ‘चोरून’ घेतला आहे. म्हणून सर्वात प्रथम, आपण वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार मानतो. काही दिवसांपूर्वीच मी भारताविषयी लिहिलं होतं.

लंडनमध्ये झालेल्या “भारत की बात, सबके साथ” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातून सहभागी झालेल्या भारतीयांशी साधलेल्या संवादातील काही अंश

April 18th, 09:49 pm

इंग्लंडमधील लंडन येथे झालेल्या “भारत की बात, सबके साथ” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातल्या सहभागी भारतीयांशी संवाद साधला .

सोशल मीडिया कॉर्नर 18 एप्रिल 2018

April 18th, 07:43 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान इंग्लंड-भारत संयुक्त निवेदन

April 18th, 07:02 pm



PM Modi pays floral tributes to Bhagwan Basaveshwara in London

April 18th, 04:02 pm

Prime Minister Modi today paid floral tributes to Bhagwan Basaveshwara in London.

Prime Minister Modi meets the Prince of Wales

April 18th, 03:54 pm

Prime Minister Narendra Modi today met the Prince of Wales. The leaders visited an exhibition at the Science Museum in London themed “5000 Years of Science and Innovation- Illuminating India”.

India-UK ties are diverse and extensive, says PM Modi

April 18th, 02:36 pm

Prime Minister Narendra Modi held productive talks with UK Prime Minister Theresa May. The leaders exchanged views on further enhancing India-UK ties in several sectors.

Prime Minister Modi calls on Her Majesty the Queen

April 18th, 10:50 am

Prime Minister Narendra Modi called on Her Majesty the Queen.