जी-20 परिषदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन: सत्र 3
November 23rd, 04:05 pm
तंत्रज्ञान जसे पुढे जात आहे, तसे संधी आणि संसाधने काही मोजक्या हातांत केंद्रित होत आहेत. जगात महत्वपूर्ण तंत्रज्ञानावरुन संघर्ष वाढत आहे. हे मानवतेसाठी चिंतेचे कारण तर आहेच, पण नवोन्मेषाच्या मार्गातही अडथळा आहे. यावर उपाय शोधण्यासाठी आपली विचारसरणीत मूलभूत बदल करावे लागतील."सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य" या विषयावरील जी20 सत्रात पंतप्रधानांचे संबोधन
November 23rd, 04:02 pm
पंतप्रधानांनी आज सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य - महत्त्वपूर्ण खनिजे; सन्मानजनक रोजगार; कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील जी20 शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केले. महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे प्रसार केला जातो, त्यामध्ये मूलभूत बदल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांनी नमूद केले की, असे तंत्रज्ञान 'वित्त-केंद्रित' ऐवजी 'मानव-केंद्रित', 'राष्ट्रीय' ऐवजी 'जागतिक' आणि 'बंदिस्त प्रारुपां' ऐवजी 'मुक्त स्त्रोत' प्रणालीवर आधारित असले पाहिजे. हा दृष्टिकोन भारताच्या तंत्रज्ञान परिसंस्थेत समाविष्ट केला गेला आहे आणि त्याचे महत्त्वपूर्ण फायदे झाले आहेत, मग ते अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा डिजिटल व्यवहार असो, जिथे भारत जागतिक नेता आहे, असे त्यांनी सांगितले.जोहान्सबर्गमध्ये जी 20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांशी भेट
November 23rd, 02:18 pm
भारत आणि दक्षिण आफ्रिका संबंधांचा आधार असलेल्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा देत, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि व्यापार व गुंतवणूक, अन्न सुरक्षा, कौशल्य विकास, खाणकाम, युवा आदानप्रदान आणि लोकांमधील परस्पर संबंध यांसारख्या सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी एआय, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या संभाव्य मार्गांवर चर्चा केली. दक्षिण आफ्रिकेत भारतीय कंपन्यांच्या वाढत्या उपस्थितीचे नेत्यांनी स्वागत केले, विशेषतः पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, नवनिर्मिती, खाणकाम आणि स्टार्टअप क्षेत्रात परस्पर गुंतवणुकीला चालना देण्याचे मान्य केले. दक्षिण आफ्रिकेतून भारतात चित्ते आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी अध्यक्ष रामाफोसा यांचे आभार मानले आणि त्यांना भारताच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले.आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे निवेदन
November 23rd, 12:45 pm
जोहानस-बर्ग” सारख्या जिवंत आणि सुंदर शहरात आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत सहभागी होणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या बैठकीसाठी मी आयबीएसए चे अध्यक्ष राष्ट्रपति लुला यांचे मनापासून आभार मानतो. आणि राष्ट्रपति रामाफोसा यांना आदरातिथ्याबद्दल धन्यवाद देतो.जोहान्सबर्ग येथे आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
November 23rd, 12:30 pm
ही बैठक अत्यंत योग्य वेळी होत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की ही बैठक आफ्रिकेच्या भूमीवर झालेल्या पहिल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने झाली असून ग्लोबल साउथ देशांच्या सलग चार जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा समारोप करते. या चारपैकी शेवटची तीन अध्यक्षपदे भारत - ब्राझील - दक्षिण आफ्रिका संवाद मंच (आयबीएसए) सदस्य राष्ट्रांकडे होती. या दरम्यान मानव-केंद्रित विकास, बहुपक्षीय सुधारणा आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन: सत्र 2
November 22nd, 09:57 pm
नैसर्गिक आपत्ती या मानवतेसाठी खूप मोठे आव्हान बनल्या आहेत. या वर्षीही नैसर्गिक आपत्तींमुळे जगातील लोकसंख्येच्या एका मोठ्या भागावर परिणाम झाला आहे. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी जागतिक सहकार्य अधिक बळकट करण्याची गरज यावरून स्पष्ट होते.जी 20 शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन – सत्र 1
November 22nd, 09:36 pm
सर्वप्रथम जी 20 शिखर परिषदेच्या दिमाखदार आयोजनासाठी आणि यशस्वी अध्यक्षतेसाठी राष्ट्रपती रामाफोसा यांचे अभिनंदन!जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 शिखर परिषदेत पंतप्रधान झाले सहभागी
November 22nd, 09:35 pm
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. जी20 शिखर परिषदांमधील पंतप्रधानांचा हा बारावा सहभाग होता. पंतप्रधानांनी शिखर संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या दोन्ही सत्रांना संबोधित केले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांचे अतिथ्य आणि शिखर संमेलनाचे यशस्वी आयोजन, यासाठी आभार मानले.Joint statement by the Government of India, the Government of Australia and the Government of Canada
November 22nd, 09:21 pm
India, Australia, and Canada have agreed to enter into a new trilateral partnership: the Australia-Canada-India Technology and Innovation (ACITI) Partnership. The three sides agreed to strengthen their ambition in cooperation on critical and emerging technologies. The Partnership will also examine the development and mass adoption of artificial intelligence to improve citizens' lives.जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट
November 21st, 10:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांची आज दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. 2020 मध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत संबंध वाढल्यानंतर गेल्या पाच वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सहकार्य वाढत असल्याबद्दल तसेच सहकार्यात येणाऱ्या विविधतेबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. भारतातील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी भारतासोबत एकजुटता व्यक्त केली. दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईला बळकटी देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी वचनबद्धता व्यक्त केली.PM Modi arrives in Johannesburg, South Africa to participate in G20 Summit
November 21st, 06:25 pm
PM Modi arrived in Johannesburg, South Africa, a short while ago. The PM will attend the 20th G20 Leaders’ Summit. On the margins of the Summit, he will also hold bilateral meetings with world leaders and will also participate in the India-Brazil-South Africa (IBSA) Leaders’ Meeting.पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार
November 19th, 10:42 pm
पंतप्रधान मोदी 21 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या 20 व्या जी 20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. शिखर परिषदेच्या सत्रांमध्ये, पंतप्रधान जी20 अजेंडातील प्रमुख मुद्द्यांवर भारताची भूमिका मांडतील. शिखर परिषदेच्या पार्श्र्वभूमीवर, ते जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्यासोबतच दक्षिण आफ्रिकेने आयोजित केलेल्या भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका (IBSA) नेत्यांच्या शिखर परिषदेतही सहभागी होतील.ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवादामध्ये पंतप्रधानांचा सहभाग
August 25th, 12:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवादात भाग घेतला.दक्षिण आफ्रिकेच्या अकादमी ऑफ सायन्सच्या प्रख्यात अनुवंशशास्त्रज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हिमला सूदयाल यांच्याशी पंतप्रधानांची भेट
August 24th, 11:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेच्या अकादमी ऑफ सायन्सच्या प्रख्यात अनुवंशशास्त्रज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हिमला सूदयाल यांची भेट घेतली.प्रसिद्ध रॉकेट वैज्ञानिक आणि गॅलेक्टिक एनर्जी व्हेंचर्सचे संस्थापक सियाबुला जुजा यांची पंतप्रधानांनी घेतली भेट
August 24th, 11:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे प्रसिद्ध रॉकेट वैज्ञानिक आणि गॅलेक्टिक एनर्जी व्हेंचर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सियाबुला जुजा यांची भेट घेतली.इथियोपिया प्रजासत्ताकाच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
August 24th, 11:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथियोपिया प्रजासत्ताकाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांची, 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे, 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या आयोजना दरम्यान भेट घेतली.सेनेगल प्रजासत्ताकच्या राष्ट्रपतींची पंतप्रधानांनी घेतली भेट
August 24th, 11:26 pm
व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, ऊर्जा, खाणकाम, कृषी, औषधनिर्माण, रेल्वे, क्षमता निर्माण, सांस्कृतिक आणि उभय देशातील लोकांचे परस्परातील संबंध यासह विविध क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर दोन्ही नेत्यांनी फलदायी चर्चा केली.पंतप्रधानांनी घेतली इराणच्या राष्ट्रपतींची भेट
August 24th, 11:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने इराणचे राष्ट्रपती महामहीम डॉ. सय्यद इब्राहिम रईसी यांची भेट घेतली.ब्रिक्स-आफ्रिका आउटरिच आणि ब्रिक्स प्लस संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
August 24th, 02:38 pm
आफ्रिकेच्या भूमीवर तुम्हा सर्व स्नेह्यांसमवेत उपस्थित राहून अतिशय आनंद होत आहे.ब्रिक्स विस्तारावर पंतप्रधानांचे निवेदन
August 24th, 01:32 pm
सर्वप्रथम, मी राष्ट्रपती, माझे मित्र रामाफोसा जी यांना या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा देतो. त्यांचे अभिनंदन करतो.